अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. परंतु अजूनही अंसख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी ? किंवा स्वामींची पुजा कशी करावी ? याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत. यासर्वाचा विचार करून, त्याविषयी पुढिल विवेचन आहे.
स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मुर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की, स्वामींची मुर्ती घरात ठेऊ नये. कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो, दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते.
रोज नैवेद्य आरती करावी लागते. इत्यादि. इत्यादि. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्विकारतात. गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपूऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावनाच चूकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भिती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामींची पूजा, भक्ति व सेवा करावी.
दूसरी गोष्ट म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी ? कारण स्वामींच्या मुर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल काही लोकांनी निर्माण केलेले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्याची सत्यता तपासून पाहू.
अनंतकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैसमज व त्यावर खुलासा.
1) स्वामींची प्रतिमा (फोटो) फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड (गोटी) असलेली नको. 2) स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. 3) स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. 4) स्वामीं महाराज उभे असलेली प्रतिमा नको.
कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का ? तर मुळीच नाही! वरील सर्व गैरसमज हे धाधान्त खोटे व निर्रथक आहेत, कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांडनायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे त्यांच परब्रह्म स्वरूप व ब्रह्माण्डनायकत्वच अमान्य करण्यासारख आहे.
तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे, आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते, तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात, जिच्यात 33 कोटि देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा हि पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही.
सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोट मधील आपल्या वास्तव्यकाळात ज्या भागीरथी गाईला क्षणभर ही अंतरू दिले नाही, तिच्या मृत्युनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करुण समाधी बांधली. तिच्याच सोबत स्वामींचा फ़ोटो ठेवायला मनाई करणे, जे परब्रह्म आहेत भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत. त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करु नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे.
हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्या पेक्षाही ही मोठा आहे. स्वामींच्या लीलाकाळात श्री बाळापा महाराजापासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत. पण त्यांच कधीच काही अहित झाल नाही.
तर मग त्यांचे कल्याण करुन त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील, असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल ! असो. तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करुण, जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करुण आपले कल्याण करुण घ्यावे, ही नम्र विनंती.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!