पहा पुणे विद्यापीठातील हे सुंदर घड्याळ, बघा काय विशेष आहे या घड्याळात.

पुणे विद्यापीठातील हे सुंदर घड्याळात प्रत्येक अंकाच्या जागी विशिष्ट शब्द लिहिलेला आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून या सुंदर घड्याळाची माहीती घेऊया.

१.०० वाजण्याच्या स्थानावर ब्रह्म लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की ब्रह्म एकच आहे. “एको ब्रह्म द्वितीयो नास्ति”. २.०० वाजण्याच्या स्थानावर अश्विनौ लिहिलेले आहे ज्याचे तात्पर्य हे आहे की अश्विनी कुमार २ आहेत.

३.०० वाजण्याच्या स्थानावर त्रिगुणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की गुण ३ प्रकारचे आहेत. “सत्वगूण, रजोगूण आणि तमोगूण.” ४.०० वाजण्याच्या स्थानावर चतुर्वेदा: लिहिलेले आहे, तात्पर्य हे की वेद ४ आहेत. “ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद”.

५.०० वाजण्याच्या स्थानावर पंचप्राणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे की प्राण ५ प्रकारचे आहेत. “अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान” ६.०० वाजण्याच्या स्थानावर षड्र्सा: लिहिलेले आहे, याचा अर्थ असा की रस ६ प्रकारचे आहेत. “मधुर, अमल, लवण, कटु, तिक्त आणि कसाय”.

७.०० वाजण्याच्या स्थानावर सप्तर्षय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सप्त ऋषि आहेत. “कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ”.

८.०० वाजण्याच्या स्थानावर अष्ट सिद्धिय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सिद्धि ८ प्रकारच्या आहेत. “अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व”.

९.०० वाजण्याच्या स्थानावर नव द्रव्यणि अभियान लिहिले आहे याचे तात्पर्य हे की ९ प्रकारच्या निधी आहेत. “पद्म, महापद्म, नील, शंख, मुकुंद, नंद, मकर, कच्छप, आणि खर्व”.

१०.०० वाजण्याच्या स्थानावर दशदिशः लिहिले आहे, याचे तात्पर्य हे की दिशा १० आहेत. “पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षीण, आग्नेय , वायव्य, नैऋत्य, इशान्य, उर्ध्व आणि अध”

११.०० वाजण्याच्या स्थानावर रुद्रा: लिहिले आहे, तात्पर्य हे की रुद्र ११ आहेत. “कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुध्न्य, शम्भु, चण्ड आणि भव”.

१२.०० वाजण्याच्या स्थानावर आदित्या: लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की सूर्य १२ आहेत. “अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णु”.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *