नोव्हेंबर महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी कधी? श्रीगणेशाला असे करा प्रसन्न…

संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उपवास आहे. ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते. आश्विन महिन्यातील चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे.

यंदा संकष्टी चतुर्थीचा हा उपवास १ नोव्हेंबरला असणार आहे. हिंदू धर्मात बुद्धी आणि ज्ञानाची देवता गणपतीला विशेष महत्त्व आहे. गणपतीला प्रत्येक कार्यात पहिला मान दिला जातो. प्रत्येक महिन्यात २ चतुर्थीचे व्रत केले जातात. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविक सुख, शांती आणि समृद्धीसाठी श्री गणेशाची पूजा करतात. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची तिथी, पूजा आणि पद्धत…

संकष्टी चतुर्थी तिथी
हिंदू पंचागानुसार संकष्टी चतुर्थी तिथी ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल. तर दुसऱ्या दिवशी १ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल. परंतु, या संकष्टीचे व्रत हे बुधवारी १ नोव्हेंबरला केले जाणार आहे.

शुभ मुहूर्त
गणेश पूजनासाठी (Ganesh Pujan) शुभ मुहूर्त (Muhurt) हा सकाळी ७. ४० मिनिटांनी ते ९. ३१ मिनिटांपर्यंत असेल. तसेच सायंकाळी ७. १० मिनिटे ते ८. २० पर्यंत करु शकता.

संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय
संकष्टी चतुर्थीला सर्वप्रथम आंघोळ करुन नवीन वस्त्र परिधान करावे. त्यानंतर गणेशाला सिंदूर लावून पूजा करावी. सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

तसेच श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला फुले, मोदक आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.

धन (Money) प्राप्तीसाठी संकष्टी चतुर्थीला गणेश स्तोत्राचे पठण करावे. तसेच श्रीगणेशाला जास्वंदीचे फुल आणि दुर्वा अर्पण करावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *