मित्रांनो, आपल्या शास्त्रानुसार आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी एकादशीचे व्रत हे इतर दिवसांच्या व्रता पेक्षा खूप श्रेष्ठ मांनलं जातं. हा दिवस विष्णू भगवानासाठी खूप प्रिय असतो त्यामुळे या दिवशी विष्णू नारायणाची पूजा केली जाते.
या नवीन वर्षा मधील सर्वात पहिली एकादस म्हणजेच षटतिला एकादशी २८ जानेवारी शुक्रवार या दिवशी आली आहे. या एकादशी चा प्रारंभ २७ जानेवारी गुरूवारच्या दिवशी रात्री ०२: १६ मिनिटांनी होत आहे आणि समाप्ती २८ जानेवारी शुक्रवार च्या दिवशी रात्री ११ वाजून ३६ मिनिटांनी होत आहे.
षटतिला एकादशी दिवशी तुम्ही जर विष्णू नारायण यांना तीळापासून तयार केलेले पदार्थ अर्पण केले किंवा त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला तरी यामुळे विष्णू नारायण तुमच्यावर प्रसन्न होतील. तीळाच्या पदार्थांबरोबरच आपण जर विष्णू नारायण यांना पिवळ्या रंगाचे फूल, फळे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण केले तर यामुळेही त्यांची कृपा आपल्यावर राहते. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मसूर डाळीचे आणि तांदळाचे सेवन आपल्याला करायचे नाही.
या दिवशी जर आपण गोमातेला ही एक वस्तू खाऊ घातले तर भगवान विष्णू आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. जर आपण षटतिला एकादशी दिवशी आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या गोमातेला भाकरी, गूळ आणि तीळ या तीन वस्तू एकत्रितपणे खाऊ घालाव्यात आणि त्याच बरोबर गोमाते चे दर्शन घेऊन तिला आपल्या इच्छा प्राप्ति साठी प्रार्थना करायचे आहे.
मित्रांनो हा छोटासा उपाय जर आपण या एकादशी दिवशी केला तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर आपल्यावर काही संकट आले आहे त्यापासून लगेचच आपली सुटका होईल. मित्रांनो गायीमध्ये 33 कोटी देवीदेवतांचा वास असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गाईला देवतेचे स्वरूप दिले आहे.
या दिवशी जर आपण गाईला तीळ आणि तीळापासून तयार केलेले पदार्थ खाऊ घातले तर आपल्यावर असणारे पितृदोष आणि त्याचबरोबर वास्तुदोष ही कमी होतील. ज्या पती-पत्नींना संतान प्राप्ती नाही त्यांनी जर हा उपाय केला तर या उपायामुळे त्यांच्या भाग्यामध्ये संतान प्राप्तीचे योग जुळून येतात. जर घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतील आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये भांडण होत असतील तर अशावेळी तुम्ही हा उपाय करून त्यापासून सुटका करून घेऊ शकता.
या शतीला एकादशी दिवशी गाईला तीळ, गूळ आणि भाकरी खाऊ घालत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतच आपल्याला गोमातेला ही भाकरी खाऊ घालायचे आहे आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे आणि समस्या आहे ती गोमातेला सांगूनच आपल्याला प्रार्थना करायची आहे.
या उपायांबरोबरच आपण या दिवशी जर एखाद्या गोरगरीब आला आपल्या घरामध्ये बोलवून खाऊ घातले किंवा घरामध्ये बोलणे शक्य नसेल तर बाहेरच त्यांना काहीतरी खाण्यासाठी दिले किंवा दानधर्म ही करू शकतो. मित्रांनो येथे सांगितलेले उपाय जर आपण षट्तिला एकादशी दिवशी केले तर यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याच बरोबर आपल्या जीवनामध्ये आलेल्या संकटांपासून लवकरात लवकर आपली सुटका होईल आणि विष्णू नारायण आणि लक्ष्मी माता यांची कृपा ही आपल्यावर राहील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!