महाशिवरात्रीला नंदीच्या कानात बोला हे दोन शब्द महादेव प्रसन्न होतील, मनोकामना पूर्ण होतील.

हिंदू धर्मशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की, नंदी हा महादेवांच्या गणांमध्ये सर्वात प्रिय आहे. तसेच नंदी हे महादेवांचे वाहनही आहे. दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना केल्याने ती सरळ महादेवन पर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे आणि याचं कारण असा आहे की, महादेव तर नेहमीच समाधिस्थ असतात. त्यामुळे त्यांचा ध्यान भं ग होऊ नये म्हणून अशा परिस्थितीत भक्त नंदीला आपली प्रार्थना सांगतात.

भगवान शिव शंकराच्या मंदिरात प्रवेश करून गाभार्‍यात जाण्या पूर्वी त्यांचे वाहन नंदीदेवाचे आपण दर्शन घेतो आणि मगच पुढे जातो. आपण मंदिरात बघितले असेल की, भक्त भगवान महा देवांचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगतली जाते. भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादासाठी आधी नंदीला खुश करावं लागतं, ही म्हण त्यावरूनच प्रचलित झाली आहे. पण त्याचा नेमका अर्थ काय आणि नंदीचं एवढं महत्त्व का आहे, याची माहिती हिंदू धर्मात सविस्तर सांगितलेली आहे.

नंदी महाराजांच्या कानात प्रार्थना किंवा मनोकामना सांगितल्या नंतर यथावकाश का होईना पण महाराज शिवशंकरलरापर्यंत पोहोचवतात आणि आपली ईच्छित मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. नंदी प्रसंगी महादेवांचे कान ठरतो. कारण कान हे शब्द ऐकून ते मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि मेंदू त्या शब्दांचा अर्थ आणि भावना समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करतो.

त्याचप्रमाणे महादेव समाधीतून उठल्यावर नंदी भक्तांची प्रार्थना, मनोकामना महादेवापर्यंत पोहोचवतात आणि भक्तांच्या कर्मानुसार महादेव त्यांना त्यांच्या इच्छा आणि फळ याचे व्रधान देतात. याचबरोबर एका पौराणिक कथेनुसार, श्रीलाद यांनी ब्रह्मचर्य अनुसरून तपस्या करण्याचा ठरवल. त्यांचे वडील हे पाहून काळजीत पडले. आपला वंश आता पुढे कसा चालणार याची चिंता त्यांना पडली.

श्रीलादना गृहस्थाश्रम स्वीकारण्याची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी भगवान शिवशंकर वंशासाठी तपश्चर्या केली. भगवान महादेव त्यांच्या तपश्चर्यावर संतुष्ट झाले आणि त्यांना जन्म आणि मृत्यू या बंधनातून मुक्त अशा पुत्राचा वरदान दिलं. श्रीलाद मुनींच्या या कठोर तपस्येने प्रसन्न झालेल्या महादेवांनी श्रीलादना असा पुत्र देण्याचा वरदान दिलं.

मग काही काळानंतर जमीन नांगरतांना एक मूल सापडलं आणि त्याचं नाव त्यांनी नंदी ठेवलं. नंतर भगवान महादेवांनी दोन ऋषींना श्रीलाद मुनींच्या आश्रमात पाठवलं, त्यांनी नंदीला पाहून नंदी हा अल्पायुषी असल्याची भविष्यवाणी केली. मग त्यानंतर नंदीला जेव्हा हे समजलं, तेव्हा नंदी महाराजानी मृत्यूपासून मुक्ती मिळवण्यासाठी अरण्यात जाऊन भगवान शिवशंकराचा ध्यान सुरू केलं.

मग भगवान शंकर नंदीच्या कठोर तपस्येने प्रसन्न झाले आणि वरदान दिलं की, नंदी तू मृत्यू आणि भय यांच्यापासून मुक्त असतील आणि तू अजरामर होण्याचा आशीर्वाद दिला. याचबरोबर भगवान शिवशंकरांनी नंदीला भूतगणाचा प्रमुख बनवलं.

अशा प्रकारांनी नंदी नंदेश्वर झाले आणि भगवान शंकर यांनी नंदीला वरदान दिलं की, इथून पुढे जिथे मि राहील, तिथे नंदी असेल. त्यामुळे असं म्हणतात की, तेव्हापासून प्रत्येक मंदिरात नंदीची स्थापना केली जाते. जर नंदीच्या कानात इच्छा सांगितलं गेलं, तर ते नक्कीच महादेवापर्यंत पोहोचतं. नंदीच्या कानात जेव्हा तुम्ही आपली इच्छा सांगतात तेव्हा ती इतर कुणीही ऐकणार नाही याची काळजी मात्र द्यायची असते.

नंदीच्या कानात कधीही कुणाबद्दल तक्रार करू नये, एवढं मात्र खरं. तसंच कुणाचा अनिष्ट सुद्धा चिंतू नये, खोटं बोलू नये. जर तुम्ही असं केलं तर महादेव रागावतील आणि त्याची शिक्षाही तुम्हाला मिळेल. तुम्ही नंदीच्या कानात काही बोलण्यापूर्वी नंदी महाराजांची प्रार्थना नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *