मित्रांनो जेव्हा आपण देवी-देवतांना नैवेद्य दाखवत असतो तेव्हा त्या नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवल्याने नैवेद्य देवापर्यंत लवकर पोहोचतो. नैवेद्यावर सात्विक होणे आणि त्याच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता जी आहे ती संपून जाते. तर आपण नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवले तर त्यातील नकारात्मकता बाहेर जाते. तुळशीच्या पानाचे नैवेद्यावर ठेवण्याचे वैशिष्ट्य काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू.
मित्रांनो, आपण देवी-देवतांची अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा करीत असतो. देवी-देवतांना आपणाला आशीर्वाद द्यावा यासाठी मनोमन प्रार्थना करीत असतो. देवी देवतासाठी आपण विविध प्रकारचा नैवेद्य देखील दाखवतो. परंतु मित्रांनो नैवेद्य दाखवताना देखील विशेष अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते. नैवेद्य कशाप्रकारे दाखवावा हे आपणाला शास्त्रात सांगितले आहे. तर मित्रांनो देवी देवतांना नैवेद्य दाखवताना कोणती काळजी घ्यायची या विषयीची सविस्तर माहिती आहे मी तुम्हाला आज देणार आहेत.
तुळस ही वनस्पती वायूमंडलातील सात्विकता खेचण्यासाठी खूपच प्रभावी आहे. ब्रह्मांडातील श्रीकृष्ण तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे सूक्ष्म लहरी ग्रहण केल्या जातात. असे हे सूक्ष्म लहरी युक्त तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे देवतेकडून या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात.
असेही तुळशीचे पाण जर आपण नैवेद्यावर ठेवले तर या तुळशीच्या पानाच्या माध्यमातून हा नैवेद्य लवकर देवापर्यंत पोहोचतो आणि देव आपल्यावर संतुष्ट होण्यास मदत होते.
अन्नावर आलेले रज, तम व कण या तुळशीच्या पानांमुळे कमी होण्यास मदत होते. जर आपण देवाला नैवेद्य दाखवत असताना त्या नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवले तर वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या नैवेद्यावर पडत नाही. त्यामुळे नैवेद्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवावे.
तुळस ही प्रत्येकाच्या घरी असतेच. तुळशीमध्ये अनेक देवतांचा वास असतो. तुळस हि खूप पवित्र मानली जाते. या तुळस या वनस्पतीत मुळापासून ते डोक्यापर्यंत अनेक देव वास्तव्य करीत असतात अशी मान्यता आहे. आजूबाजूला असणारे वायुमंडल शुद्ध होण्यासाठी नैवेद्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवावे. नैवेद्यावर भावपूर्ण रित्या तुळशीचे पान ठेवल्याने त्याच्या उपजत गुणधर्मा प्रमाणे देवतांकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करतात.
तुळस याचा स्पर्श, दर्शन, सेवन आपल्या अनेक काळापासून असणारी पापे दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तुळशीच्या आसपासचा परिसर हा खूपच पवित्र असतो. ज्या घरात तुळस आहे त्या घरातील वातावरण कायमच चैतन्यपूर्ण असते.
श्री विष्णूंना अतिशय तुळस प्रिय आहे. तुम्ही जर तुळशीच्या पानान शिवाय श्रीविष्णूची पूजा केली तर ती व्यर्थ ठरते. सुवर्ण, रत्न, मोती यांची फुले जर श्री विष्णूंना अर्पण केली तरी त्याला तुळशीची सर येणार नाही. त्यामुळे तुळस ही श्री विष्णूंना चढवावीच लागते.
तुळशी पत्र म्हणजे तुळशीची पाने ठेवल्याशिवाय श्रीविष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत अशी मान्यता आहे. त्यामुळे नैवेद्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवावे. कार्तिक महिन्यात तुळशीच्या पाण्याने श्रीविष्णूची पूजा करण्याला खूपच महत्त्व आहे. आणि याचा लाभ देखील आपल्याला होतो. श्री विष्णू, श्रीकृष्ण यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. अशी ही तुळस खूपच पवित्र मानली जाते.
अशी ही तुळस खूपच फायदेशीर आहे. याचा आयुर्वेदात देखील खूप चांगला लाभ आपणाला मिळतो. त्यामुळे तुम्ही देखील देवतांना ज्यावेळेस नैवेद्य दाखवतात त्यावेळेस तुळशीचे पान अवश्य ठेवा ज्यामुळे देवी-देवता हा नैवेद्य ग्रहण करून तुम्हाला आशीर्वाद देतील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!