आपल्या घरात वाद होऊ नयेत असे सर्वांना वाटत असते त्यामुळे जर वाद होत असतील, क्लेश वाढला असेल तर फक्त एक दिवा तुमच्या घरात या ठिकाणी लावा. आपल्या घरात माता लक्ष्मी चे वास्तव्य अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे आपल्याला घरात नेहमी शांती गरजेची आहे. कारण माता लक्ष्मी तिथेच वास करते जिथे लोक प्रेमाने, आनंदाने व समाधानकारक असतात.
परंतु प्रत्येक घरात सुख शांती नांदण्यासाठी प्रत्येकाने तसे वागले पाहिजे, प्रत्येकाने धीराने, विचार करून संयमाने वागले पाहिजे. प्रत्येकजण स्वतःच मत सिद्ध करण्यासाठी धडपड करतोय त्यामुळे घराघरात क्लेश, द्वेष वाढला आहे. आपल्या घरी जर रोज वाद होत असतील, सतत चिडचिड, रागराग होत असेल, आपल्या माणसांबरोबर भांडण होत असेल तर हा उपाय नक्की तुम्हाला लाभदायी ठरेल. हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी नांदते व घर समाधानी राहते. सर्वजण चांगले व शांतीने एकमेकांशी वागतात.
हिंदू पुराणानुसार काही उपाय जर आपण केले तर घरातील वातावरण प्रसन्न राहते व परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते. आपण जसा आपल्या देवघरात दिवा प्रज्वलित करतो तसेच एक दिवा आपल्याला लावायचा आहे. ज्याठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे.
हा दिवा कोणत्याही तेलाने लावला तरी चालतो. शक्यतो मोहरीच्या तेलाचा वापर केला तर उत्तम होईल. दिव्यामध्ये जी वात ठेवाल ती दिव्याला लागून खालच्या बाजूने ठेवायची आहे, असा उपाय केल्याने तुमच्या घरातील भांडण दूर होईल, कटकटी बंद होतील. परंतु जर तुम्ही ही वात वरच्या दिशेने लावली तर भांडणे अधिकच तीव्र होतील, जर मध्ये वरती वात करून लावाल तर वाद अजून चिघळतील व विकोपाला जातील.
घरातील देवपूजा मुख्यश्रीनी केल्यास अधिक लाभ होतो, त्यांनी पूजा करून बाकीच्या सदस्यांनी देवदर्शन घेतल्याने घरातील एकोपा वाढीस लागतो व प्रेम, नाती टिकून राहण्यास मदत होते.
तसेच घरातील लोक जर देवाच्या पाया पडत नसतील तर त्यांना नक्की विनवणी करा, संस्कार करा ज्यामुळे त्यांची प्रगती कायम राहील. असे केल्याने देवाचे आशीर्वाद कायम राहतील.
हा जो उपाय आहे तो आपल्या हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे जो पुराणात आपल्या ऋषींनी आपल्या संसार सुखासाठी सांगितला आहे त्यामुळे याचा कोणताही दुष्परिणाम नाहीये व त्यामुळे कोणतीही शंका न ठेवता करून पहा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!