मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2022 रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास म्हणून ओळखला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. सध्या शनिदेव आणि ग्रहांचा राजकुमार बुध मकर राशीत भ्रमण करत आहेत. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हंटले जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशीत तीन ग्रहांचा संयोग होईल. ज्याला त्रिग्रही योग म्हणतात. ग्रहांच्या या अद्भुत संयोगाचा लाभ अनेक राशींना मिळेल. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. जाणून घ्या कोणत्या राशींवर होईल सूर्यदेवांची कृपा-
मेष – या राशीच्या लोकांना सूर्य संक्रमणाच्या प्रभावाखाली प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात काही नवीन जबाबदारी मिळू शकते. वडिलांशी संबंध सुधारतील. सूर्याच्या भ्रमणात सरकारी नोकरी मिळू शकते. मेष राशीच्या ज्या लोकांचा घरगुती व्यवसाय असेल ते त्या व्यवसायाकडे लक्ष देतील. या राशीच्या लोकांना अनावश्यक काळजीपासून मुक्ती मिळू शकते. अनुकूल परिस्थिती राहील. अडचणी दूर होतील. बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जीवनसाशीशी मधुर संबंध राहतील.
मेष राशीचा शासक ग्रह मंगळ आहे. मंगळ आणि सूर्य यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण लाभदायक ठरेल. वैयक्तिक जीवनातील सकारात्मक बदलांमुळे तुमचे नाते सुधारणे शक्य आहे. सरकारी अडथळ्यांमुळे कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणातून मनस्ताप सहन कराव लागू सकतो. नशिबाची साथ मिळेल.
सिंह – सूर्य देव हे सिंह राशीचे अधिपती ग्रह आहे. अशा स्थितीत सूर्याचे भ्रमण तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल किंवा तुमच्या घरी मांगलिक शुभ प्रसंगाचे आयोजन केले जाईल. तुमच्या बौद्धिक क्षमतेचाही विकास होईल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर मकर संक्रांती नंतर त्यांना लग्नासाठी मागणी घालू शकता आणि सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले निकाल मिळू शकतात. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सूर्य संक्रमण फायदेशीर सिद्ध होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना सूर्य संक्रमणाचा लाभ मिळेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. अचानक प्रवास करावा लागेल. प्रसिद्धी, नावलौकिक वाढेल. नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र, आपण परिश्रम करून परिस्थिती आटोक्यात आणाल. वादापासून दूर राहा. मुलाना अपेक्षित संधी मिळेल.
वृश्चिक – सूर्य भ्रमणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वृश्चिक राशीचा प्रमुख ग्रह मंगळ आहे. मंगळ आणि सूर्य यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्याचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमचं मन सुधाराल, तुमची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडाल. लहान भाऊ आणि बहिणींसोबत नवीन कामाला सुरुवात करण्याचा तुम्ही विचार करू शकता. उघडपणे तुम्ही तुमचं गुपीत लोकांशी शेअर कराल आणि इतरांचे बोलणे देखील समजून घ्याल.
धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात विक्री चांगली राहील. मनासारखा पदार्थ खाण्यास मिळेल. नोकरीत चांगली परिपरिस्थिती राहील. महत्वाच्या कामात अडचण येईल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. मकर राशीत भ्रमण करताना सूर्य तुमच्या धैर्याच्या आणि पराक्रमाच्या तिसऱ्या स्थानी विराजमान होईल, म्हणून वृश्चिक राशीच्या लोकांमध्येही धैर्य आणि पराक्रमात वृद्धी होईल. या काळात तुमची कौटुंबिक प्रतिमा सुधारेल. भागीदारीत नवीन कामही सुरू करू शकता.
धनु – तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात सूर्याचे भ्रमण होईल. या काळात तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. यादरम्यान संपत्तीचे योगही तयार होत आहेत. या राशीचे काही लोक त्यांच्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करतांना दिसतील. जर तुमच्या वरिष्ठ व्यक्तीच्या संबंधात काही मतभेद असतील तर तुम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करावा. चांगली बातमी कानावर पडेल. अनपेक्षितपणे एखाद्या कामात यश मिळेल. प्रवासाचा योग येईल. नावलौकिकात भर पडेल
आर्थिक स्थिती सुधारेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते. जे लोक सरकारी नोकऱ्या करतात, त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करत असाल तर परदेशी स्त्रोतांच्या माध्यमातून धनु राशीच्या काही लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांना घवघवीत यश मिळेल. प्रेमात यश मिळेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. खाण्याची चंगळ राहील. नोकरीत चांगली स्थिती राहील.