पिठाच्या डब्यात ठेवा ही वस्तू, पैशांच्या सर्व समस्या दुर होतील, घरात पैसा टिकू लागेल..!

अनेकदा असे होते की आपल्या गरजा कमी केल्यानंतर खर्च काही कमी होत नाही. पैसे नेमके कुठे खर्च होत आहेत हेच कळत नाही. अशात स्थितीत तुमची वास्तू तुम्हाला मदत करू शकते. तुमच्या घरातही पैसा टिकत नाही आहे तर वास्तुच्या दृष्टीने काही उपाय करणे गरजेच असते. जाणून घ्या अशाच काही वास्तू टिप्स ज्यामुळे तुमची केवळ बचतच होणार नाही तर तुमचा पगारही तुम्हाला दिसू लागेल. 

जर घरात पैसा टिकत नसेल तर हे उपाय तुम्हाला मदत करतील –
घरात कितीही पैसे आले तरी ते टिकत नाहीत. घरात पैसा येतो पण तो खर्च व्हायला वेळ लागत नाही. खूप मेहनत करूनही भविष्यासाठी पैसा जमला नाही तर मानसिक तणाव सुरू होतो. परंतु ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगितले गेले आहेत, जे करून तुम्ही तुमचे बहुतेक उपाय मिळवू शकता. लाखोंच्या मेहनतीनंतरही कामात यश येत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर या उपायामुळे तुमची समस्या कायमची दूर होईल.

पैसाची आणि पैशे ठेवण्याच्या स्थितीची देखभाल केल्यास आर्थिक स्थिती बळकट होण्यास मदत होते. जर पैशांची योग्यप्रकारे देखभाल न केल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. चला त्या ज्योतिषीय उपायांबद्दल जाणून घेऊया …

सर्व इच्छा पूर्ण होतील – तुम्ही कोणत्याही महिन्याच्या पाडव्यापासून कागदी पैसे घेऊन त्यावर लाल धागा बांधावा आणि राधा-कृष्णाच्या मूर्ती किंवा फोटोच्या मागे ती नोट लपवून ठेवावी. यानंतर, आपली इच्छा देवाला सांगा. अशा प्रकारे, सलग 41 दिवस समान रकमेची नोट ठेवा आणि आपली इच्छा व्यक्त करा. यामध्ये एकही दिवसाची चूक होणार नाही याची काळजी घ्या. असे केल्याने देव तुमची इच्छा पूर्ण करेल. यासोबतच तुमच्या घरात पैसाही टिकू लागेल.

आर्थिक अडचणी दुर होतील – प्रत्येक व्यक्तीला आर्थिक भरभराट हवी असते. प्रत्येकाला वाटते की, त्याचे खिसे पैशानी भरलेले असावेत परंतू पैसे येण्याची स्थिती नेहमी एकसारखी असत नाही. वास्तू शास्त्राच्या मते, पैसे ठेवण्याची पद्धत पैसे टिकतात की नाही हे दर्शवते.

कोणत्याही शुभ मुहूर्तावर सकाळी लवकर उठून लाल रेशमी कापड घ्या आणि त्यात तांदळाचे २१ अखंड दाणे बांधा. यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करा व त्यात कापडात बांधलेले तांदूळ देखिल ठेवा. पूजेनंतर, देवीला तुमची इच्छा सांगा आणि ते तांदुळ तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील.

घरात सुख-शांती नांदेल – ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सर्वात आधी पिंपळाला पाणी अर्पण करून लक्ष्मी मंत्राचा जप करावा. असे केल्याने हळूहळू सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि घरात आनंद आणि शांती राहील.

घरात पैसा टिकू लागेल – ज्या डब्यामध्ये तुम्ही पीठ ठेवतात त्या डब्यामध्ये 5 तुळशीची पाने आणि 2 केशरचे दाणे ठेवा. लक्षात ठेवा की पीठ शनिवारीच दळले पाहिजे आणि त्यात हरभरा जरुर मिसळला पाहिजे. असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तसेच घरामध्ये पैसाही टिकू लागेल.

घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल – घरात वाद, कटकटी , आजार वाढत असतील तर नाकारत्मक ऊर्जेमुळे सकारात्मक ऊर्जा कमी होत असते. आपल्या घराचे चुकीचे बांधकाम ,चुकीची रचना यामुळे हे दोष निर्माण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार दररोज घरी कालिका मातेची पूजा करावी आणि शुक्रवारी कालिका मंदिरात जाऊन धूप, दिवा लावून नैवेद्य दाखवावा. तसेच, कालिका मातेची स्तुती करावी आणि तुमची इच्छा व्यक्त करावी. असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा संपेल आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.

याचबरोबर ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता, साधू, गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते. जी स्त्री नियमितपणे गोग्रास (गाईसाठी घास) बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते.

ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो, ते केरात टाकले जात नाही, पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते. पर्यायाने घरात पैसा टिकू लागतो.

संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही घर झाडू नये. कारण संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते म्हणून संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. तसेच शुक्रवार लक्ष्मीचा दिवस आहे म्हणून जर शुक्रवारी एखादी सौभाग्यवती स्त्री आपल्या घरी आली तर लक्ष्मीस्वरूप समजून तिला काहीतरी खायला द्यावे किंवा जेवण करायला सांगावे आणि परत कुंकू लावून तिला नमस्कार करावा.

तसेच, आवळ्याच्या झाडांमध्ये गायीच्या शेणात, कमळामध्ये तसेच पांढऱ्या वस्त्रांमध्ये देवी लक्ष्मी सदैव वास करते. ज्या घरांमध्ये देवादीदेव महादेवांचे पूजन केले जाते, तसेच ददेव-देवता, साधुसंत, गुरु, महात्मे यांचा मान सन्मान केला जातो अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी चिरंतन वास करते. आणि आपल्या आर्थिक अडचणी दुर होतील.

जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, अति प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते. यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी येतात.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *