दाक्षिणात्य अभिनेत्री ते खासदार; पाहा थेट शिव सेनेशी पंगा घेणाऱ्या नव नीत राणा कोण आहेत?

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना २०१४ साली नवनीत राणा यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरूवात केली. सर्वसामान्य माणसांशी आपुलकीने बोलणे आणि घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणे या कारणांमुळे खासदार राणा या मध्यमवर्गीयांचे नेहमीच जवळच्या खासदार बनल्या.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर टीका करताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोपही खासदार राणा यांनी केला. एक अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या नवनीत राणा यांचा खासदारकीपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा म्हणू या मागणीसाठी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा हे आक्रमक झाले आहेत. शिवसेनेकडून त्यांना विरोध होत आहे. अशावेळी शिवसेनेचा रोष ओढवून घेणाऱ्या नवनीत राणा कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. चला तर मग बघून कोण आहेत नवनीत राणा.

नवनीत राणा यांचे बालपण मुंबईत गेले. नवनीत यांचे आई-वडील हे पंजाबी आहेत. त्यांची लुभाना ही जात आहे. नवनीत यांचे वडील सेनेत अधिकारी होते. बारावीनंतरच त्यांनी मॉडलिंगमध्ये प्रवेश केला. कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरवात केली. याशिवाय त्यांनी तेलगू चित्रपट सीनू, वसंथी आणि लक्ष्मी (2004) मध्येही अभियन केलाय.

रवी राणा आणि नवनीत राणा यांचं लग्न 2011 मध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमात झाले. त्यावेळी रवी राणा हे बडनेराचे आमदार होते. तीन हजार शंभर जोडप्यांचं लग्न त्यावेळी लागलं होतं. त्यात राणा दाम्पत्य होतं. त्यांच्या लग्नात रामदेवबाबा तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते. लग्नानंतर त्या अभिनय सोडून राजकारणात सक्रिय झाल्या.

आनंदराव अडसुळांचा पराभव करून राजकारणात
2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण, त्यावेळी त्या पराभूत झाल्या. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात त्या निवडणुकीत उभ्या होत्या. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार मतांनी पराभव केला. त्यात त्या अमरावती लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्या.

2019 च्या निवडणुकीत अमरावतीची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव होती. नवनीत राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला. दोन लाख रुपयांचा दंडही न्यायालयानं ठोठावला होता. अमरावतीतून अर्ज भरताना त्यांना मोची (चर्मकार) जातीचं प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढविली होती.शिवसेनेवर गंभीर आरोप
मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केलेत. राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता मी मुंबईची लेक आहे. अमरावतीची सून आहे. राज्यात शासनव्यवस्था ढासळली आहे. याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यांनी हनुमान चालीसा म्हणून राज्यावरील संकट दूर करावं, अशी आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री हनुमान चालीसा म्हणत नसतील तर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणू यासाठी त्या आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळं नवनीत राणा या चर्चेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *