लोखंडी कढई आता गं’जणार नाही, प्रत्येक गृहिणीसाठी उपयुक्त माहिती

लोखंडी कढईत रोज अन्न शिजवले पाहिजे असे नाही, पण आठवड्यातून तीन ते चार वेळाही त्याचा वापर केला तर ते चांगले सिद्ध होऊ शकते. आजकाल, टेफ्लॉन कोटिंगसह नॉन-स्टिक कूकवेअर येऊ लागले आहेत, परंतु आपण स्वयंपाक करताना सावधगिरी बाळगली तर हे कुकवेअर खरोखर किती नुकसान करू शकतात हे आपल्याला समजेल. 

लोखंडी कढई योग्य प्रकारे वापरली तर ती नॉन स्टिकचे काम करते . त्यात कृत्रिम पदार्थ नसतात ज्यामुळे अन्नामध्ये अनेक प्रकारची रसायने येतात. अशा प्रकारे, कमी तेलात अन्न शिजवता येते. म्हणजेच, तुमच्या वजन कमी करण्याच्या दिनचर्येत कोणतीही हानी होणार नाही.  

लोखंडी तव्यावर भाकरी भाजणे किंवा लोखंडी कढईत अन्न शिजवणे खूप फायदेशीर ठरू शकते कारण ती एकदा गरम केली की ती बराच काळ गरम राहते. ते नॉन-स्टिक कुकवेअर इ.पेक्षा जास्त गरम राहते.  

लोहाच्या कमतरतेमुळे अनेक आजार होतात. तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारे लोहाची कमतरता असल्यास, लोखंडाच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. प्रौढ स्त्रीला दररोज 18 मिलीग्राम लोह आवश्यक असते. अशा परिस्थितीत लोखंडी कढई खूप मदत करू शकते. परंतू लोखंडी कढई वापरत असताना कढई गंजण्याची समस्या सर्वांनाच येते. म्हणूनच आज आपण यावर एक अप्रतीम उपाय पाहणार आहोत.

जेव्हापासून मी शिक्षणासाठी घरापासून दूर आली आहे, तेव्हा पासून घरी जाता येत नाही. म्हणून मी आईलाच इथे बोलवले. आता आई इथे आली आहे,त्यामुळे आम्ही खूप ,मस्ती करतो आणि खूप गप्पा मारतो. ती आल्यामुळे मला किचनमध्ये थोडी मदत मिळाली. पण,

आज आई सकाळी सकाळी आई माझ्या चिडली. झाले असे कि सकाळी वातावरण खूप चांगले होते, तर मी आईला म्हणाली कि मी तुझ्यासाठी भजी बनवते, तू चहा बनव. जेव्हा आई किचनमध्ये आली तेव्हा तिने भजी बनवण्यासाठी कढई काढली. ती खूपच खराब होती.

त्यामुळे आई म्हणाली कि तू खूप बे’जबाबदार आहेस, भांड्यांचे काय हाल केले आहेत. मी तिला सांगितले कि फक्त माझीच कढई नाही, जगातल्या सर्व लोखंडी कढया अशाच होतात. लोखंड असल्याने गंज तर लागेलच ना. मग तिने ती कढई साफ केली. मग तिने कढई वाळल्यानंतर त्यावर मोहरीचे तेल टाकले.

त्यानंतर तिने ते तेल पूर्ण कढईला लावले. मग तिने सांगितले कि आता बघ यावर गंज चढणार नाही. तिने सांगितले कि जेव्हा लोखंडी कढई धुवून ठेवतो, तेव्हा त्यावर थोडेसे मोहरीचे तेल लावले पाहिजे. यामुळे कढईवर गंज चढणार नाही.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शे’अर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *