जीवनात सुख-शांती हवी असेल तर, चु’कूनही राहण्यासाठी अशी जागा निवडू नका, नाहीतर चांगले आयुष्य उ’द्ध्वस्त होईल…

धर्मपुराणांमध्ये नेहमीच संगत चांगली असावी यावर खूप जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर राहण्याचे ठिकाण देखील चांगले असावे. देश, शहर किंवा एखादी व्यक्ती जिथे राहते त्या ठिकाणी चांगले वातावरण, लोक व सरकार असणे खूप महत्वाचे आहे. 

अन्यथा त्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. आचार्य चाणक्य यांनी याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी चाणक्य नीती शास्त्रात अशी ठिकाणे सांगितली आहेत, जिथे माणसाने चुकूनही राहता कामा नये. या 5 ठिकाणी राहण्याची चूक करू नका –

माणसाला आनंदी आणि आरामदायी जीवनासाठी चांगल्या वातावरणात राहणे आवश्यक आहे. घर अशुभ ठिकाणी असेल तर सुख प्राप्त होऊ शकत नाही. वेद आणि शास्त्रांचे अभ्यासक आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, मनुष्याने कोणत्या ठिकाणी घर बांधावे.

यासाठी आचार्य चाणक्य यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सुखी जीवनासाठी अनेक धोरणे दिली आहेत. तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख-शांती हवी असेल तर चाणक्यांचे हे विचार तुमच्या जीवनात अवश्य लागू करा.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, शेजारी श्रीमंत असेल अशा ठिकाणी राहणे फायदेशीर. कारण श्रीमंत व्यक्तीच्या वास्तव्याच्या ठिकाणी व्यवसायाची स्थिती सकारात्मक असते. अशा स्थितीत तिथे रोजगाराची शक्यता असेल, तर अडचण येण्याची शक्यता नाही. याचबरोबर शिकलेला शेजारीही आनंदी जीवन देतो.  आचार्य चाणक्य म्हणतात की बुद्धिमान लोकांचे शेजारी असणे चांगले आहे. कारण त्यांची वागणूक मुर्खांपेक्षा खूप चांगली असते आणि तुमची मुलांवरही याचा सकारात्मक परिणाम होतो.

सुखी जीवनासाठी चांगले घर असणे खूप गरजेचे आहे. पण प्रश्न असा पडतो की घर कुठे बांधायचे किंवा कोणत्या ठिकाणी घर विकत घ्यायचे जेणेकरून जीवनात आनंद टिकून राहील. हे देखील आवश्यक आहे कारण आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई घराच्या बांधकामात गुंतवतो. 

अशा स्थितीत घर अशुभ असेल तर सुख प्राप्त होऊ शकत नाही. वेद आणि शास्त्रांचे अभ्यासक आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, मनुष्याने कोणत्या ठिकाणी घर बांधावे…

ज्या ठिकाणी राजा दयाळू नाही, जिथे नियमांचे पालन होत नाही अशा ठिकाणी कधीही राहू नये. अशा ठिकाणी माणूस कधीही अडचणीत येऊ शकतो. चांगल्या सरकारी यंत्रणा म्हणजेच सरकारकडून चांगली व्यवस्था असलेल्या ठिकाणी घर असणे चांगले. हे ठिकाण असे असावे की, तुम्हाला सरकारी यंत्रणेत सहज प्रवेश मिळेल आणि गरज पडल्यास सुरक्षेसाठी तात्काळ तेथे पोहोचता येईल.

आजच्या काळात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे, पण चाणक्यांनी त्याच वेळी सांगितले होते की, घर अशा ठिकाणी असावे जिथे पाण्याची व्यवस्था चांगली असेल, म्हणजेच पाण्याची सहज उपलब्धता असेल.

चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या या ठिकाणी राहणे मानवी आयुष्याला घातक ठरू शकते. आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या ठिकाणी उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही किंवा जिथे माणसाला रोजगार मिळत नाही अशा ठिकाणी कधीही राहू नये.  हे त्याला आणि त्याच्या कुटुंबासाठी हानिकारक आहे. तसेच, व्यावसायिकाने अशा ठिकाणी कधीही राहू नये, जे त्याच्या व्यवसायासाठी योग्य नाही. अन्यथा त्यांचा प्रस्थापित व्यवसाय उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. 

ज्या ठिकाणी मदत करणारे आणि मनमिळाऊ लोक राहत नाहीत अशा ठिकाणी कधीही राहू नये. आजूबाजूचे लोक मदतीला धाऊन आले नाहीत तर तिथे राहणारी व्यक्ती मोठ्या संकटात अडकते.

घर घेताना हेही लक्षात ठेवले पाहिजे की ती जागा हॉस्पिटलच्या जवळ असावी. चाणक्यांच्या मते घर अशा ठिकाणी असले पाहिजे जिथे आजारी पडल्यास लगेचच आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल. तसेच ज्या ठिकाणी नेहमी मृत्यू किंवा नुकसानाची भीती असते अशा ठिकाणी कधीही राहू नये. कारण अशा भीतीच्या छायेत जगणे म्हणजे नरकातील जीवन जगण्यासारखे आहे. 

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शे’अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *