होळी पेटवल्यावर ही एक वस्तू होळीत टाका, सर्व दू:खाचे निवारण होईल, सर्व दोष नाहीसे होतील.

घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, ११लवंग, ७ बत्तासे, ५ विडयाची पाने, गोटा खोबरे नारळ,पुरणाची पोळी,वरणभात नैवेद्य, असे सर्व घेऊन होळीची पुजा करावी.*

११ प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ,तूप वाहावे. नैवद्य दाखवावा, प्रार्थना करावी.यामुळे सुख समृद्धी वाढते,कष्ट दुर होतात.

होळीच्या दिवशी काळ्या कपडयात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्याखिशात ठेवावेत.व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो.

७ गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रु माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये. माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित. होऊदे असे म्हणून होळीत टाकावीत.

होळीच्या दुसरया दिवशी होळीची राख घरी आणुन त्यात थोडेसे मीठ,व राई,मिक्स करुन घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भुतप्रेत, नजरदोष, करणीदोष होत नाही.

होळीच्या दिवसा पासून रोज ४० दिवसा पर्यत बजरंग बाणाचे रोज ३पाठ करावेत मनामोकामना पुर्ण होते. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला २१गोमती चक्र वाहावेत, व्यापार व नोकरी मध्ये उन्नती होते.

नवग्रह दोष जाण्या साठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे.व शिवलिंगास भस्म म्हणून लावावेगरीबास पुरणपोळी खावू घालावी,घरी चौमुखी दिवा लावावा. सर्वदेवाची पुजा करावी. यामुळे बाधा निवारण होते

राहुचा दोष असेल तर – एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरुन थोडा गुळ टाकावा.व तो नारळ अंगावरून ७ वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहुचा त्रास,दोष निघून जातो.व सर्व अडलेली कामे होऊ लागतात.

जर नेहमी धनहानी होत असेल,पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व व्दिमुखी दीवा लावा त्या दिव्यात ११ काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा ,आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका.हि क्रिया श्रध्देने करा.

दुर्घटना, संकटे,फार येत असतील तर होळीच्या दिवशी ५ लाल गुंजा ५ काळ्या गुंजा व १ नारळ घेऊन,होळीला ११प्रदक्षिणा माराव्यात व नंतर.या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरुन होळीत टाकाव्यात.

विवाह होत नाही,लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे.या दिवशी २ विडयाची पाने,१ अख्खी सुपारी ,१ हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण. करावे, प्रार्थनाकरावी व या नंतर होळीचे दर्शन घ्यावे. व हीच क्रिया दुसरया दिवशी धुलीवंदनाला ही करावी. ते रोज रंगपंचमी पर्यत करावी लवकरच विवाहयोग येईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *