मित्रांनो, प्रत्येक जण हा आपल्या घरी देवपूजा करीतच असतो. देवपूजा करणे हे एक नित्यनेमाचे आपले काम आहे. सकाळ संध्याकाळी देवपूजा करताना आपण दिवा लावीत असतो. कारण मित्रांनो अग्निसाक्षीशिवाय देवपूजा ही पूर्ण होतच नाही. हा दिवा तेलाचा किंवा तूपाचा लावत असतो.
दिवा लावल्याशिवाय कोणतीही देवपूजा पूर्ण होत नाही. दिव्याची वात जसजशी तेवत राहते. तसतसे आपल्या घरात देखील आनंदाचा प्रकाश कायम राहतो. आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाटते.जेव्हा दिव्याची ज्योत जळत राहते. त्यावेळेस आपल्या देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर होत राहतो. आपण सकाळी व संध्याकाळी देवापाशी दिवा, अगरबत्ती लावत असतो. संध्याकाळच्या दिव्या पेक्षा सकाळच्या दिव्याला फारच महत्व आहे. जर तुम्हाला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल. तसेच जे काही हवे आहे ते मिळावे अशी इच्छा असेल, तर सकाळी दिवा लावताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा खूपच चमत्कारिक असा मंत्र आहे.
यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल. तसेच आपल्या घरामध्ये बरकत कायम राहील. सर्व अडचणी दूर होतील. हा मंत्र तुम्हाला फक्त एकदाच म्हणायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला सकाळी दिवा लावल्यानंतर म्हणायचा आहे. संध्याकाळी म्हणायचा नाही.सकाळी पूजा आटोपून दिवा, अगरबत्ती लावल्यावर मनोभावे देवांना नमस्कार करून दोन्ही हात जोडून या मंत्राच्या ओळी तुम्हाला म्हणायच्या आहेत. जेणेकरून तुमच्या घरात सुख समृद्धी, ऐश्वर्य याची कधीच कमी पडणार नाही. कायम घरात भरभराट होईल. चला तर मग पाहूया कोणता आहे हा मंत्र.
शुभम करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते
असा हा साधा सोपा व शक्तिशाली मंत्र तुम्हाला दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवघरात दिवा लावल्यानंतर हात जोडून मनोभावे व श्रद्धेने बोलायचा आहे. हा मंत्र पाठ करा अथवा एका वहीवर लिहून तो बोलला तरी देखील चालेल.पण हा मंत्र तुम्हाला सकाळच्या देवपूजा झाल्यानंतर दिवा लावल्यानंतरच बोलायचा आहे. तर मित्रांनो हा चमत्कारिक उपाय तुम्ही नक्की करून पहा. त्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. देवीदेवता तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद