हिंदू कालगणनेनुसार सरते वर्षं फाल्गुन मांसाने पूर्णत्वास जाते आणि नवीन वर्षाचा शुभारंभ चैत्र मांसाच्या आगमनाने होतो. या ब्रह्मध्वजाचे या दिवशी पूजन केले जाते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे व कशी उभारावी गुढी आणि गुढीचे पूजन कसे करावे?
गुढी उभारण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे वेळूची काठी, उटणं, सुगंधीत तेल, हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षदा आणि केशरी रंगाचा मोठ वस्त्र, कडुलिंबाचा पाला आणि चाफ्याची फुलं, साखरेची माळ, तांब्याचा कलश, दोरा, पाट रांगोळी, आंब्याचे तोरण, निरंजन, सुपारी कडुनिंबाचा प्रसाद होय.
हा कडुनिंबाचा प्रसाद तयार करण्याचे साहित्य म्हणजे, कडुलिंबा ची पाने, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग होय.
गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे, उटणे आणि सुगंधी तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दरवाजाला तोरण बांधावे. एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे, नंतर त्या काठीचा एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे. कलशाला पाच गंधांचे पट्टे ओढावे आणि गजरा बांधावा. मग यानंतर कलश उलटा ठेवावा आणि काठीला आंब्याची डहाळी लिंबाचा पाला बांधावा.
चाफ्याच्या फुलांची माळ घालावी. गुढीची ओम ब्रह्मध्वजय नमः म्हणून पूजा करावी व कडुलिंबाचा प्रसाद दाखवावा. घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी गुढी उभारावी. मग नंतर,” हे ब्रह्म ध्वज माझा तुला नमस्कार असो” अशी प्रार्थना करावी. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल आणि कल्याण होउ दे. तसाच नवीन पंचांगाचाही पूजन करावं, वाचन करावं. गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा आणि गुढीचा प्रसाद सर्वांना वाटावा. तर याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात करू शकता.
पौराणिक कथा- भगवान श्री राम यांनी जेव्हा लंकेवर विजय मिळवला आणि ते आयोध्यात परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत गुढी उभारून मोठ्या आनंदाने केलं.
तसंच आणखी एक कथा आहे आणि ती म्हणजे शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी शिंपडले, त्यांच्या प्राणांचा संचार केला आणि प्रभावी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू झाले, ते याच दिवशी होय. या कथेचे तात्पर्य असे की,
त्या काळात संपूर्ण हिंदू समाज चेतनाहीन झाला होता. गुलामीची इतकी सवय झाली होती की, ते प्रतिकारशक्ती घालून बसले होते. समाजातील क्षात्रतेज संपले होते, मग शालिवाहनाने आपल्या शक्तीचा विसर पडलेल्या समाजात आत्मविश्वास जागवला आणि समाजाला शक्तिशाली बनवले.
तसेच याच दिवशी वालीचा पराभव करून प्रभू श्रीरामांनी दक्षिणे कडील प्रजेला सुखी केले, त्यानिमित्ताने सर्वांनी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला, अशी देखील एक मान्यता आहे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.