कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत.. अरे स्वामीच तर दिसतात जेव्हा कुणीच दिसत नाही..

 मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाच्या लेख मालेमध्ये तुमचे स्वागत आहे. कोण म्हणत स्वामी दिसत नाहीत… पण स्वामीच तर दिसतात जेव्हा कुणीच दिसत नाही… आणि असाच एक सत्य अनुभव नेहाताई राहणार मुंबई यांना आला. पाहूया नेहाताई यांच्या शब्दात.

मी नेहा, राहणार मुंबई.. ही गोष्ट साधारण दहा ते बारा वर्षांपूर्वीचे आहे. जेव्हा आम्ही आमचे गाव जळगाव येथून मुंबई येथे राहायला आलो. तेव्हा आम्हाला स्वामीबद्दल फार काही माहीत नव्हते. आमच्या नवीन घराजवळ स्वामींचे केंद्र आहे. हळूहळू शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आम्हाला स्वामी समर्थां बद्दल व केंद्राबद्दल माहिती मिळाली.

मी व माझी आई दररोज शेजारच्या बायां सोबत स्वामींच्या केंद्रात जायला लागलो. हळूहळू स्वामी सेवाही करू लागलो. स्वामींनी अनेक अडचणी मधून आम्हाला सोडवले होते. ही प्रचिती आम्हाला हळूहळू येत होती. त्यामुळे स्वामी समर्था वरचा विश्वास अजुनच दृढ होत गेला. इतका की माझी आई रोज संध्याकाळी केंद्रात गेल्याशिवाय जेवत नसे.

माझी आई स्वामींची खूप सेवा करायची. घरातले तिला म्हणायचे की काय सारखे एवढं देव देव करते. मात्र आई त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करी. आईचे मामा आईला नेहमी चिडवायचे काय आहे ग त्या स्वामींमध्ये.? नेहमी स्वामी स्वामी करत असते. आईचे मामांना स्वामीं बद्दल फार काही माहिती नव्हते.

आणि त्यांचा विश्वासही नव्हता. म्हणून ते त्यांना लंगोट वाले बाबा म्हणायचे. परंतु आईने त्यांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. एके दिवशी आईचे मामा सायकल वरून पडले. त्यांच्या डोक्याला चांगलाच मार लागला. नाकातून रक्त येऊ लागले व ते डायरेक्ट कोमात गेले.

घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक उपाय केले. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती. डॉक्टर म्हणायचे आता सर्व देवाच्या हातात आहे. आईची मामी आईजवळ रडायची व सारखी म्हणायची, ‘सांग ना तुमच्या बाबांना तुमच्या मामाला लवकर बरे करा म्हणून.

आई मात्र रोज स्वामी सेवा करायची. संध्याकाळी केंद्रात गेली कि तिथल्या सेवेकरयांकडून सेवा घ्यायची. व ती सेवा नियमित करायची. आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये तिच्या मामाला पाहायला जायची. तेव्हा स्वामींची रक्षा आणि तीर्थ सोबत घेऊन जायची.

डॉक्टर मामाला भेटू देत नसत. आणि असलं काही लावू देत नसत. पण गुपचूप आई आत मध्ये जाऊन त्यांच्या ओठाला तीर्थ लावायची. कोमात असल्यामुळे त्यांना ते पिता येत नसे. आणि पंधराच दिवसात त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली.

मित्रांनो सांगताना आतादेखील अंगाला काटा येतोय. जेव्हा ते कोमातून बाहेर आले. तेव्हा आम्ही सर्व त्यांना भेटायला गेलो. अजून बरेच नातेवाईक होते. मात्र त्यांनी सर्वात प्रथम माझ्या आईकडे बोट दाखवले. आणि डॉक्‍टरांसमोर म्हणाले की, ‘वैशू मला घ्यायला चार लोक आले होते.

मला ते घेऊन जात होते. मी खूप रडत होतो, मला नेऊ नका पण ते माझं काहीच ऐकत नव्हते. तेव्हा तिकडून तुझे लंगोट वाले बाबा आले. त्यांच्या हातात काठी होती. ती त्यांनी ठोकली आणि जोरात म्हणाले, ठेवा रे याला खाली याची अजून वेळ झाली नाही. आणि पुन्हा एकदा त्यांनी काठी ठोकली.

ते चार माणसं पळून गेले. त्यांनीच मला कोमातून बाहेर आणलं,’ हे ऐकून सर्वांना रडूच आवरेना. डॉक्टर देखील अवाक होऊन पाहत होते. ह्या वेळेस आईलाच नाही तर संपूर्ण परिवाराला स्वामींनी त्यांचे अस्तित्व दाखवून दिले. ह्यानंतर त्यांची मुलेदेखील स्वामींची मनोभावे पूजा करु लागले. आणि आमच्या केंद्रात स्वतः त्यांचा मुलगा हा अनुभव सांगण्यास आला होता..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *