काळाचा सूत्रधार परमात्मा असतो, प्रारब्धवशात जे आहे तेच होते. वाचा सविस्तर.

लग्न #पैसा #मरण #अन्न #जन्म, हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात.

रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, “या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?” ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, “समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे.” रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले,

“याला समुद्रात फेकून द्या.” नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा वाहत-वाहत एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. रावणाची कन्या उपवर झाली, बेटावरचा राजा म्हणून

रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता एकदा जावयास बोलाविले रावण म्हणाला, “ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो.” त्याने सांगितले होते, “माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात.” जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे.” पायाचा अंगठा

दाखविला. मग रावणास खात्री पटली. या ब्रम्हदेवाच्या गाठी असतात. पैसा – ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो. मरण – ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते…

एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते ? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले. पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते ? आई म्हणाली, आज यमराज आले होते व जाताना हसले.” गरुडास शंका आली, का हसले असावे ? त्याने

आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. यमराज दुसऱ्या दिवस तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, “आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण जाताना आपण हसला का? “यमराज म्हणाले,”आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो.” त्यावेळी

गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती. तात्पर्य – काहींचा मृत्यू एसटीत, काहींचा रेल्वेत, काहींचा विमानात, काहींचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे. पण काळाचा सूत्रधार मात्र

परमात्मा आहे. काळ कोणत्या रूपात प्रकट होईल कोणालाच माहित नाही म्हणून सतत जमेल तसे नामस्मरण करून आपले मनुष्य जीवन सार्थक करावे. “अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद

सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *