आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम् अभिराम स्त्रिलोका नां राम: श्रीमान् स न: प्रभु, रामरक्षा स्तोत्र. रामनवमी पर्वात घरोघरी पठण होत आहे. प्रत्यक्ष शंकरानी बुधकौशिक ऋषींना सांगितलेले त्यांनी लिहलेले हे स्तोत्र.
भारतीय संस्कृतीत जगण्याचा अर्थ म्हणजे “राम” एवढे या राम शब्दाचे महात्म्य. दिवसातील पहाटेचा आनंदी प्रहर म्हणजे “रामप्रहर”. जीवनाच्या अंतीम समयीही साथ देणारा “राम” च.
कल्पवृक्ष जो सर्व इच्छापूर्ती करतो. श्रीराम हे तर कल्प वृक्षांचा सुंदर बगीचाच आहे. सर्व आपत्ती निवारणारा त्रैलोकामधे सुंदर असलेला असा हा आमचा प्रभूराम. आनंदी जीवनासाठी भक्तीमार्गात सर्वगुणसंपन्न आदर्श अशा श्रीरामाची भक्ती सांगितली आहे.
रामायण वाचन. श्रवण सोबतच कुठे रामरक्षा तर कुठे गोस्वामी तुलसीदासांचे रामचरितमानस वाचले जाते. यामधील लयबद्ध.. नादमय शब्द वाचनाचा आनंद आगळा.
संत तुकोबा समर्थ रामदास संत गोंदवलेकर महाराज यांनीही रामनाम महात्म्य समजावलेय. रामनाम जपाने जीवनात सकारात्मकता निर्माण होते. आत्मबल वाढते मनःशांती लाभत मन आनंदी होते.
प्रारब्धाचा सामना करणारा राजा दशरथ परमेश्वराला शरण गेला. दैवी संकेताप्रमाणे गुरुजनांच्या सल्ल्याने राजाने अश्वमेध पुत्रकामेष्टी यज्ञ आरंभला. सभोवतालच्या अभद्र असूरी शक्तीचा विनाश करुन हा यज्ञाचा वारु दिग्विजयी झाला.
राजाच्या या पराक्रमाने समाजातील पापींचा विनाश झाला. यामुळे जनमानस आनंदले. देवताही सुखावून संतुष्ट झाल्या. वेदमंत्रोचाराने आणि समिधांच्या आहूतींनी अयोध्यानगरीत शुद्ध वारे वाहू लागले. या प्रसन्नतेत यज्ञातून तो अग्निपुरुष श्रीविष्णूंचा प्रसाद घेवून प्रकटला.
आता या भारतभूमिवर इतिहासाची सुवर्ण पाने लिहली जाणार होती. एकच नाही चार बालके राजाच्या घरी जन्म घेणार अशी भविष्यवाणी त्या अग्निपुरुषाने केली. या सुखवार्तेने राजाचे डोळे पाणावले, कारण.. कारण आता राजा दशरथाला अयोध्या नगरीलाच नाही तर समस्त देशाला दिशा देणारे चार राजपुत्र जन्माला येणार होते.
राजाच नाही अयोध्यानगरीच नाही तर पंचक्रोशी या आनंदी वार्तेने सुखावली. ही वार्ता देणारा अग्निदेवही स्वतःला भाग्यवान मानू लागला.
राजा दशरथ आणि कौसल्या राणीचा आनंद गगनात मावेना. आता समस्त अयोध्यावासियांचे डोळे लागलेत ते राजप्रसादाकडे.
दशरथा, घे हें पायसदान तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलों हा माझा सन्मान तव यज्ञाची होय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी आलों मी हा प्रसाद घेउनि
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान करांत घे ही सुवर्णस्थाली दे राण्यांना क्षीर आंतली कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान राण्या करतिल पायसभक्षण उदरीं होईल वंशारोपण त्यांच्या पोटीं जन्मा येतिल, योद्धे चार महान प्रसवतील त्या तीन्ही देवी श्रीविष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान
कृतार्थ दिसती तुझीं लोचनें कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञीं अंतर्धान Il श्रीराम जयराम जय जय राम ll
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!