संवत्सर पाडवा म्हणून ओळखल्या जाणारा गुढी पाडवा हा वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा शनिवार 2 एप्रिल 2022 रोजी साजरा केला जाईल. जरी उत्तर भारतीय गुढी पाडवा किंवा उगाडी साजरा करत नाहीत, परंतु त्याच दिवशी नऊ दिवस चैत्र नवरात्र पूजन सुरू होते. जाणून घेऊया गुढीपाडव्याची तिथी मुहूर्त आणि शुभ योग.
भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. जाणून घेऊया गुढीपाडव्याची तिथी मुहूर्त आणि शुभ योग.
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे.
महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.
या घटनांमुळे धार्मिक विषयांवर भर – यंदा धार्मिक विषयांवर जास्त भर दिला जाईल. संवत 2079 च्या प्रवेश कुंडलीमध्ये कालसर्प योग आणि विरोधी ग्रह सूर्य शनी, गुरु शुक्र यांच्यात निर्माण झालेल्या योगामुळे जगातील अनेक देशांमध्ये स्फोटक घटना, दहशतवादी कारवाया, सत्तापालट आणि गृहयुद्ध अशी परिस्थिती निर्माण होईल. शनिवार 2 एप्रिलपासून ‘नल’ नावाचे संवत्सर सुरू होईल. या संवत्सरामुळे वाढलेल्या महागाईमुळे जनतेमध्ये नाराजी वाढणार आहे. मुलांशी संबंधित कोणताही आजार भीती निर्माण करू शकतो.
शुभ योग आणि इतर मान्यता – यंदा शनिवारी गुढीपाडवा साजरा होत असून,नव वर्षाचा स्वामी शनी देव राहील. यादिवशी समृद्धीयोग तसेच रेवती नक्षत्र आहे. या दिवसापासून 2079 नल संवत्सर आणि श्री शालीवाहन शके 1944 प्रारंभ होईल. सांगितले जात आहे की, 27 नक्षत्रांच्यापासून 27 लहरी निर्माण होत असतात.
त्या 27 लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे.