खजूर हे एक असे फळ आहे ज्यात प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. तर खजुराच्या वापराने चेहऱ्याचे सौंदर्य कसे वाढवायचे ते आज आपण जाणून घेऊ.
बहुतेक स्त्रिया चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरून पाहतात, पण तुम्हाला माहीत आहे का की आता तुम्ही केवळ सौंदर्य उत्पादनांनीच नव्हे तर खजूर वापरूनही चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता. तुम्हांला प्रश्न पडला असेल, हे कसे शक्य आहे. चला तर मग येथे जाणून घेऊया..
खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे तर आपल्याला माहिती आहेतच. आता खजूराचा फेसपॅक बनवा आणि तो चेहऱ्यावर लावा. वाढत्या वयाबरोबर त्वचेच्या पेशी खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत हाताने तयार केलेला फेस पॅक लावून खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती केली जाते.
आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजूराला पूर्ण अन्न म्हटले जाते. त्यामुळे खजूर शक्तीवर्धक, अशक्तपणा कमी करणारं आणि शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे. खजूर खाल्ल्यास तुम्हाला तात्काळ उर्जा मिळते. आयुर्वेदानुसार खजूर शक्तीवर्धक, पौष्टिक, श्रमहारक आणि वीर्यवर्धक फळ आहे.
खजूरांमध्ये असलेले व्हिटॅमिन बी-5 मुक्त रॅडिकल्स नियंत्रित करण्यासाठी कार्य करते. कोरड्या खजुरांची पेस्ट तयार करा आणि ते चेहऱ्यावर लावा, तसेच आहारात त्याचा नियमित समावेश करा. त्वचा बराच काळ निरोगी राहील. खजूर फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या खूप कमी होते. कोरड्या, रूक्ष त्वचेला नवी चकाकी मिळते.
आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी दडलेल्या असतात, ज्या आपल्या सौंदर्यासाठी उपयुक्त ठरतात. पण आपल्याला त्यांचा नेमका कसा उपयोग करायचा हे ठाऊक नसतं. अशाच अनेक पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे खजूर. आरोग्यासाठी खजूर तर आपण नेहमीच खातो. आता त्वचेसाठी खजूराचा उपयोग करून बघा.
खजूरामध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे खजूर त्वचेसाठी देखील अतिशय पोषक आहे. खजूराचा फेसपॅक बनवून तो नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार आणि तजेलदार बनते.
वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य समस्यांमध्ये खजूर हे एक उत्तम औषध म्हणून वापरले जाऊ शकते. त्यांचा वापर कसा करावा हे जाणून घ्या..
खजूर फेसपॅक तयार करण्याची योग्य पद्धत: खजूर फेसपॅक बनविण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी सगळ्यात आधी तीन ते चार खजूर घ्या आणि त्यांच्यातल्या बिया काढून टाका.
हे खजूर रात्री दुधात भिजत टाका. यानंतर सकाळी या मिश्रणामध्ये एक चमचा दुधाची साय टाका आणि ते मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या. यामध्ये एक टेबलस्पून लिंबाचा रस टाका. अशा पद्धतीने खजूर फेसपॅक तयार असेल.
कसा लावायचा खजूर फेसपॅक? तयार केलेला फेसपॅक हलक्या हाताने गोलाकार फिरवत चेहऱ्यावर लावा. यानंतर हा फेसपॅक सुकेपर्यंत तो चेहऱ्यावर राहू द्यावा. फेसपॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा.
खजूर फेसपॅक लावण्याचे फायदे: त्वचेशी संबंधित समस्या खूप कमी होतात. खजूर खाण्याबरोबरच खजूर आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने हे डाग कमी होण्यास मदत होते.
काहींच्या चेहऱ्यावर डाग किंवा चट्टे असतात. खजुरामध्ये असणाऱ्या ब जीवनसत्वामुळे चेहऱ्यावरील चट्टे कमी होण्यास मदत होते. त्व चा तजेलदार होते. त्वचेच्या आत व बाहेरील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते.
याचबरोबर, कोमट पाण्यात खजूर भिजवून नंतर ते बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते तसेच चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर होते. आपण इच्छित असल्यास, केस गळणे थांबविण्यासाठी देखील खजूर वापरू शकता. खजुरामध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी च्या समृद्ध स्रोतामुळे, हे केसांसाठी वरदान ठरले आहे.
यासाठी खजूर पाण्यात उकळून घेऊन केसांच्या मुळांना आठवड्यातून एकदा लावल्यास केस गळणे थांबेल. एवढेच नाही तर नियमितपणे खजूर खाल्ल्याने कोरड्या केसांची समस्या दूर होते. त्व’चा नितळ राहण्यास मदत होते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत. चेहऱ्यावरील ताण आणि अकाली आलेले वृद्धत्व लपविण्याचे काम खजुरामुळे होते. तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसता.
वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्व’चा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!