मित्रांनो आपल्या पैकी बरेच लोक हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त असतात. त्यांची सेवा भक्ती पूजा करत असतात आणि भक्त आपल्या देवी देवतांना विनवणी करत असतात की आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर व्हावी. आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदावी आपल्यापैकी बरेच लोक हे गणपती बाप्पा यांचे भक्त आहेत.
गणपती बाप्पा यांना विघ्नहर्ता असेही म्हणतात . म्हणजे गणपती बाप्पा आपली प्रत्येक संकटातून सुटका करतात. प्रत्येक भक्त संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी असे करत असतात.
संध्याकाळी आरती चंद्रोदयाचे दर्शन घेतल्यानंतर हा उपवास सोडतात. उपवासाच्या दिवशी बाप्पाच्या आवडत्या वस्तू पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात . बाप्पांच्या आवडत्या दुर्वा शिवाय गणेश पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून जेव्हा जेव्हा गृहप्रवेश मुंज विवाह यांसारख्या शुभ कार्य केले जातात तेव्हा गणेश पूजा करतात व त्याला दुर्वा वापरल्या जातात.
याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेतही दुर्वा वापरल्या जातात. या दिवशी दुर्वांचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरतात. तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण व्हावी असे जर वाटत असेल तर मी आज तुम्हाला दूर्वाण संबंधित काही उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे उपाय केले तर तुमची इच्छा लगेच पूर्ण होण्यास मदत होईल.
गणेश पूजेत दुर्वा तसेच भगवान शंकरांच्या पूजेत शंकराला बेलपत्राचा अभिषेक कशासाठी तर त्या निमित्ताने आपले लक्ष पूजेत एकाग्र व्हावे आणि मन स्थिर व्हावे आपण गवताला दूर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो. आणि त्या बाप्पाला अर्पण करतो याचा अर्थ असा की हे काम अतिशय मन लावून करायचा आहे.
मन एकदा का शांत आणि एकाग्र की पुढचे मागचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कार ही आपोआप होत जातात. मित्रांनो जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल जर तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर ५ दुर्वांमध्ये दोऱ्याने ११गाठी मारून तो दुर्वांचा छोटासा हार करावा आणि तो पप्पाला अर्पण करावा आणि असे केल्याने आर्थिक संकटातून लवकर मुक्तता होते.
जर मित्रांनो तुम्हाला असे वाटत असेल आपली इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी तर गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला लावा असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार घरातील संकटातून मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार घरातील संकटात पासून लवकर सुटका होण्यासाठी गाईला दुर्वा खायला घाला. असे केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेम भाव वाढते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना २१दुर्वांचे त्रिदल अर्पण करा तसेच अथर्वशीर्षाची २१आवर्तने म्हणा किंवा श्रावण करा त्यामुळे देखील गणेश कृपा प्राप्त होते. गणेशाची कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी उभा राहतो. जर तुम्ही गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्या तर तुम्हाला आर्थिक उणीव भासत नाही.
प्रत्येक कामात यश मिळवून कुबेराप्रमाणे धनप्राप्ती होते. असे मानले जाते. तसेच मित्रांनो जर बुधवारी गणपतीच्या मंदिरात अकरा दुर्वांची जोडी अर्पण केली तर दोष दूर होतो आणि गणेश कृपा होते. तर मित्रांनो हे होते काही दुर्वांचे उपाय.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद