वास्तूशास्त्र सांगते की, घरातील किचनचा आपल्या आ’रोग्यावर प्र’भाव पडतो, उपयुक्त माहिती सविस्तर वाचा.

वास्तु शास्त्रानुसार अग्नीदेव, अग्नि म्हणून ओळखले जातात.
भारतीय वास्तुकलेनुसार त्यांचं वास्तव्य घरामध्ये दक्षिण पूर्वेकडे असते आणि आपल्या किचन साठी ते एक आदर्श असे स्थान असते. तसेच यासाठी एक पर्याय घराची ईशान्य दिशा देखील असु शकेल. चांगले आरोग्य ही सकारात्मक आणि आनंदी राहण्याची तसेच समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
आपल्या राहत्या जागेचे वास्तु हे अपणा सर्वांच्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण समृद्धी मिळविण्याकरिता असते.

काही घरांमध्ये चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळे, किंवा तज्ञांच्या सल्ल्यानुसार बांधकाम न केल्याने इतर अनेक वास्तू दोषांमुळे रो’गांचा वारसा हा मिळत असतो जो केवळ काही निवडक व प्रभावी उपायांनी नक्कीच बरा होऊ शकतो.

वास्तुनुसार बनवलेल्या रचनेमुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो आणि आरोग्य, संपत्ती आणि तसेच समरसता मिळते.
प्रत्येक घरात एक तरी किंवा इतरही वास्तू दोष असतात आणि वास्तु या संकल्पनेविषयी माहिती नसलेले बरेच रहिवासी त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या दीर्घ आ’जाराच्या मागचे कारणं त्यांना खरोखरंच कधीही समजत नाहीत.

आपल्या व घरातील इतरांच्या आरोग्याला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काही वास्तु टिप्स –

कधीही जेवण करतांना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करूनच जेवण करावे.

ईशान्येकडील स्वयंपाकघरात स्त्रियांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.

उत्तर-पूर्व म्हणजे वाहणार्‍या पाण्याची जागा आहे, म्हणून पाण्याचा एक तरी स्त्रोत येथे असायलाच हवा.

एक आदर्श स्वयंपाकघर दक्षिण-पूर्वेकडे स्थित असायला हवे.

दक्षिण-पश्चिम भाग चांगल्या आरोग्यासाठी घरातील वृद्ध व्यक्तींना किंवा घराच्या मुख्य मालकासाठी राखीव असला पाहिजे.

झोपतांना नेहमीच आपण दक्षिण किंवा पूर्वेकडे डोकं करुन झोपायची सवय लावावी.

आरोग्यासाठी वास्तु सल्ला कधीही घरातील तुळईखाली झोपू नये तसेच बसूही नये.

शांत झोपेसाठी, मोबाइल फोन आणि इतर कोणतेही गॅझेट तुमच्या बेडपासून दूर ठेवा. तसेच झोपण्याच्या बेडच्या खाली लोखंडी सामग्री ठेवल्याने लोकांच्या आरोग्यास त्रास व्हायला सुरुवात होते.

घरामध्ये बांबूची रोपे वाढवणे अशुभ आहे, म्हणून‌ तसे करण्याचे टाळावे.

घरात कधीही उघडलेले आरसे ठेवू नका आणि लॅपटॉप स्क्रीन तसेच टीव्ही स्क्रीन इत्यादींसह सर्वांना कव्हर करुन ठेवावे.

उत्तर-पूर्वेस हिरवा रंग हा शुभ असतो.

बांधकाम करताना जिन्याखाली ठेवलेल्या जागेचा वापर स्टोरेजसाठी केला पाहिजे परंतु स्वयंपाकघर, प्रसाधनगृह इत्यादी कोणत्याही जागा वापरण्यायोग्य जागा बनवू नका किंवा अडगळीच असं कोणतंही सामान तेथे ठेऊ नका.

स्वयंपाकघर आणि शौचालयाच्या एकदम वर किंवा खाली खोली किंवा इतर कोणतीही वापरण्याची जागा असू नये.

तुमचा झोपण्याचा बेड भिंतीपासून कमीतकमी तीन इंच अंतरावर तरी ठेवावा.

स्वयंपाकघर आणि शौचालय एकत्रितपणे तयार करणे टाळावे तसेच दोन्ही ठिकाणांचे एकमेकांपासून जास्तीत जास्त अंतर आहे याची खात्री करुन घ्यावी.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *