हिंदू धर्मात होळीला विशेष मानले जाते. हा एक महत्त्वाचा सण आहे. पंचांगानुसार होळी हा सण फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. पंचांगानुसार, होळी दहन गुरुवार, 17 मार्च 2022 रोजी केले जाईल. 18 मार्च 2022 रोजी रंगपंचमी खेळली जाईल. होळीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी अमलात आणा खालील साधे उपाय, उपाय जाणून घेऊया.
उत्तम आरोग्यासाठी – आरोग्यात सुधारण्यासाठी होळी दहनानंतर त्याची उरलेली राख आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवावी. हा उपाय केल्याने जुन्याहून जुना आजार बरा होण्यास मदत मिळते.
धन वाचवण्यासाठी – जर पैशांची बचत होत नसेल तर होळीच्या दहनच्या दुसर्या दिवशी होळीची राख एखाद्या लाल रुमालात बांधून घ्या आणि त्याला आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा.
नोकरी किंवा व्यवसायात अडचणी – नोकरी किंवा व्यापारात अडचण येत असल्यास होळिका दहनानंतर 1 जटा असणारे नारळ मंदिर किंवा होळिका दहन असणार्या जागेवर ठेवावे.
वाईट दृष्टीपासून बचावासाठी – होळी जाळल्यानंतर दुसर्या दिवशी ती *राख पुरुषांनी तिलक म्हणून लावावी तसेच स्त्रियांनी ही राख आपल्या मानेवर लावावी. हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या वाईट दृष्टीपासून बचाव होऊ शकतो.
धन लाभासाठी – होळी दहनाच्या वेळेस कुटुंबातील सर्व सदस्यांना होळिकेच्या तीन किंवा सात प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. प्रदक्षिणा घालताना होळीत चणे, मटार, गहू, अळशी टाकायला पाहिजे. असे केल्याने आरोग्य उत्तम राहतं आणि धनलाभाचे ही योग बनतात. या छोट्याशा स्वामीसेवेने आत्मीक समाधान आणी मानसिक आनंद मिळतो.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!