आजच्या काळात मनुष्याचे शरीर जेव्हा आजारी पडते तेव्हा तो शरीराच्या डाँक्टर कडे जाऊन उपचार घेतो पण मनुष्याच्या मनाला झालेले रोग कोण डाँक्टर बरे करेल त्यासाठी कोणते औषध घ्यायला पाहिजे कधी विचार केला का???
आजच्या मनुष्याला काम क्रोध लोभ मोह अहंकार या सारख्या मनाच्या रोगानी ग्रासले आहे आजच्या काळात प्रत्येक मनुष्य रोगी आहेच प्रत्येक मनुष्य याच रोगाला बळी पडला आहे काही लोकांना हा रोग झाला आहे ते माहिती पडले आहेत ते त्याच्या वर योग्य असा उपचार करत आहेत पण 99 टक्के लोकांना अजूनही या रोगांच्या बद्दल माहित नाही आहे ते स्वतःला मानसिक रोगी समजत नाहीत किंवा
माहिती आहे पण ते स्वतः वर उपचार करून या मानसिक रोगा मधून मुक्त व्हावे ही त्यांची ईच्छा नाही पण या रोगानी मनुष्याचे अतोनात नुकसान केले आहे आणि पुढेही करणार आहेत हे मनोविकार जसे या भुतला वरील मनुष्याच्या वृद्धी ला कारणी भूत आहेत तसेच मनुष्याच्या पतनाला पण कारणीभूत होणार आहेत याच मनोविकारांच्या मुळे हे घोर कलियुग आले आहे
आज जगात जे घडत आहे ते सर्व या मनोविकारांच्या मुळे परंतु मनुष्याला या मनोविकारांच्या मुळे होणारे नुकसान माहित नाही म्हणून तो या विकारांच्या वरचे औषध घेत नाही आहे या मनोविकारांचा एकच तोटा सांगतो याच मनोविकारांच्या मुळे आपण परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभांच्या पासून दूर जातो हा सर्वात मोठा तोटा आहे
परमात्मा पासून दूर जाणे हि साधी गोष्ट नाही आहे आज परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ आहेत म्हणून हे जग आहे आणि हे जग आहे म्हणून आपण आहोत या जगात मनुष्याचे जर कोणी असेल तर तो म्हणजे एक परमात्मा तोच सत्य आहे बाकी सगळे असत्य आहे या मनोविकांराचे औषध आपण घेतले तर परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ हे दूर तर जाणार नाहीत उलट आपल्या समोर येऊन उभा रहातील
त्या साठी एक औषध घेतले पाहिजे ते म्हणजे परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे नाम होय या मनोविकारांच्या वरती या कलियुगात एकच औषध आहे ते म्हणजे परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे नाम तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे नाम मना पासून घ्यायला सूरवात करा तेव्हा हळूहळू हे मनोविकार नष्ट व्हायला लागतील हे मनोविकार जेवढे शक्तिशाली आहेत तेवढे
त्याच्या पेक्षा जास्त शक्तिशाली औषध मनुष्याने घेतले पाहिजे ते औषध म्हणजे परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूचे नाम हे औषध सर्वाना सहज उपलब्ध होणारे कोणत्याही प्रकारचा खर्च न येणारे मोफत असणारे हे औषध आहे म्हणून प्रत्येकाने हे औषध घेतलेच पाहिजे यातच आपले भले आहे
आणि हे औषध याच कलियुगा साठी निर्माण झालेले आहे म्हणून या औषधाचा वापर जरूर करायला हवा परमात्मा चे नाम हे काल पण श्रेष्ठ होते आज पण आहे आणि उद्याही राहील. परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ नमोस्तुते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोण त्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!