ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी सांगितल्या गेल्या आहेत. सर्व राशींचे ग्रह स्वामी भिन्न आहेत आणि या आधारावर सर्व लोकांचा स्वभाव अवलंबून असतो. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाशी आणि प्रकृतीशी संबंधित माहिती ग्रहांमधूनच मिळते. प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण आणि दोष असतात. वेळोवेळी कुंडलीतील ग्रहांची स्थिती बदलते, त्यानुसार व्यक्तीची वेळ देखील अनुकूल आणि प्रतिकूल बनते. आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या स्थानामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. आणि याचा आपल्या जीवनावर परिमाण होत असतो. चला तर जाणून घेऊया जर एकाच राशीच्या दोन लोकांचे लग्न झाले तर त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे असू शकते.
हिंदू धर्मात, लग्नासाठी मुहूर्त पाहणे जितके आवश्यक आहे तितकेच लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांची कुंडली जुळणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, मुला-मुलींच्या राशी समान असल्यास त्याचा परिणाम काय होऊ शकतो याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आज, या लेखात, आम्ही याबद्दल सांगणार आहोत की जर पती-पत्नीला लग्नानंतर माहित झाले की त्यांची राशी समान आहे, तर त्याचा काय परिणाम होतो. किंवा एकाच राशीच्या मुला-मुलीचे लग्न केले पाहिजे की नाही?
मित्रांनो आपण सर्वजण आज काल बघतो की घरात पती-पत्नीचे पटत नाही. सारखी घरात चिडचिड होत असते. भांडण होत असतात. वादविवाद होत असतात आणि हे वादविवाद एवढे वाढतात की नाते तोडायचा विचार होऊ लागतो. असे वाद-विवाद सारखे घरात होत असले की मग भरपूर समस्या, संकटे उद्भवतात. नवरा व्यसनाच्या आहारी जातो. बायको टेन्शन घेऊन घेऊन खचत असते. मुलांकडे लक्ष दिले जात नाही. हे सर्व का होते बरे? कधीकधी या मागचे कारण पती-पत्नीची समान राशी देखील असू शकते.
मेष (ग्रह स्वामी- मंगळ):
मेष राशीचे लोक धै’र्यवान आणि जो’खीम घेणारे असतात. असे म्हटले जाते की हे लोक धाडसी व्यक्तीकडे सहज आकर्षित होतात. ते त्यांच्या जोडीदाराच्या गरजा आणि मागण्यांची खूप काळजी घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ही एक मेहनती राशी मानली जाते, असे म्हटले जाते की जर या लोकांनी एकमेकांशी लग्न केले तर आयुष्य आनंदी राहते.
मिथुन (ग्रह स्वामी- बुध):
मिथुन राशीचे लोक खूप मेहनती आणि मनाने अतिशय तीक्ष्ण असतात. ते आयुष्यात खूप संघर्ष करतात, पण संघर्षाने निराश होत नाहीत, परंतु काहीतरी नवीन शिकत राहतात आणि वेळ आल्यावर त्यांच्या अनुभवांचा योग्य वापर करतात. एकदा त्यांनी जे ठरवले ते मिळाल्यानंतरच ते थांबतात. या राशीचे लोक खूप प्रतिभावान मानले जातात. पण जास्त विचार करण्याची सवय त्यांना अनेक वेळा अडचणीत आणते. म्हणून जर या राशीच्या दोन लोकांनी लग्न केले तर त्यांच्या आयुष्यात आनंदाची कमी असते. याचे कारण असे आहे की ही राशी थोडी शांत, पण अधिक चिंताग्रस्त असल्याचे दिसून येते. हेच कारण आहे की त्यांचे आयुष्य चांगले घालवता येत नाही.
वृषभ (ग्रह स्वामी-शुक्र):
राशीचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे. याच कारणामुळे या व्यक्ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात. यांचा स्वभाव अत्यंत सौम्य असतो. तर दुसऱ्या बाजूने या व्यक्तींना कोणी त्रास दिला तर या व्यक्ती आक्रमक होतात. जर या राशीच्या दोन लोकांनी लग्न केले तर त्यांचे जीवन प्रेममय असते. असे म्हटले जाते की दोघेही प्रेमाने जगतात. त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत कार्यक्षम आणि शुभ मार्गाने व्यतित होते.
कर्क (ग्रह स्वामी- चंद्र):
राशीचे लोक त्यांच्या राशीचा स्वामी चंद्र यांच्यानुसार खूप भावनिक आणि मृदू अंतःकरणाचे असतात. ते प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान आहेत, ते त्यांच्या आवडत्या व्यक्तीला सहजपणे आपले बनवू शकतात. पण कधीकधी ते खूप भावनिक होतात, ज्यामुळे नात्यावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्या जोडीदाराबद्दल खूप भावुक असणे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार या राशिच्या दोन लोकांचे लग्न झाले तर त्यांच्यामध्ये अधिक वाद होतात आणि चिंता वाढते.
सिंह (ग्रह स्वामी- सूर्य):
सिंह राशीचे लोक खूप उत्साही आणि प्रेमळ असतात. ते आपल्या प्रेमाची खूप काळजी घेतात आणि खुल्या अंतःकरणाने आपले प्रेम दाखवतात. एक चांगला जीवनसाथी होण्यासाठी त्यांच्यामध्ये सर्व गुण असतात. ते पूर्णपणे सहाय्यक, शक्तिशाली आणि मैत्रीपूर्ण असतात. जर सिंह राशीच्या दोन लोकांचा विवाह झाला तर काही परिस्थितींमध्ये वाद होऊ शकतात, परंतु सहसा त्यांचे जीवन आनंदी राहते.
कन्या (ग्रह स्वामी- बुध):
कन्या राशीच्या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षी असतात. भावुकही असतात आणि विचार न करता मनाला पटेल ते काम करतात. या राशीच्या अधिक व्यक्ती संकुचित, लाजऱ्या आणि झिडकारून टाकणाऱ्या असतात. जर कन्या राशीच्या दोन लोकांनी लग्न केले तर त्यांच्यामध्ये असंतोषाची भावना असते.
तुळ (ग्रह स्वामी- शुक्र):
या राशीचे लोक बुद्धिमान असतात. तरीही यांना जीवनात अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या असतात. पण ते अतिशय कडक स्वभावाचे असतात आणि मेहनतीला घाबरत नाहीत. तथापि, या लोकांमध्ये एक वाईट सवयही असते, त्यांना नेहमी इतर लोकांचे लक्ष त्यांच्याकडेे असावे असे वाटते. या राशीचे लोक त्यांच्या जीवनात आनंदी राहणारे असतात. यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.
धनु (ग्रह स्वामी- गुरु):
या राशीचे लोक खूप विचार करतात. त्यांची स्वप्ने खूप मोठी असतात. त्यामुळे ते पटकन समाधानी होऊ शकत नाहीत. कधीकधी त्यांना संघर्ष करत असताना थकवा जाणवतो, पण ते स्वतः पुन्हा प्रेरित होतात. त्यांना जीवनाचे सत्य चांगले समजते आणि म्हणूनच ते कठोर परिश्रम करतात. त्यांचा देवावर खूप विश्वास असतो आणि म्हणून जेव्हा ते कोणतेही काम सुरू करतात तेव्हा ते काम पूर्ण सकारात्मकतेने करतात आणि जीवनात मोठी उंची गाठतात. जर धनु राशीच्या लोकांनी या राशीच्या व्यक्तीशी लग्न केले तर त्यांचे आयुष्य आनंदी राहते.
वृश्चिक (ग्रह स्वामी- मंगळ):
या राशीचे लोक बुद्धिमान आणि भावुक असतात. यांची इच्छाशक्ती प्रबळ असते तसेच स्वभावाने हट्टी व अतिमहत्त्वाकांक्षी असतात. थोडीफार स्वार्थी प्रवृत्तीही असते. स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांची सवय असते. नोकरीमध्ये नेहमी स्वत:चे वर्चस्व कायम ठेवतात. जर या राशीच्या दोन लोकांचे लग्न झाले तर त्यांच्यामध्ये अनेक वाद होतात. एवढेच नाही तर चिंता आणि तणावाला सामोरे जावे लागते.
मकर (ग्रह स्वामी- शनी):
राशीचे लोक त्यांच्या कर्मामुळे संघर्ष करतात. चांगली विचार करण्याची क्षमता असूनही, आळशीपणाची सवय त्यांना अनेक वेळा मागे ढकलते. अगदी सहजपणे साध्य करता येणाऱ्या गोष्टींसाठीही त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. या राशीच्या लोकांचा आळस त्यांच्यावर मात करतो. जर मकर राशीच्या लोकांनी या राशीच्या लोकांशी लग्न केले तर त्यांचे जीवन आनंदी राहते आणि त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होते.
कुंभ (ग्रह स्वामी- शनि):
या राशीचे लोक नम्र आणि साध्या स्वभावाचे असतात. कुंभ राशीच्या लोकांना घाईघाईने गोष्टी करायला आवडत नाहीत आणि त्यांना स्वतःचा गोड वेळ घालवणे आवडते. या राशीचे लोक मेहनती असतात. जर या राशिच्या दोघांनी लग्न केले तर त्यांचे आयुष्य आनंदात व्यतीत होते.
मीन (ग्रह स्वामी- गुरु):
असे म्हटले जाते की मीन राशीचे लोक स्वप्न पाहणारे असतात. ते कल्पनेच्या जगात हरवून जातात. ते एखाद्याच्या चांगल्या वागण्याने आकर्षित होतात. मीन राशीचे लोक सौ’म्य, संगोपन करणारे, उ’त्स्फूर्त, नि’स्वार्थी आणि दयाळू असतात. हे गोड बोलणारे सौम्य आणि नम्र असतात. जर मीन राशीच्या लोकांनी या राशीच्या व्यक्तीशी लग्न केले तर त्यांचे वै’वाहिक जीवन आनंदी राहते.