मित्रांनो आजच्या लेखातून आपण असंख्य बोध भेटत आहे की, पुन्हा एकदा स्वामी आपणास आपला विश्वास दृढ करण्याचा हुकूम देत आहे आणि ही समज देत आहे की, जेव्हा आपण स्वामींना तळमळीने प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपणास तथास्तु म्हणून आपले मागणी पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला कोणतेही अविश्वास व भीतीला बळी न पडता.
विवेक जागृत ठेवून हृदयातून जे जे कर्म संख्येने भेटते. त्याचे अतिशय विश्वासाने प्रामाणिकपणे त्याचे पालन करावे. म्हणजे स्वामी आपला कोणत्याही संघटनांमध्ये एकटे सोडणार नाहीत आणि आपल्या भक्तीचे फळ ते नक्कीच आपल्याला एक ना एक दिवस देतील.
मित्रांनो, हा अनुभव गीतांजलि ताई यांचा आहे. ते सांगतात मी माझ्या माहेरी आजी आजोबांबरोबर सातवी आठवी पासून स्वामी भक्ती करत होते. स्वामी चे पुस्तक वाचून त्यांच्याबद्दल ओळख झाली. तसेच ते दत्ता अवतारी असल्याची माहिती मिळाली.माझी स्वामिभक्ती चालू होती. नोकरीला जाताना वाटेत स्वामी मंदिर होते.
तिथे दर्शन घेऊनच मी जायचे. पुढे लग्न झाले तरीही माझ्या घरात सासरी मोठ्या वहिनी सौभाग्यवती विद्याताई वारे या पण स्वामी भक्त आहेत. तर स्वामींची प्रार्थना आम्ही तिन्ही जावा म्हणत असत. पुढे काही कारणाने हे बंद झाले. व माझ्या घरात स्वामींचा फोटो होता. त्यानंतर नवीन घर घेतले. तिथेही स्वामींचा फोटो होता. तसेच आदिमाया
रूपातील हे स्वामींचा फोटो आहे. काही कारणामुळे स्वामींची प्रार्थना बंद झाली. जप वगैरे काही नाही. मग 2014 ला मला स्वामींनी स्वप्नात येऊन आज्ञा केली. की तू स्वामी समर्थांचा जप करत जा बरं का. अशा शब्दात बोलले. पण पुढे मीही काही केले नाही. स्वप्न होते म्हणून सोडून दिले पण
आता या कोरोना काळात स्वामी पुण्यतिथी च्या अगोदर मठातून आदेश आला की कोरणा संरक्षणासाठी स्वामी समर्थांचा जप करावा. संकल्प करून हे संकट जावे यासाठी मग स्वामीनी आदेश दिला म्हणून परत स्वामी सेवा सुरू केली. याच वर्षापासून
स्वामींनी माझी निवड केली जपासाठी. हा संकेत असे सांगतो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय श्री स्वामी समर्थ हा सत्य अनुभव आहे. स्वामींनी मला स्वप्नात येऊन दर्शन दिले. व माझे माहेरची संबंध काही ठीक नाही आहेत काही कारणाने.
याची विचारणा केली यावरून असे सिद्ध होते की त्यांचे माझ्यावर लक्ष आहे. आणि अडचणीतून तेच मार्ग काढतील. घरात आता स्वामी मूर्ती आहे. व त्या मूर्तीवरील भाव इतके छान आहेत. हसरी मुर्ती आहे, पूजा व सेवा केल्यावर जास्तच हसते आणि स्वामी खुश आहेत माझ्यावर व त्यांना त्यांचा जुना भक्त परत मिळाला याचा त्यांना आनंद आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!