लक्ष्मी नारायणाच्या कृपेने कार्तिक महिन्यात ‘या’ राशींना लाभणार प्रचंड पैसा! ४८ तासांनंतर सुरु होणार सोन्यासम दिन…

हिंदू पंचांगानुसार २९ ऑक्टोबरला कार्तिक महिन्याची सुरुवात झाली आहे. कार्तिक महिना हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीला समर्पित असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतांनुसार या महिन्यात कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांनी निद्रेतून बाहेर येतात. या महिन्यात तुळशी पूजेला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाहापासून मग या वर्षातील विवाह मुहूर्त सुरु होणार आहेत. याशिवाय कार्तिक महिन्यात तीन ग्रहांचे गोचर होणार. ३ नोव्हेंबरला शुक्र देव कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्र हा धनाचा कारक मानला जातो. यामुळे शुक्राच्या प्रभावित राशींना येत्या काळात मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. शुक्राच्या राशी परिवर्तनाने नेमक्या कोणत्या राशीला कोणत्या स्वरूपात फायदा अहोऊ शकते हे पाहूया ..

कार्तिक महिन्यात ‘या’ राशींना लाभणार लक्ष्मी नारायणाची कृपा

मेष रास (Aries Rashi Bhavishya)
ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक महिन्यात सुरुवातीला शुक्राचे राशी परिवर्तन झाल्यावर मेष राशीसाठी लाभदायक कालावधी सुरु होणार आहे. या काळात विशेषतः नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. इतकंच नाही तर कामाच्या निमित्ताने तुम्हाला वरिष्ठांच्या साहाय्याने परदेश प्रवास करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. भगवान विष्णू या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात विशेष प्रभावी असणार आहेत. ज्याच्या परिणामस्वरूपात तुमच्या संभाषण कौशल्यात सुधारणा होऊ शकते. घरी सुख शांती नांदू शकते, अशा ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे तुमची आर्थिक मिळकत सुद्धा वाढू शकते.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
शुक्र गोचर मिथुन राशीच्या मंडळींना अनुकूल सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्या कमाईत वाढ होऊ शकते. व्यवसायात तुमची काही प्रलंबित कामे मार्गी लागल्याने श्रीमंती अनुभवता येऊ शकते. वैवाहिक आयुष्यातील सुख समाधान तुमच्या इतर कामांना आणखी उत्साहाने करण्याचे बळ देईल. कर्जातून मुक्ती मिळू शकते. अचानक व अनपेक्षित धनलाभ होण्याचे संकेत आहेत. या काळात बेरोजगारांना समोरून नोकरीची संधी चालून येऊ शकते. भगवान विष्णू व माता लक्ष्मी तुम्हाला धन-संपत्तीसह मानसिक आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत करू शकतात.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
३ नोव्हेंबरला शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करताना वृश्चिक राशीचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. या काळात जुन्या गुंतवणुकीचा मोठा परतावा मिळू शकतो. नव्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकतात. प्रवासाचे योग आहेत, कामाच्या ठिकाणी वेळ वाया घालवणे टाळा. तसेच कोणावरही पटकन विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. दिवाळीचा कालावधी तुमच्यासाठी सोनेरी ठरू शकतो. आई वडिलांच्या रूपात धनलाभाची चिन्हे आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *