तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना नक्कीच ऐकले असेल की, मी प्रेमात पडल्यापासून मला भूक आणि तहान लागत नाही. कित्येक रात्री तर मला झोप सुद्धा येत नाही. तर तेच दुसरीकडे, जेव्हा एखाद्याचे ब्रेकअप होते तेव्हा तो नेहमी दुःखी असतो. मग त्याला कोणतेही काम करावेसे वाटत नाही.
प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे. आणि त्याची अनुभूती ही देखील एक वेगळ्या च पातळीवरची आहे. मात्र, या प्रेमामागेही भरपूर रासायनिक लोचे होत असतात. आणि या सर्व गोष्टी शरीरातील वेगवेगळ्या हार्मोन्समुळे होत असतात. आज आपण त्यांच्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.
काही लव्ह हा’र्मोन्स हे असे असतात. प्रेमापासून ब्रेकअपपर्यंत प्रत्येक परिस्थितीत शरीरात वेगवेगळे हा’र्मोन्स बाहेर पडत असतात. जसे की जेव्हा आपण एखाद्याला पाहतो आणि ती व्यक्ती आपल्याला आवडते तेव्हा अचानक आपल्या हृदयाचे ठोके वाढत असतात. हे या कारणाने घडते कारण आपल्या शरीरात डोपामाइन नावाच्या हार्मोनचे प्रमाण हे अधिक वाढू लागते.
त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको, इत्यादींसोबत असतो तेव्हा आपले हृदय, मन आणि शरीर यांना चांगले, निवांत वाटत असते आणि हे सर्व सेरोटोनिन नावाच्या हार्मोनमुळे होते. तर दुसरीकडे, जेव्हा कोणी आपल्याला प्रेमाने स्पर्श करते तेव्हा शरीरात ऑक्सीटोसिन नावाचे हार्मोन सोडले जात असते. आणि हा हार्मोन दोन व्यक्तींमधील विश्वास आणि प्रेम वाढवण्याचे काम करतो.
ब्रेकअप झाल्यास ऑक्सीटोसिन आणि डोपामाइन या दोन्ही हार्मोन्सचे प्रमाण हे कमी कमी होऊ लागते. त्यामुळे मनातील आनंदाची भावना सुद्धा कमी कमी होत जाते. आणि यामुळे आपल्याला अधिक वाईट वाटू लागते. अनेक वाईट विचार सुद्धा मनात येतात. आणि आपल्याला काहीही चांगले वाटत नाही.
कोणता हा’र्मोन शरीरात काय करतो? हा’र्मोन्स हे आपल्याला आनंदी, दुःखी आणि राग येण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. तसेच शरीरातील प्रत्येक कार्यासाठी एक वेगळा हा’र्मोन असतो. ज्या प्रमाणे सोमाट्रोपिन हार्मोन आपली उंची वाढवते, इस्ट्रोजेन हा एक से’क्स हा’र्मोन आहे जो महिलांमध्ये लैं’गिक इच्छा वाढवतो. तर पुरुषांचे से’क्स हा’र्मोन टे’स्टोस्टेरॉन आहे. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा शरीर डोपामाइन आणि मेलाटोनिन सारखे हा’र्मोन्स सोडते.
मेंदूमध्ये असलेल्या पिनाईल ग्रंथी, स्वादुपिंड, मूत्रपिंड, वृषण, अंडाशय, थायमस, थायरॉईड आणि यांसारख्या ठिकाणांहून सुद्धा हा’र्मोन्स सोडले जातात. आणि याशिवाय मेंदूमध्ये पिट्युटरी ग्रंथी असते. हे शरीरात असणाऱ्या सगळ्या हा’र्मोन्स चे नियमन करतात. आपण असेही म्हणू शकतो की हा’र्मोन्स आपल्या शरीराला आपल्या मनाशी जोडतात. म्हणूनच जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रे’म करतो तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतो.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!