मित्रांनो १७ मार्च गुरुवारचा दिवस आज या वर्षीचे होलिका दहन केले जाणार आहे, आपल्या हिंदू संस्कृतीत होळीची अग्नी खूप पवित्र मानली जाते आणि या अग्निमध्ये तमाम नकारात्मक गोष्टी जाळून खाक होत असतात. आज आपण जाणून घेणार आहोत होळीच्या राखेचे काही चमत्कारिक उपाय. मित्रांनो होळी प्रजवलीत केल्यानंतर तिच्या राखेचे तंत्र मंत्र शास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत.
मानवी जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी या राखेचे अनेक प्रयोग केले जातात. चला तर मग जाणून घेऊ ज्योतिष आणि तंत्र मंत्र शास्त्रात कोण कोणते उपाय या राखेपासून सांगितले गेले आहेत. होळी प्रज्वलित केल्यानंतर जी राख खाली उरते ती थोडीशी राख आपण आपल्या घरामध्ये नक्की घेऊन यायची आहे. कारण ही राख अत्यंत पवित्र मानली जाते.
तसेच ज्या घरामध्ये ही राख असेल त्या घरावरती कोणत्याही प्रकारची काळी जादू किंवा जादू टोना करणार नाही, कोणत्याही प्रकारची समस्या किंवा करणी करू शकणार नाही, तसेच ही राख घरात असल्यामुळे घरातील सदस्यांचं आणि घराचं शत्रूंपासून रक्षण केले जाते.
जर आपल्या कुंडली मध्ये काही ग्रह दोष असतील आणि त्यामुळे तुमच्या जीवनात सातत्याने काहीना काही अडीअडचणी संकटे येत असतील, एका मागोमाग एक अडचणींचा पाढा येत असेल तर अशा वेळी होलिका दहनाची राख थंड झाल्यावर आपल्या घरी घेऊन यावी.
या राखेमध्ये थोडेसे जल म्हणजेच पाणी मिसळावे. आणि त्यांतर हे राख मिश्रित पाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी अगदी मनोभावे शिवलिंगावर अर्पण करावं. अशी मान्यता आहे कि ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करत हे जल जी व्यक्ती शिवलिंगावर अर्पण करते त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब सुख समृद्धी प्राप्त करत.
त्यांच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात. मित्रांनो अत्यंत साधा आणि सोपा असा हा उपाय आहे. जाणून घेऊया पुढचा उपाय काय आहे आणि तो कसा करायचा.
ज्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे, ज्यांना लवकरात लवकर कर्जमुक्ती करायची आहे. लाखो प्रयन्त करून सुद्धा कर्जातून मुक्ती होत नसेल अशा वेळी होलिका दहनाच्या वेळी आपण भगवान श्री हरी विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करावी, ध्यान करावं.
भगवान नरसिंहाची पूजा करताना जर त्यांच्या स्तोत्राचा आपण पाठ केला तर मित्रांनो मोठ्यात मोठं कर्ज उतरत. सोबतच आर्थिक लाभ सुद्धा होतात. म्हणजेच पैशाच्या प्राप्ती साठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.
जर नोकरी मध्ये काही समस्या येत असतील तर अशा वेळी एक नारळ घ्यावा त्याची शेंडी काढू नये. आणि हा नारळ स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवावा.
त्यानंतर आपल्या इष्ट देवतेचे ध्यान करत आपण हा नारळ पेटलेल्या होळी मध्ये अर्पण करावा.भगवान श्री हरी श्री विष्णूंकडे प्रार्थना करावी कि आपल्या नोकरी, धंद्यातील परेशानी लवकरात लवकर दूर व्हावी.
जर तुमच्या घरावर किंवा कुटुंबावर सातत्याने संकटे येत असतील बाधा येत असतील तर, या संकटांतून मुक्ती मिळवण्यासाठी आपण होळीची राख घरात घेऊन यावी आणि एका काचेच्या पात्रात ती राख ठेवावी. त्यामध्ये थोडस खडे मीठ टाकावं.सोबतच थोडीशी मोहरी सुद्धा टाकावी.
त्यानंतर आपल्या घरातील अशा कोपऱ्यात हे काचेचे पात्र ठेवायचं आहे ज्या ठिकाणी साफसफाई असेल, स्वछता असेल. त्या ठिकाणी आपण हि वाटी ठेवून द्यायची आहे. मित्रांनो हा छोटासा उपाय घरातील मोठ्यात मोठी नकारात्मकता दूर करतो.
जर तुमच्या घरात जर दीर्घ काळापासून एखादी व्यक्ती सारखीच आजारी पडत असेल तर अशा वेळी होळीची थंड झालेली थोडीशी राख आपण आजारी व्यक्तीच्या अंगावर शिंपडा. त्याचा छिडकावं करा.
हा उपाय अगदी छोटासा आहे मात्र घरातील मोठ्यात मोठं आजारपण यामुळे दूर होत. घरातील आणि त्या व्यक्तीमधील नकारात्मकता यामुळे बाहेर पडते.
मित्रांनो होळीच्या राखेचे हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा. व आपल्या परिवारास वाईट शक्तींपासून दूर ठेवा. आपल्या घरात सुद्धा सुख समृद्धी येवो हीच श्री हरी श्री विष्णूंच्या चरणी मनोकामना व प्रार्थना.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!