गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुली करतात या 10 मनोरंजक गोष्टी, जाणून व्हाल थक्क.!

मित्रांनो आज आपण गर्ल्स हॉस्टेलबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊ..मुलींच्या वसतिगृहात मुलींवर कोणताही दबाव किंवा कोणतीही रोक टोक नसते. गर्ल्स हॉस्टेल हे एक असे ठिकाण आहे जिथे आभ्यसाबरोबरच स्वातंत्र्य, मजा, टाइमपास, फॅशन, भांडण हे सर्व घडते. हॉस्टल लाईफ- मुली, त्यांच्या घरापासून दूर, आई आणि वडिलांच्या टो’मण्यांपासून दूर, त्यांच्या वयाच्या मुलींसह जीवनाचा पूर्ण आनंद घेतात.

मुली इथे आयुष्याची सगळी मजा घेतात. अशा परिस्थितीत, जे या वसतिगृहाच्या जीवनाशी परिचित नाहीत त्यांच्या मनामध्ये अनेकदा अशा गोष्टी येतात की मुलींचे वसतिगृह कसे असेल?

तर आम्ही तुम्हाला मुलींच्या वसतिगृहाबद्दल 10 खास गोष्टी सांगू ज्या खुप मनोरंजक देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल…

 1. फोनवर बोलणे- संपूर्ण वसतिगृहात मुली प्रत्येक कोपऱ्यात फोनवर बोलताना दिसतात. कधी आई-वडिल तर कधी मित्र-मैत्रिणी. बोलण जर मित्र किंवा बॉयफ्रेंड सोबत असेल तर एक दोन मिनिटे कोणी बोलत नाही. रात्रीपासून सकाळपर्यंतची ही चर्चा खूप लांब असते.
 2. मॉडेलिंग- जरी प्रत्येक मुलीला मिस वर्ल्डचा मुकुट मिळाला नसला तरी हॉस्टेलमध्ये कोणीही स्वतःला बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी समजत नाही. कोणत्याही वेळी मॉडेलिंग सत्र तेथे सुरू होते.
  गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुलींसाठी हा देखिल एक सर्वोत्तम टाइमपास आहे.
 3. ऑनलाइन शॉपिंग- ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ मुलींमध्ये खुप असते, ज्याचा अंदाज लावणे कठीण आहे. जेव्हा सणानिमीत्त विविध ऑफर चालू असतात, तेव्हा फक्त मुलींना माहित होण्याचाच उशिर असतो. मग सर्व मुलींच्या लॅपटॉपवर फक्त ऑनलाईन शॉपिंगचीच वेबसाईट ओपन असते
 4. सेल्फी टाईम- गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुलींसाठी सेल्फी घेणे हा सर्वोत्तम टाइमपास आहे. कधी एकटे तर कधी गृपसेल्फी. सेल्फीचा कार्यक्रम इथे रोज सुरू असतो. खर तर मुलींना सेल्फीचे खुप वेड असते. म्हणुनच सेल्फी पेक्षा बेस्ट टाईमपास कुठलाच नाही.
 1. मेकअप- वसतिगृहातील मुली स्वतःला फॅशन क्वीनपेक्षा कमी समजत नाहीत. आपण कोण आहोत आणि दिसायला कसेही असो हे महत्त्वाचे नाही, परंतु स्वतःच्या रूममेट सोबत बसून इतर मुलींच्या मेकअपवर जोक्स करणे ही मुलींची आवडती गोष्ट असते.
 2. खाना खजाना- वसतिगृहातील सर्वात चर्चित गोष्ट म्हणजे जेवण. मेसचे बेचव जेवण खाऊन मुली खुप कंटाळतात. कधी मुली वरणातील जास्त पाण्यामुळे चिडतात तर कधी जेवनातील जास्त तेलामुळे. त्यांना नेहमीच असे वाटत असते की काहितर नवीन चविष्ट जेवण मिळावे.
 3. नवीन नातेसंबंध- घरापासून दूर वसतिगृहात राहणाऱ्या मुलींसाठी रूममेट्स हा सर्वात मोठा भावनिक आधार असतो, मग तो प्रेमात सल्ला घेण्याची बाब असो किंवा ब्रेकअपचे दुःख असो. तुमची रुममेत तुमची सर्वोत्तम सल्लागार बनते.
 4. योगा शिक्षक- मुलीं फिगर मेंटेन ठेवण्याच्या बाबतीत खुपच काळजी घेत असतात. अशा परिस्थितीत जर वसतिगृहात एखाद्या मुलीचे वजन वाढले तर संपूर्ण मुलींचे वसतिगृहच तिच्यासाठी योगा शिक्षक बनते. जी मुलगी भेटली की ती व्यायामाचा सल्ला देण्यास सुरुवात करते.
 5. कपड्यांची देवाणघेवाण- वसतिगृहात दररोज मुली आज काय घालायचे याचा विचार करण्यात वेळ घालवतात. जेव्हा काहीच सापडत नाही तेव्हा त्यांची नजर दुसऱ्याच्या वॉर्डरोबकडे जाते. मग त्या रुममेटचे कपडे परिधान करून आनंदी होतात.
 6. रुमची सजावट – हॉस्टेल मधिल मुली तेथील खोल्यांची सजावट करतात जसे की त्यांना येथे कायमचे राहावे लागेल. कुटुंब आणि मित्रांच्या फोटोंपासून बॉयफ्रेंड आणि चित्रपट कलाकारांचे फोटोस भिंतींवर नक्कीच उपस्थित असतात.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *