जीवनात यशस्वी व्हायचं असेल, चिक्कार पैसा कमवायचा असेल तर या 5 गोष्टी करा.

आजच्या या लेखामध्ये आपण अशा सवयी बघणार आहोत ज्या शिकण्यास थोड्या अवघड आहेत. पण या सवयी तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंबल्या तर तुम्हाला यशस्वी आणि श्रीमंत होण्यापासून कोनीही थांबू शकणार नाही. प्रत्येक सवय आयुष्याला वाटचाल देणारी आहे. मित्रांनो ह्या जगात प्रत्येक माणसाला श्रीमंत आणि यशस्वी होण्याची मनोमन इच्छा असते पण श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी नक्की काय करावे लागते, हे फार कमी लोकांना माहिती असते.

बोलण्यापेक्षा कृती वर जास्त भर देणे – दुसरी सवय म्हणजे कृतीवर जास्त भर देणे. मित्रांनो, या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. पहिले जे लोक बोलतात खूप पण करत काहीच नाही. आणि दुसरे म्हणजे विकृतीवर जास्त भर देतात या दोघांपैकी आयुष्यात यशस्वी कोण होतं असेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. कारण सतत कृतिशील रहाणे ही एक सवय आहे. आणि कामाची हालचाल करणे हीसुद्धा एक प्रकारची सवय आहे.

मी अशा अनेक लोकांना भेटत असतो जे नुसते मोठ्या बढाया मारण्यात तरबेज असतात. पण करत काहीच नाही. अशी लोक वर्षानुवर्षे त्याच परिस्थिती मध्ये जगत असतात. म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर नुसते स्वप्न बघून चालणार नाही तर त्या स्वप्नांवर काम करावे लागेल. म्हणून बोलण्यापेक्षा कृती करायची सवय लावून घ्या.बघा काही दिवसात तुमच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडतो.

स्वता:हा कडे बघा – पहिली सवय म्हणजे नेहमी लक्ष तुम्ही काय आयुष्यात बणनार आहात यावर ठेवा. तुमच्याकडे काय आहे काय नाही यावर देऊ नाकात. मित्रांनो यशस्वी होण्यासाठी तुमचे लक्ष नेहमी तुम्ही काय बननार आहात ह्या गोष्टीवर ठेवा. अनेक लोक याची तुलना त्यांच्याकडे काय आहे यावरून ठरवतात.

या कडे किती महाग किती महागडा मोबाईल आहे. तुमचे घर किती मोठे आहे. तुमच्याकडे किती मोठी गाडी आहे. वगैरे वगैरे असा विचार करणे वाईट आहे असं माझं म्हणणं नाही. पण आयुष्यात तुम्ही खरे यशस्वी कधी होता. जेव्हा दररोज तुम्ही स्वतःमध्ये काही ना काही प्रगती करत असता.

उदाहरण द्यायचे झाले तर – दोन कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुले असतात. एक मुलगा गरीब असतो तर दुसरा मुलगा श्रीमंत बापाचा मुलगा असतो. जो गरीब मुलगा असतो तो नवीन नवीन गोष्टी शिकणे यात स्वतःला व्यस्त ठेवतो. त्याला जे काही पैसे मिळायचे त्यातून वेगळ्या विषयांची पुस्तके विकत घ्यायचा. नवीन नवीन कोर्सेस करायचा.

आणि दूसरा तो श्रीमंत बापाचा मुलगा असतो. त्याला नुसत्या महागड्या गोष्टी घ्यायची सवय असते. महागडे कपडे, महागडी घड्याळे, महागडी बुट.

तुम्ही मला सांगा पुढील आयुष्यात यशस्वी या दोघांपैकी कोण होणार निश्चितच गरीब मुलगा ज्याने त्यान सगळे लक्ष तो काय बनत आहे ह्यावर दिले आणि श्रीमंत बाबा च्या मुलाने सर्व लक्ष त्याच्याकडे काय आहे ह्यावर दिले.

एका वेळेस एकाच कामाकडे लक्ष्य केंद्रीत करा – तीसरी सवय म्हणजे एका वेळेस एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. मित्रांनो तुमच्या बरोबर पण असे घडले असेल एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला किवा लेख वाचला किंवा एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचले की आपल्या मध्ये एकदम जोशघेऊन येतो आणि मग आपण एकाच वेळेस अनेक गोष्टींवर काम करायला सुरुवात करतो.

जसे की, व्यायाम करणे, सकाळी लवकर उठणे, वाचन करणे, नवीन व्यवसायाबद्दल विचार करणे, वगैरे वगैरे त्यामुळे होते काय सुरू केलेल्या गोष्टीपैकी आपण काहीच पूर्ण करू शकत नाही. आणि नंतर स्वतःला दोष देतो काहीतरी कमी आहे. मला जमत नाही. म्हणून एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त दोन काम करा व जास्त कामे हाती घेवून आपण वेळीच स्वता:चे नुकसान करतो. आपला आत्मविश्वास कमी होतो ते वेगळेच. म्हणून तुमचा फोकस एका वेळेला फक्त एकाच गोष्टीवर ठेवा.

स्पष्ट नाही म्हणायला शिका – पाचवी सवय म्हणजे ह्या जगात अनेक गोष्टी अशा आहेत. ज्या आपल्या काहीच कामाचे नसतात. पण आपल्याला वाटते ते आपल्या कामाचे आहेत. आपल्याला हा फरक करता आला पाहिजे कोणत्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत आणि कोणत्या नुकसानदायी आहे. त्यामुळे अनेक गोष्टींना नाही म्हणायची सवय आपण लावून घेतली पाहिजे. मग ते लोकांना असेल, एखाद्या कार्यक्रमाला असेल, एखाद्या पार्टीसाठी असेल किंवा कोणतेही असे काम.

ह्या सर्व गोष्टी फक्त तुमचा वेळ वाया घालवणार आहेत. अनेक लोकांना नाही म्हणायला अवघड जाते. त्यांना वाटते समोरचा काय विचार करेल. आमचे नाते तुटणार नाही ना. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याचा आदर ठेवून नाही म्हणता तेव्हा तुम्ही एक प्रकारे स्वतःला रिस्पेक्ट करता हे समोरच्याला सुद्धा समजते. त्यामुळे अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायची सवय लावून घ्या.

जिंकण्यासाठी खेळा – चौथी सवय म्हणजे नेहमी जिंकण्यासाठी खेळा. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एका सुप्रसिद्ध फुटबॉलपटू चा इंटरव्यू बघत होतो. तेव्हा त्याला प्रश्न विचारला मध्ये जायची इच्छा आहे त्या फुटबॉल पटू उत्तर दिले. सगळ्यात मित्रांनो काही यशस्वी लोक असतात.

जे जिंकण्यासाठी खेळत असतात ते मला मान्य आहे. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आपण जिंकूशकतो असे नाही. पण प्रत्येक ठिकाणी आपण रिस्कघेऊ शकतो. आपली मानसिकता नकारात्मक असेल तर अशी मानसिकता घेऊन आपण जिंकू शकत नाही. म्हणून सकारात्मक मानसिकता तुम्ही ठेवायला हवी.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *