मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना दिवस-रात्र मेहनत घेऊन ये त्यांच्या कार्यामध्ये यश मिळत नसते आणि त्याचबरोबर जीवनामध्ये दररोज वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो मित्रांनो अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये येण्यामागचे कारण म्हणजे शनीचा दोष, मित्रांनो जर आपल्यावर शनीचा दोष असेल तर यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु मित्रांनो शनीचा दोष दूर करण्यासाठी आपल्याला अनेक व्यक्तींकडून वेगवेगळे उपाय सांगितले जातात.
परंतु मित्रांनो आज आपण शनीचा दोष कमी करणारे वास्तुशास्त्रामधील काही प्रभावी उपाय पाहणार आहोत परंतु मित्रांनो हे उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे.प्रत्येक दिवस हिंदू धर्मशास्त्रानुसार एखाद्या देवाला किंवा देवीला समर्पित केलेला असतो.
मित्रांनो हे उपाय शनिवारी करण्यामागचे कारण म्हणजे शनिवार हा शनी देवाचा दिवस आहे. या दिवशी शनि देवाची पूजा करण्याचा नियम आहे. सूर्यपुत्र शनिदेव यांना न्यायाचे देव मानले जाते. शनिदेव आपल्याला आपल्या कर्तृत्वाच्या आधारे फळ प्रदान करत असतात. अशा परिस्थितीमध्ये आम्ही या लेखामध्ये शनिवारच्या या विशेष दिवशी नेमके कोण कोणते उपाय करायचे आहेत याबद्दल सांगणार आहोत,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.
जर शनिवारी तुम्ही हे उपाय केल्यास तुमच्या जीवनातील सर्व दुःख,व्यथा, त्रास नष्ट होतील. सर्वात पहिला उपाय आहे तो मोहरीच्या तेलाचा उपाय. काचे पासून बनलेल्या वाटीमध्ये मोहरीचे तेल संपूर्ण आणि भरावे आणि आता त्या वाटीमध्ये आपली चेहऱ्याची सावली पडेल अशा पद्धतीने उभे रहावे आणि “ओम शं शनेश्वराय नमः” या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे. त्यानंतर शनि मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरजू व्यक्तींना हे तेल आपल्याला दान करायचे आहे. हा उपाय आपल्याला सलग सात दिवस करायचा आहे.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्या सर्व दुःखांवर विजय मिळावा आणि आपले सर्व दुःख नष्ट व्हावे अशी श्री शनिदेव यांना प्रार्थना सुद्धा करावी तसेच आपल्यावर शनि देव याची कृपादृष्टी रहावी तसेच आपल्या सर्व चुकांबद्दल क्षमा सुद्धा मागावी. पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारणे.शनी देवाचा दोष व साडेसाती दूर करायची असल्यास त्यासाठी पिंपळाच्या झाडाला शनिवारच्या दिवशी फेऱ्या मारणे शुभ मानले गेलेले आहे.असे केल्याने शनिदेवाचा जो दोष आहे त्यांची पीडा कमी होते आणि लवकरात लवकर आपल्या या दोषातून मुक्तता मिळते.
हा उपाय करताना आपल्याला शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान विधी आटोपल्यानंतर काळे कपडे घालून पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला फेर्या मारायचे आहेत.या फेर्या मारताना तुम्ही शनिदेवांचा मंत्राचा जप सुद्धा करू शकता.असे केल्यामुळे तुमच्या जीवनातील शनिपीडा शनी दोष लवकर संपेल आणि शनी देव यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल.
मित्रांनो हा उपाय केल्यानंतर आणखीन एक प्रभावी उपाय आपण शनिवारच्या दिवशी करू शकतो. तो महत्त्वाचा उपाय म्हणजे हनुमान चालीसा. हनुमान चालीसा यास हिंदू धर्म शास्त्रामध्ये अनन्य असे महत्व प्राप्त आहे आणि त्याचबरोबर शनिवारचा दिवस हा हनुमान यांचा दिवस सुद्धा मानला जातो. म्हणून जर आपण शनिवारच्या दिवशी श्री हनुमान यांच्या प्रतिमेसमोर किंवा यांच्या मंदिरांमध्ये जाऊन हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे यामुळे ही आपल्या जीवनातील अनेक अडचणी पासून आपली सुटका होते.
मित्रांनो त्याचबरोबर हनुमान व शनिदेव यांच्यात मैत्रीचे नाते असल्यामुळे जर तुम्ही शनिवारच्या दिवशी शनिदेव यांच्या पूजा करताना भगवान हनुमान यांच्या चालीसाचे पठण केल्यास तुमच्या जीवनातील जे काही दुःख त्रास समस्या असतात त्या लवकर संपून जातात. तसेच शनिवारच्या दिवशी मुंग्यांना पीठ व माशांना धान्य खाऊ घाल ने शुभ मानले जाते. याद्वारे कर्जातून मुक्ती व कामामध्ये बढती मिळण्याची लाभ होतात.मित्रांनो यानंतरचा सर्वात सोपा उपाय म्हणजे शनिवारच्या दिवशी काळे वस्तूचे दान करणे.
यामध्ये आपण काळी उडीद, काळे कपडे,काळे हरभरे तसेच काळे तीळ या वस्तूंचे शनिवारी दान करणे शुभ मानले गेले आहे. या सर्व वस्तू जर तुम्ही गरजू व्यक्तींना दिल्यास तुमचा शत्रू तुमच्यावर कधीच विजय मिळू शकत नाही त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी श्री शनिदेव यांना तेल अर्पण करावे त्याचबरोबर शनि देव यांच्या कृपा आशीर्वादामुळे तुमची जीवन सुखमय होईल आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामधील सर्व समस्या दूर होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद