श्री स्वामी समर्थ प.पु. श्रीगुरुमाऊलींनी त्यांच्या ईश्वरीय वाणीतून केलेल्या अमृततुल्य हितगुजामधून व त्यांच्या दैवी लेखणीतून निर्मित ज्ञानदान ग्रंथा (भाग १) मधून वेचलेले सारांशरुपी शब्दा मृत.
आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचे, प्रश्नांचे, संकटांचे तसेच दुर्धर समस्यांचे मूळ म्हणजे प्रखर पितृदोष होय.
दीर्घायुरारोग्य, पूर्ण आयुष्य, यश, बल ,कीर्ती,तेज, धन, पुत्र, संसारसुख, मानसन्मान,व हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश ई. सर्व गोष्टी केवळ पितर कृपेनेच प्राप्त होतात.
गत 42 पिढ्यातील सर्व पितरांची कृपा प्राप्तीकरता केल्या जाणाऱ्या मोजक्या प्रभावी व त्वरित फलदायी सेवांपैकी एक सेवा म्हणजे श्री भगवान श्रीकृष्ण यांचे जीवनचरीत्र असलेला ग्रंथ श्री भागवत महापुराण ग्रंथाचे वाचन मनन चिंतन व पठण होय. असे श्री स्वामी समर्थ श्री गुरुमाऊली आपणास हितगुजामधून नेहमीच सांगतात.
आपल्या कुळाचे मुख्य रक्षक म्हणजे आपले पूर्वज म्हणजेच पितरच आहेत. त्यांच्या कृपेने सर्व सांसारिक सुखाचा लाभ होतो. पितरांच्या कृपेशिवाय आपली कुलस्वामिनीदेवी व कुलदैवत सुद्धा आशीर्वाद देऊ शकत नाहीत. त्यात अडथळे येतात. म्हणूनच दररोज आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम पितरसेवा नंतर कुलदेवी नंतर कुलदैवत सेवा व शेवटी आपले इष्ट दैवत म्हणजे परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा असा भारतीय धर्मशास्त्रानुसार सेवेचा शास्त्रोक्त क्रम आहे.
पितरांची शास्त्रशुद्ध सेवा आपल्याकडून झाली नाही तर सर्व ठिकाणी अपयश दुःख आजारपण व्यवसायात नुकसान मानसीक आजार व उदासपणा अनुभवास येऊ शकतो.
या ग्रंथाच्या पारायण सेवेमुळे आपल्या पूर्वजांच्या सदगतीसाठी पुण्याचा साठा उपलब्ध होतो व ते पुण्य प्राप्त करून आपले पूर्वज म्हणजे पितर योग्य ठिकाणी सदगतीस जातात व आपल्या वंशजांना म्हणजे तुम्हा आम्हाला आनंदीत होऊन सर्वतोपरी आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादाने आपली भरभराट सुरू होते. हा केवळ शास्त्राधार नाही तर कोट्यवधी सेवेकर्यांचे गेल्या 50 वर्षातील ज्वलंत अनुभव आहेत.
या पूर्वी या ग्रंथाचे एक महिन्याचे किंवा पंधरा दिवसाचे किंवा सात दिवसांचे पारायण करायचे म्हटल्यास रोजचे किमान 2 ते 4 तासांचा वेळ लागत असे. मागच्याच २०२० वर्षी आपण सप्टेंबर महिन्यात भागवत सप्ताहात ऑनलाईन युट्युब वर पारायण कर ताना हे अनुभवले आहे. या कारणास्तवच कोट्यवधी सेवेकऱ्यांना कमीत कमी वेळेत रोज काही तासात सेवा करता यावी म्हणून श्री स्वामी रुपी श्री गुरुमाऊली यांनी आपल्या ईश्वरीय अधिकारात या 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाची निर्मिती केली आहे.
प.पु. श्री गुरुमाऊली आपल्या हितगुजामधून हेच नेहमी सांगतात की जन्मजन्मांतरीचे शाप ताप दुःख दैन्य व पिढ्यान्पिढ्याचा पितृदोष निवारण करण्यासाठी एकमेव रामबाण उपाय म्हणजे मनोभावे श्रीमदभागवत या ग्रंथाचे वाचन पठण किंवा पारायण करणे हे होय. जो हा ग्रंथ वाचतो तो जन्मजन्मांतरीच्या शापातून मुक्त होतो.
या नवीन ग्रंथामुळे सर्व सेवेकर्यांचा अनेक तासांचा व दिवसांचा बहुमोल वेळ वाचणार आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पितर सेवा घडून त्यांचे पितर सेवेबंधातील प्रश्न तात्काळ सुटण्या स मदत होणार आहे. तरी सर्व भाविक सज्जन व स्वामी सेवेक-यां नी या नवीन 700 श्लोकी सुलभ संक्षिप्त भागवत ग्रंथाची पाराय ण सेवा जास्त संख्येने करून आपले जीवित सुखी करावे ही नम्र विनंती. ‼️ श्री स्वामी समर्थ आधार जीवांचा श्रीगुरुमाऊली ‼️
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.