राहू – केतूच्या वाईट प्रभावापासुन मुक्त असतात या राशीचे लोक, जीवनात भरपुर प्रसिद्धी मिळवतात, तुमचीही रास यात समाविष्ट आहे का?

मित्रांनो, आपल्या जोतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत तिसऱ्या स्थानी राहु-केतु असेल, तर ते शुभ मानले जाते. कुंडलीतील तिसरे स्थान बळ आणि पराक्रमाचे मानले गेले आहे. आपल्या जन्मकुंडलीत तिसऱ्या स्थानी राहु-केतु असेल, तर अजिबात घाबरता कामा नये. उलट आनंद वाटायला हवा.

आपल्या ज्योतिषशास्त्रात नवग्रहांच्या भ्रमणाला, राशी परिवर्तना ला अतिशय महत्त्व आहे. एका ठराविक कालांतराने नवग्रह राशी बदल करत असतात. नवग्रहातील केवळ दोन ग्रह कायम वक्री चलनाने राशीपरिवर्तन करतात, ते म्हणजे राहु आणि केतु.

ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतु हे पापकारक, क्रूर आणि छाया ग्रह मानले जातात. यंदाच्या वर्षी 17 मार्च रोजी राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह एकाच दिवशी राशीबदल करतात आणि एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. या दोन्ही ग्रहांचा केवळ संबंधित राशीच्या व्यक्तींवर नाही, तर देश तसेच जागतिक पातळीवरही मोठा प्रभाव पडू शकतो, असे ज्योतिष सांगते.

त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. महामारी, भयंकर आजार विक्राळ रुप धारण करतात, असे म्हटले जाते. राहु-केतुची वक्री दृष्टी पडल्यास संबंधित व्यक्तींचे अच्छे दिन संपुष्टात येतात, असे मानले जाते.

मात्र, काही व्यक्तींच्या जन्मकुंडलीत विशिष्ट स्थानी राहु-केतु असतील, तर त्याचा अशुभ वा प्रतिकूल प्रभाव पडत नाही.आणि या उलटपक्षी, राहु-केतुची कृपादृष्टी होऊन शुभ परिणाम प्राप्त होतात. तसेच राहु-केतुच्या शुभ स्थानामुळे लाभाचे प्रमाण वाढते, असे सांगितले जाते.

या स्थानी असलेले राहु-केतु बल आणि पराक्रमाच्या माध्यमातून जीवनातील ध्येयप्राप्त करण्यासाठी पाठबळ देतात. अशा व्यक्ती मल्ल, बॉडी बिल्डर क्षेत्रात भरपूर नाव, प्रसिद्धी मिळवतात. यातच करिअर करतात, असे सांगितले जाते. या स्थानी असलेले राहु-केतु व्यक्तीला स्वावलंबी, महत्त्वाकांक्षी तसेच दृढ संकल्प बनवतात, असे ही म्हटले जाते.

आणि त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीतील सहाव्या स्थानी राहु-केतु असतील, तर ते चांगले मानले जाते. कुंडलीतील सहावे स्थान शत्रूचे मानले गेले आहे. या स्थानी राहु-केतु विराजमान असेल, तर कितीही आणि काहीही झाले तर शत्रू आपले काहीच बिघडवू शकणार नाही, असे सांगितले जाते.

जन्मकुंडलीत सहाव्या स्थानी राहु-केतु असेल, तर अशा व्यक्ती ऊर्जेचा एकदम पूरेपूर आणि योग्य पद्धतीने वापर करून यश आणि प्रगती साध्य करतात. अशा व्यक्ती मोठे आणि महत्त्वाचे निर्णय क्षणार्धात घेतात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यांना बहुतांश वेळेस विजय प्राप्त होतो. मात्र, अशा व्यक्तींनी आर्थिक व्यवहार करताना नेहमीच सावधगिरी बाळगावी, असे सांगितले जाते.

ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीतील दहाव्या स्थानी राहु-केतु विराजमान असतो, अशा व्यक्ती जीवनात भरपूर यश आणि प्रगती साध्य करतात, असे म्हटले जाते. अशा व्यक्ती राजकीय आणि सरकारी क्षेत्रात कार्यरत असल्यास यशाची उत्तुंग शिखरे सर करू शकतात, असे सांगितले जाते.

अशा व्यक्तींमध्ये उत्तम नेतृत्व गुण असतात आणि हाती घेतलेल्या बहुतांश कामात यांना यशप्राप्ती होते. अशा व्यक्ती अधिक प्रमाणात पैसे खर्च करत नाहीत. बचत करण्यात या व्यक्ती माहीर असतात. या व्यक्तींचा स्वभावच अनेक लाभ मिळवून देत असतो. अशा व्यक्ती कठोर मेहनत करतात आणि त्याचे फळ त्यांना निश्चित मिळते, असे सांगितले जाते.

त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत अकराव्या स्थानी राहु-केतु असेल, तर ते शुभ फलदायी मानले जाते. कुंडलीतील अकरावे स्थान व्ययाचे मानले गेले आहे. राहु-केतु या स्थानी विराजमान असले, तर या व्यक्तींचा अशा क्षेत्राशी संबंध येतो, जेथे पैसे दुपटीने परत मिळतात.ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे गुंतवणुकीतून यांना भरघोस लाभ मिळतो.

व्यापार, व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अशा व्यक्तींना उत्तम यश आणि लाभ मिळतो, असे सांगितले जाते.ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मेष, वृषभ आणि कर्क यात केतु असतो, त्यांना शुभ परिमाण मिळतात. उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात, असे मानले जाते.

केतुच्या भक्कम पाठबळामुळे प्रत्येक कार्यात यांना यशप्राप्ती होते आणि वैवाहिक जीवन सुखमय होते, असे सांगितले जाते. आणि त्याचबरोबर राहु-केतु हे दोन्ही ग्रह दर 18 महिन्यांनी राशीबदल करतात आणि सन 2021 नंतर आता सन 2022 मध्ये राहु आणि केतु राशीपरिवर्तन करत आहेत. राहु मेष राशीत, तर केतु तूळ राशीत पुढील 18 महिन्यांपर्यंत विराजमान असतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *