मित्रांनो आपल्या पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णू समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आलेले अमृत देवतांमध्ये वाटप करत होते, तेव्हा स्वरभानू नावाचा राक्षस देवतांच्या पंक्तीत देवाचं रुप घेऊन बसला आणि त्याने अमृताचे सेवन केले. जेव्हा भगवान विष्णूला हे कळले तेव्हा त्यांनी स्वरभानूचे डोके त्याच्या धडापासून वेगळे कापले. मस्तकाचे धडापासून विभक्त झाल्यानंतर स्वरभानूच्या मस्तकाला राहू आणि धडाला केतू म्हटले गेले.
डोक्यापासून धड वेगळे झाल्यावर अमृताचे दोन थेंब पृथ्वीवर पडले. ज्यातून कांदा आणि लसूण तयार झाले. अमृतापासून मिळवल्यामुळे या दोन्ही गोष्टी आरोग्या साठी खूप फायदेशीर मानल्या जातात. परंतु त्यांची उत्पत्ती राक्षसांद्वारे झाली आहे, म्हणून ते अपवित्र मानले जाते आणि पूजेच्या कार्यात ते समाविष्ट केले जात नाही.
हिंदू धर्मात विशेषकरून कांदा व लसूण हे सर्वथैव वज्र मानले आहेत. खाद्यपदार्थांची हिंसात्मक व निषेधात्मक प्रतवारी काढल्यास पाणी हे कमीतकमी म्हणजे दहा बारा टक्के निषिद्ध असते. ताजी फळे वीस पंचवीस टक्के निषिद्ध असतात. हविष्यान्नाचे पदार्थ म्हणजे दूधाचे पदार्थ त्याहून अधिक म्हणजे तीस ते पस्तीस टक्के निषिद्ध. नेहमीचे शाकाहारी पदार्थ चाळीस ते पंचेचाळीस टक्के निषिद्ध. कंदहार साठ टक्क्यांपर्यंत, कांदा लसूण ऐंशी टक्यांपर्यंत, अंडी नव्वद टक्क्यांपर्यंत, तर मां’स-मा’से-म’द्य शंभर टक्के निषिद्ध मानले जातात.
आणि मित्रांनो हिंदू धर्मात ऐंशी टक्क्याच्या आत असलेल्या पदार्थांच्या सेवनाला परवानगी आहे. म्हणून कांदा, लसूण वज्र्य मानले आहे. कांद्याचे शास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रयोग झाले आहेत आणि कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा आहे.
म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन म्हटले आहे. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम र’क्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात. कांदा खाल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते व गतीमानता वाढते. परिणामी विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार संभवतात.
आणि त्याचबरोबर मित्रांनो इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग असल्यास लसूण उपकारक ठरतो आणि त्याचप्रमाणे कांदा हा उष्णताहारक असल्यामुळे अंगात ज्वराधिक्य झाल्यास पोटावर, मस्तकावर कांद्याचा खिस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात.
पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात, त्याचा सर्रास चवीसाठी वापर केल्यास ते प्रकृतीस व संस्कारास निश्चित हानीकारक ठरू शकते. धार्मिक कार्यात, देवाला नैवेद्य दाखवताना कांदा, लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. ते पावित्र्य जपले जाते.
सद्यस्थितीत आपण कांदा, लसूण यांच्या एवढे आहारी गेलो आहोत, की त्यांच्याशिवाय स्वयंपाकघराचे पान हलत नाही. म्हणून त्यांचा वापर पूर्णपणे बंद करता आला नाही, तर निदान कमी करता येईल. तसेच उपवासाच्या दिवशी, सकाळच्या जेवणात त्यांचा वापर निश्चितपणे टाळता येईल.
आणि त्याचबरोबर कांदा आणि लसूणमधील तामसिक गुणधर्मांमुळे ते मन चंचल बनवते. एका ठिकाणी एकाग्र होण्यास परवानगी देत नाही. या व्यतिरिक्त, कांदा-लसूण सेवन केल्याने व्यक्तीची कामुक ऊर्जा जागृत होऊ लागते आणि व्यक्तीचे मन भोग आणि ऐषोरामाकडे आकर्षित होते. तर उपवास आणि साधनेच्या वेळी एखाद्याच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी देवी-देवतांना कांदा व लसुन अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!