मित्रांनो उद्या म्हणजेच, 14 जानेवारी 2022 शुक्रवारी मकर संक्रांती हा सण आहे आणि शास्त्रानुसार मकर संक्रांत हा सण अगदी पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या दिवशी जर काही उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर त्यामुळे त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होत असते.
मित्रांनो आपल्या घरामध्ये धनसंपत्ती संबंधित समस्या वारंवार येत असतील त्याचबरोबर आपल्या घरावर कर्ज असेल आणि त्या कर्जाची परतफेड लवकर होत नसेल संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे आपल्यासाठी शुभ ठरेल. आपल्यातील बरेच लोक हे घरामध्ये धनसंपत्ती यावे आणि त्याचप्रमाणे घरांमध्ये सुख-समृद्धी यावी, आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी अनेक प्रयत्न करत असतात, पण अनेकदा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही त्यामुळे आपण वास्तुशास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही उपाय करण्याचा प्रयत्न करत असतो.
आजही आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरातील धन संपत्तीत वाढ होईल आणि घरांमध्ये सुख-समृद्धी नांदेल. आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या वस्तू आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये आणायच्या आहेत.
आज आपण ज्या वस्तू पाहणार आहोत त्या वस्तूंमधील किमान एक तरी वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि जर शक्य असेल तर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी आणायच्या आहेत. यातील सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे उगवत्या सूर्याचा फोटो.
हा फोटो शक्यतो आपल्याला घराच्या हॉलमध्ये लावायचा आहे आणि तो लावत असताना त्याची दिशा उत्तर किंवा पूर्व असावी. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित होईल आणि आपल्या घरात होणाऱ्या पैशांसंबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्याच प्रमाणे आपल्या वर कर्ज असेल तर त्या कर्जाची परतफेड लवकरात लवकर होईल.
यापुढे वस्तू आहे काळे तीळ, मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिले आहे, म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी थोडेसे काळे तीळ खरेदी करून त्याचे दान करावे. जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ दान केले तर आपल्या सर्व समस्या नष्ट होतील. त्याचप्रमाणे आपल्यावर जर शनि दोष असेल तर तोही कमी होईल.
मित्रांनो जर तुम्हाला काळ्या तिळाचे लाडू करणे शक्य असेल तर या दिवशी काळे तीळ घेऊन त्यामध्ये थोडेसे गूळ घालून त्याचे लाडू करून घ्यावे आणि हे लाडूचे सेवन घरातील सर्व व्यक्तींनी करायचे आहे. त्याचप्रमाणे उरलेले लाडू आपल्याला गरजू व्यक्तींना गरिबांना खाऊ घालायचे आहे यामुळे आपल्या घरावरील पैशा संबंधित सर्व समस्या दूर होतील. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबामध्ये जर शनी दोष असेल तर त्याचाही प्रभाव कमी होतो.
तिसरी वस्तू आहे पिवळ्या रंगाचा धागा. मित्रांनो आपल्याला बाजारामध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये अनेक प्रकारचे धागे दिसून येतात त्यापैकी एक पिवळ्या रंगाचा धागा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायचा आहे, हा पिवळ्या रंगाचा धागा आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा गेटवर सात वेळा गुंडाळायचा आहे.
पण मित्रांनो हा धागा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधत असताना तुम्हाला ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः या मंत्राचा सात वेळा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या घरांमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतील.
याच्या पुढील वस्तू आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र. मित्रांनो संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र खरेदी करणे अत्यंत शुभ मानल गेले आहे. तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र खरेदी करणे जमले नाही तर तुम्ही अगदी छोटासा रुमाल ही खरेदी करू शकता पण तो रुमाल पिवळ्या रंगाचा असावा. मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी जर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र खरेदी केले तर यामुळे आपल्या नशिबामध्ये धनप्राप्तीचे योग जुळून येतात.
तर मित्रांनो या काही वस्तू होत्या की ज्यांची खरेदी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायची आहे आणि यांची खरेदी केल्यामुळे आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतील त्याचप्रमाणे घरामधील पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतील.
टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!