स्वामी म्हणतात, ज्या घरा त होतो अन्नाचा अपमान, त्यांना हे दुःख भोगावेच लागते.

मन करा रे प्रसन्न, शांती परते नाही सुख! येर अवघेची दु:ख! माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात.

घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान – एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढय़ात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात.

भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहाते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते. घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खातपीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काही ही बोलू नका.

अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात.

मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असलेतरी त्या मुक्याप्राण्यांना काय समजणार?

एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार करू नका, आपापसात मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत
तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये.

घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात.

यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रा वळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्या च्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवीप्रसन्न रहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्ला य करणारे हातात अन्न असताना असणारी कोण तीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रूसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय..? अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे.

‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीच वापरतात.
कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्मया प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकटे येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो.

अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत रहाते. स्वतःची अद्यात्मिक शक्तीही वाढते. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *