मकर संक्रांत ह्या सणाला काळी झालर का आहे? संक्रांतीला काळे वस्त्र का परिधान केले जातात? वाचा सविस्तर…

प्रत्येक वर्षाच्या 14 जानेवारीला नित्य नेमाने येते ती मकर संक्रात. मकर संक्रात म्हणजे सुर्याचे उत्तरायण सुरु होणे. सुर्याचा मकर राशीत संक्रमण. हा दिवस संपुर्ण भारत खंडात वेगवेगळ्या नावाने साजरा केला होता. लोहडी, बिहु, पोंगल वैगेरे वैगेरे. सक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालून हा सण साजरा केला जातो. हा सण प्रत्येक जण आवडीने साजरा करत असतो.

या दिवशी नववधू आणि बाळाची पहिली संक्रांत अगदी उत्साहाने साजरी केली जाते. हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा केला जातो. ‘तिळ गूळ घ्या, गोड गोड बोला‘ असं म्हणतं सगळ्यांना तिळाचे लाडू आणि हलवा देऊन हा सण साजरा केला जातो. हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो. यदिवशी काळे कपडे घातले जातात काय आहे या मागील कारण जाणून घेऊया..

 
मकर’ हा शब्द मकरराशीला संबंधित आहे, तर ‘संक्रांती’ याचा अर्थ संक्रमण असा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीपासून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशीला सोडून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या वेळेस ‘मकर संक्रांती’ असे म्हणतात.

सूर्याच्या मकर संक्रांतीला महापर्वाचा दर्जा देण्यात आला आहे.  विविध सणांच्या देशातील आणखी एक सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सूर्यदेवांच्या उत्तरायणाच्या आनंदात साजरा होणारा मोठा सण आहे. धार्मिक मान्यतांनुसार, उत्तर दिशा ही देवांची दिशा मानली जाते आणि दक्षिण दिशा ही राक्षसांची दिशा मानली जाते.

या दिवशी देवलोकाचे द्वार उघडते आणि देवतांचा दिवस सुरू होतो. त्यामुळे या दिवशी दानधर्म करण्याचा नियम अनेक वर्षांपासून आहे. या दिवशी केलेले दान पुण्यमय जीवनात सुख-समृद्धी घेऊन येते. असे म्हटले जाते, या जन्मातच नव्हे तर अनेक जन्मांसाठी मकर संक्रांतीच्या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य फळ मिळते.

भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो, मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरूष काळ्या रंगाचा कुर्ता पायजामा परिधान करीत असतात. सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांतीपासून सूर्य मकरराशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे. 

हा सण जरी उत्साहाने साजरा केला जात असला तरी; ह्या सणाला एक दु:खाची तसेच काळी झालर आहे. आपल्या समाजाने संकटाच्या सुरवातीस संक्रात येणे असे संबोधू लागले. कित्येक लोक त्यादिवशी काळे वस्त्र परिधान करुन साजरा करतात. तसे तर ह्या काळ्या वस्त्रास परिधान करण्याकरिता तसे दोन मत प्रवाह असु शकतात. एक भौगोलिक तर दुसरे अंधश्रध्देचे.

भौगोलिक कारण म्हणजे सुर्याचा उत्तरेकडे प्रवास. ह्या उत्तरायणा मुळे हिवाळा कमी होउन थंडी कमी होते. दिवस मोठा तर रात्र छोटी होत जाते. पण ह्या दिवसात थंडी पासुन बचाव करण्याकरीता काळे कपडे वापरले जातात कारण काळा रंग उष्णता खेचुन घेते अन ती राखुन ही ठेवतात.

तसे हे रास्तही वाटते कारण ह्या दिवशी तीळ, गुळ वाटुनही साजरा केला जातो. तीळ आणि गुळ ह्या पदार्थामुळे उष्णता मिळुन थंडी पासुन संरक्षण होते. त्याच प्रमाणे काळे कपडे ह्यादिवसात असणा-या थंडी पासुन रक्षण करण्याकरीताच वापरत असावेत असे वाटते. थंडी पासुन संरक्षण करणे हे भौगोलिक कारण असले तरी अजुन एक समज प्रवाहात आहे तो म्हणजे अंधश्रध्देचा.

कदाचित 1761 मध्ये संक्राती दिवशी पानिपतच्या लढाईत झालेल्या मराठ्यांच्या पराभवामुळे तसेच झालेल्या अपरिमित मनुष्य हानी मुळे मकरसंक्रातीचा दिवस काळे वस्त्र परिधान करुन साजरा करत असु. ह्या दिवशी एका मराठी पिढीचे नष्ट होण्याचे संकट ओढवल्यामुळे मकरसंक्रातीस संकट ओढावणे असे म्हणत असतील.

“पण काहीही असो तुम्ही मात्र तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *