मी कोणालाही कधीही त्रास दिलेला नाही, तरीही देव माझ्यासोबतच असे का करतात? ऐका स्वामीं चे उत्तर

मित्रांनो आपल्या दुखी विचारावर स्वामी समर्थांच्या माहिती कोषा नुसार प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे उत्तर व उपाय पाहणार आहोत. मित्रांनो बऱ्याचदा आपणाला प्रश्न पडतो की मी सरळ मार्गी आहे, मी कोणालाही काहीही त्रास दिलेला नाही, तरीही माझ्या बाबतीत असे का होते? असे आपणाला अनेकदा वाटत असते. यामुळे आपण बऱ्याच वेळी दुखी बनतो. आणि यावेळी आपणाला काही सुचत नाही आपण खूप खिन्न होतो.

मित्रांनो प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा एका ठिकाणाहून जात असता. एकदा माता सीताला प्रचंड तहान लागली. तेव्हा ते ज्या ठिकाणी होते तिथे त्यांना कुठेच पाणी मिळेना किंवा दिसेना देखील. त्यावेळी प्रभू रामचंद्राने पृथ्वी मातेला जलाशय कुठे आहे हे दाखवण्याची प्रार्थना केली. यावेळी तेथे त्यांना एक मोर दिसला. तो मोर प्रभू रामचंद्रांच्या जवळ आला. आणि त्याने प्रभू रामचंद्रांना सांगितले की मी आपणाला जलाशयाचा मार्ग दाखवतो.

प्रभू रामचंद्र यावेळी हो म्हणाले. तेव्हा तो मोर रामचंद्रांना म्हणाला, मी तरी आकाशातून उडत उडत जाणार आणि आपण जमिनीवरुन चालत येणार तेव्हा वाटेत आपली चुकामुक झाल्यास तुम्हाला ही जागा लक्षात येणार नाही नाही किंवा कळणार नाही. यासाठी मी ज्या मार्गाने जात आहे त्या मार्गावर माझे एक एक पंख टाकीत पुढे जातो त्याच मार्गाने तुम्ही या.

आणि या मार्गाने प्रभुरामचंद्र चालू लागले. मात्र मोर पंख टाकण्यासाठी काही विशिष्ट वेळ असते त्या वेळेत मोर स्वतःहून पंख टाकत असतात. आणि तो त्यांच्या इच्छेने ते टाकत असतात. मात्र यावेळी शिवाय मोराचे पंख जर पडू लागले तर त्या मोराचा मृत्यू जवळ येतो असे असते. म्हणून ही गोष्ट प्रभू रामचंद्रांनी त्या मोराला सांगितले.

तेव्हा त्या मोराने सांगितले की, जो जगाची तहान भागवतो. त्याची तहान भागवण्याच भाग्य मला लाभले आहे. मी धन्य झालो आहे. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्या मोराला म्हटले की हे तुझे माझ्यावर चे खूप मोठे ऋण आहे. आणि हे ऋण मी पुढच्या जन्मात तुझे पंख माझ्या शिरावर परिधान करून म्हणजेच डोक्यात घालून फेडीन, आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी आपल्या पुढील जन्मी म्हणजेच श्रीकृष्णाच्या जन्मी मोराचे पंख आपल्या डोक्यामध्ये आपल्या शिरावर परिधान केले आहे.

तर मित्रांनो यामध्ये सांगण्याचे तात्पर्य एवढेच की आपण या जन्मी असो किंवा मागील जन्मी असो ज्या कोणाला पण काही त्रास दिला किंवा ज्याची आपण आतापर्यंत मदत करत आलो किंवा मातीच्या मी मदत करत होतो. त्यानुसार आपणाला या जन्मात परिणाम भोगावे लागत असतात. असं म्हणतात की आपल्या अवतीभवती असणारे सर्व गोष्टी या आपल्या जन्म जन्माच्या साथी आहेत.

उदाहरणादाखल बोलायची झालेले तर अगदी माशी आपल्या अंगावर बसणे हेदेखील एक आपले जुन्या जन्मातील एक नातच असतं. मित्रांनो या विषयावर फार विषयांतर न करता आपण हे जाणून घ्या की आपण गेल्या जनमी काही लोकांना काही जीवांना जो काही त्रास दिला होता तो आता आपणाला भोगावा लागत आहे. आणि जे कोणी आपणाला मदत करत आहे आपल्यावर प्रेम करत आहे त्यांच्याशी आपण मागच्या जन्मी चांगले वागलो होतो हा सर्व अर्थ या स्वामी समर्थ महाराजांच्या विशेष माहिती कोशात सांगण्यात आला आहे.

म्हणून मित्रांनो माझ्याच बाबतीत असे का होते? असे स्वतःला वाटून घेऊन कधीही दुखी किंवा खिन्न होऊ नये. आणि या जन्मी आपण सर्वच गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करावा. कुणालाही त्रास देऊ नये कोणाशीही वाईट वागू नये. हा बोल आपण यातून घेऊ.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *