होय मित्रांनो, आजच्या लेखात, मानवी आत्म्याचे वजन किती आहे हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आणि आत्मा या प्राचीन श्रद्धेनुसार आपण मानवी आत्म्याचे वजन कसे केले याबद्दल चर्चा देखील करु.
माणसामध्ये आत्मा असतो का? आपल्या मृ’त्यूनंतर तो बाहेर पडतो का? वगैरे प्रश्न आणि त्यासंदर्भातील कल्पना गेली हजारो वर्षं लोकांच्या चर्चेमध्ये असतात. त्याबद्दलचे दावे आणि इतरही अनेक प्रकार सतत होताना दिसून येतात. प्राचिन काळी इजिप्त मधील लोकांमध्ये आत्म्याबद्दल एक समजूत होती.
मनुष्य मेला की तो एका दीर्घप्रवासाला बाहेर पडतो अशी ती समजूत होती. हा प्रवास अत्यंत कठीण असतो, या प्रवासात सूर्यदेवता आपल्या नावेतून व्यक्तीला ‘हॉल ऑफ डबल ट्रुथ’ पर्यंत पोहोचवतो असा तो समज होता. एका संशोधनाच्या परिणामी, आत्म्याचे वजन 21 ग्रॅम आहे, आता त्याचे मोजमाप कसे केले जाते, त्याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
प्राचीन समजुतीनुसार – 1907 मध्ये ‘अमेरिकन सोसायटी फॉर अमेरिकन सोसायटी फॉर सायकोक रिसर्च’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात इजिप्शियन देशातील प्राचीन विश्वासा नुसार, ‘हायपोथेसिस ऑन द सबस्टन्स ऑफ द सोल सोबत एक्सपेरिमेंटल एव्हिडिमेंट फॉथ एक्सिझरन ऑफ रेड सब्जेक्ट’ नावाच्या लेखात, एखाद्या व्यक्तीच्या मृ’त्यूनंतर, त्याच्या आत्म्याशी सं’बंधित प्रयोगाबद्दल बोलले जाते.
इजिप्शियन प्रवादांनुसार या हॉलमध्ये सत्य आणि असत्याचा निवाडा होत असे. आत्म्याचा सगळा हिशेब होऊन त्यावर निर्णय दिला जाई. इथं सत्य आणि न्यायदेवतेच्या लेखणीच्या वजनाची तुलना व्यक्तीच्या हृदयाच्या वजनाशी होत असे. माणसाच्या सर्व चांगल्या वाईट कर्मांचा हिशेब त्याच्या हृदयावर लिहिलेला असतो असं प्राचिनकाळी इजिप्तचे लोक मानत असत.
जर माणसाचं आयुष्य साधं आणि निष्कपट असेल तर त्याचा आत्मा एखाद्या पंखाइतका हलका असेल आणि त्याला ओसिरिसच्या स्वर्गात कायमची जागा मिळेल अशी समजूत होती. इजिप्तच्या प्राचिन समजुतीची माहिती 1907 सालच्या ‘जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी फॉर सायकिक रिसर्च’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधात मिळते.
‘हायपोथेसिस ऑफ द सबस्टन्स ऑफ द सोल अलाँग विथ एक्स्पेरिमेंटल एव्हिडन्स फॉर द एक्झिस्टन्स ऑफ सॅड सब्जेक्ट’ नावाच्या या संशोधनात मनुष्य मेल्यावर त्याच्या आत्म्याशी संबंधित प्रयोगावर चर्चा करण्यात आली होती.
या शोधाशी संबंधित एक लेख न्यूयॉर्क टाइम्सच्या मार्च 1907 च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. यामध्ये आत्म्याचं निश्चित असं वजन असतं असं डॉक्टरांना वाटत असल्याचं म्हटलं होतं. यामध्ये डॉ. डंकन मॅगडॉगल नावाच्या एका फिजिशियनने केलेल्या प्रयोगाबद्दल चर्चा करण्यात आली होती.
1866 साली स्कॉटलंडमधील ग्लास्गोमध्ये जन्मलेले डॉ. डंकन वयाच्या 20 व्या वर्षी अमेरिकेतील मॅसॅच्यूसेट्समध्ये गेले होते. त्यांनी ह्युस्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यातला प्रदीर्घ काळ हेवरिल शहरातील एका धर्मादाय रुग्णालयात लोकांवर उपचार करण्यात घालवला.
त्या रुग्णालयाच्या एका मालकांचा व्यापारामुळे चीनशी संबंध येई. त्यांनी चीनमधून एक वस्तू आणली होती. फेअरबँक्सचा तराजू अशा नावाची ती वस्तू होती. हा तराजू 1830मध्ये पहिल्यांदा बनवला गेला. यामध्ये वस्तूंचं अगदी योग्य वजन सहजगत्या होत असे.
डॉ. डंकन जिथं काम करायचे तिथं ते रोज लोकांचे मरण पाहात असत. हॉस्पिटलमधले वजन मोजायचे यंत्र पाहून त्यांच्या मनात माणसाच्या आत्म्याचं वजन करून पाहावं असा विचार आला. या घटनेनंतर सहा वर्षांनी हा विषय लोकांसमोर आला असं न्यूयॉर्क टाइम्समधील लेखात म्हटलं आहे. “माणूस मेल्यावर त्याच्या शरीरातून आत्मा वेगळा झाल्यावर त्याच्या शरीरात काही बदल होतात का?” असा तो लेख होता.
त्यांच्या संशोधनाचा विषय प्राचिन इजिप्शियन लोकांच्या समजुती ला खरं ठरवणं किंवा इजिप्तच्या देवी-देवतांबद्दल जाणून घेणं हा नव्हताच, पण त्यांची एकूणच मांडणी त्या समजुतींशी सुसंगत होती. इथं आपल्या एक लक्षात येईल ते म्हणजे त्यांनी संशोधना ची सुरूवातच आत्मा शरीरातून वेगळा होतो तेव्हा अशी केली आहे. म्हणजे आत्मा असतो-नसतो यावर त्यांनी शंका उपस्थित केलेलीच नाही. पण त्याला शास्त्रीय स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं मात्र दिसतं.
डॉ. डंकन मॅकडॉगल यांचा प्रयोग – डॉ. डंकन एक अगदी हलक्या वजनाच्या चौकटीचा खास बिछाना बनवला आणि त्या तराजूवर बसवला. त्यांनी तराजूचा तोल इतका व्यवस्थित ठेवला की एक औंस बदलाची नोंदही होऊ शकेल. (एक औंस 28 ग्रॅम इतकं वजन) जे लोक गंभीर आजारी असत किंवा ज्यांची जगण्याची कोणतीच आशा नसते अशा रुग्णांना या बिछान्यात झोपवलं जाई आणि त्यांच्या मृत्यूच्या प्रक्रियेचं निरीक्षण केलं जाई.
शरीराच्या वजनात होणारा बदलही नोंदवला जाई. मृत्यूनंतर शरीरातील पाणी, रक्त, घाम, मल-मूत्र किंवा ऑक्सिजन, नायट्रोजन यांची पातळीही बदलली असेल त्या वजनाही हिशेब ते करत राहात. या संशोधनामध्ये त्यांच्याबरोबर आणखी चार फिजिशियन काम करत होते. ते सर्वजण आपापल्या नोंदी घेत होते.
“जेव्हा माणूस शेवटचा श्वास घेतो तेव्हा त्याच्या शरीराचं अर्धा किंवा सव्वा औंस वजन कमी होतं”, असा दावा डंकन यांनी केला. डंकन म्हणायचे, “ज्यावेळेस माणसाचं शरीर निष्क्रीय होतं, त्या क्षणी तराजूतला स्केल वेगाने खाली येतो. शरीरातून काहीतरी अचानक बाहेर निघून गेल्यासारखं वाटतं”.
डंकन यांनी हा प्रयोग 15 कुत्र्यांवरही करून पाहिला. “मात्र त्यात मृ’त्यूनंतर शरीराच्या वजनात काही बदल झालेला दिसला नाही”, असं ते सांगत. त्यामुळे “माणसाच्या वजनात मृ’त्यूनंतर बदल होतो म्हणजे माणसामध्ये आत्मा असतो आणि कुत्र्यांच्या शरीरात कोणताही बदल होत नाही कारण त्यांच्या शरीरात आत्मा नसतोच” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
संशोधनात आढळून आल्या अनेक त्रूटी – जवळ जवळ सहा वर्षं चाललेल्या या प्रयोगात केवळ 6 प्रकरणंच तपासण्यात आली. तसेच दोन डॉक्टरांच्या नोंदी यात समाविष्टच केल्या गेल्या नाहीत. एक डॉक्टर म्हणायचे, “आमचे स्केल पूर्णपणे अॅडजस्ट झाले नव्हते आणि आमच्या कामावर बाहेर लोकांचा मोठा विरोध होता.” तर दुसरे फिजिशियन म्हणायचे, “हा तपास अचूक नव्हता. एका रुग्णाचा मृत्यू बिछान्यात झोपवल्यावर पाच मिनिटांच्या आत झाला होता. त्याचा मृत्यू झाला तेव्हा तराजू पूर्णपणे अॅडजस्टही करू शकलो नव्हतो.”
म्हणजेच हा शोध केवळ 4 रुग्णांवर आधारित होता. त्यातही तीन प्रकरणांमध्ये मृत्यूनंतर शरीराचं वजन अचानक कमी झालं आणि काही वेळानं वाढलं. चौथ्या रुग्णाचंवजन आधी अचानक कमी झालं, मग वाढलं आणि मग पुन्हा एकदा कमी झालं. डॉ. डंकन आणि त्यांची टीम मृ’त्यूची योग्य वेळ काय होती हे ठामपणे सांगू शकले नाहीत. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता.
खरं सांगायचं झालं तर या शोधाच्या चर्चेमुळे दोन गट पडले. धार्मिक लोकांनी यावरून आत्म्याचं अस्तित्व नाकारलं जाऊ शकत नाही, आत्मा असल्याचा हा पुरावा आहे असं मत वर्तमान पत्रांत मांडलं. परंतु खुद्द डॉ. डंकन यांनी आपल्या शोधावरून काही सिद्ध झालंय याबाबत आश्वस्त नाही अशी भूमिका घेतली. हा शोध म्हणजे अगदी सुरुवातीची चाचपणी आहे यासंदर्भात आणखी संशोधनाची गरज आहे असं ते सांगत.
वैज्ञानिकांनी या शोधातून बाहेर आलेल्या अनुमानाला नाकारलं नाही पण प्रयोगाच्या वैधतेला मात्र नाकारलं. ज्या सहा लोकांवर डंकन यांनी संशोधन केलं होतं त्यातल्या पहिल्या व्यक्तीच्या शरीरात झालेल्या बदलांवर आजही चर्चा होते. याच शोधाच्या आधारावर लोक व्यक्तीच्या आत्म्याचं वजन ¾ औंस म्हणजे 21 ग्रॅम असतं असं सांगतात. डॉ. डंकन यांनी निरीक्षण केलेल्या पहिल्या व्यक्तीमध्ये इतक्या वजनाचा बदल दिसून आला होता.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!