होळीपुर्वी येणाऱ्या 8 दिवसात चुकूनही करु नका हे 4 काम, अन्यथा कुटुंबावर वाईट परिणाम होतील.

होळीच्या आधीच्या 8 दिवसांना होलाष्टक म्हणतात. होलाष्टक हा शब्द होळी आणि अष्टक मिळून बनला आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या वेळी 10 मार्च पासून होलाष्टक सुरू होणार आहे. होळीच्या आधीचे आठ दिवस अशुभ मानले जातात. या दिवसात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या काळाला होलाष्टक म्हणतात. जो यावेळी 10 ते 17 मार्च, गुरुवारपर्यंत असेल.

या दिवसांमध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते. भक्ती आणि उपासनेच्या दृष्टिकोनातून हा काळ विशेष आहे. पण हे दिवस अशुभ मानण्यामागे दोन कथा सांगितल्या जातात. त्यातील एक महदेवांशी तर दुसरी भगवान विष्णू आणि त्यांच्या भक्त प्रल्हादाशी संबंधित आहे. येथे जाणून घ्या, होलाष्टकला अशुभ का मानले जाते.

होलाष्टक दरम्यान गृहप्रवेश, मुंडन, विवाह इत्यादी प्रकारची शुभ कार्य केले जात नाहीत. मात्र ही वेळ पूजाअर्चा या दृष्टीने अतिशय शुभ मानली जाते. ज्योतिषांच्या मते इतरही कारण आहे ज्यामुळे होलाष्टकाची वेळ शुभकार्यासाठी योग्य मानली जात नाही. ज्योतिषांच्या मते, होलाष्टकाच्या दिवसांमध्ये वातावरणात नकारात्मकतेचे पसरलेली असते.

सर्व ग्रहांचा प्रभाव नकारात्मक होतो. अष्टमी तिथीपासून होलाष्टक सुरू होतं आणि अशा परिस्थितीत अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनि, एकादशीला शुक्र आणि द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे सगळे ग्रह खूप न’कारात्मक परिस्थितीमध्ये असतात.

या वातावरणाचा परिणाम व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेवर होतो. ज्यामुळे एखादा चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे सहकार्य मिळू शकत नाही, अशा वेळी तुमचं काम बिघडू शकतो त्यामुळे होलाष्टक आता देवाचं नाव घेणं आणि पूजा करणे अत्यंत शुभ आहे.

परंतु कोणतेही शुभकार्य वर्जित आहेत. याची एक कथा सांगितली जाते ती याप्रमाणे. भक्त प्रल्हादाची कथा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा प्रल्‍हाद नारायणाचा खूप मोठा भक्त होता. मात्र त्याचे वडील हिरण्य कश्यपू हे मात्र त्याच्या भक्तीच्या विरोधात होते. त्यांना मात्र श्रीहरी विष्णूची भक्ती त्यांच्या मुलाने करावी अजिबात पसंत नव्हतं आणि त्यामुळेच ते प्रल्हादाचा अनेक प्रकारे छळ करत आणि या 8 दिवसांमध्ये तर त्यांनी प्रल्हादाचा अतोनात छ’ळ केला.

मात्र नारायणाच्या कृपेने त्यांना प्रल्हादाच्या केसांनाही धक्का लावता आला नाही. पौर्णिमेच्या दिवशी त्यांने आपली बहीण होलिकेला प्रल्हादाला तिच्या मां’डीवर बसवून मारण्यात सांगितलं. होलिका तिला आपल्या मां’डीत बसवताच ती आ’गीच्या ज्वालामध्ये भ’स्मसात झाली. प्रल्हादाला मात्र काही झाले नाही.

तेव्हापासून होलिका दहन दर वर्षी पौर्णिमेच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विषय म्हणून साजरा केला जातो. अष्टमी ते पौर्णिमा हे दिवस शुभकार्यासाठी चांगले मानले जात नाहीत. मात्र पौर्णिमेनंतर रंगांची होळी खेळून चांगल्याचा विजय साजरा केला जातो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *