बघितलस,” आज खुप आठवते आहेस, सगळं विसरुन सुद्धा.”❤

”आज संध्याकाळी का कुणास ठाऊक खुप उदास वाटत होतं, 

मावळतीला कललेल्या सुर्याचा तो प’रिणाम होता की संपत आलेल्या आयुष्याचा, देव जाणे. पण असं एकटं एकटं कधीच वाटलं नव्हतं. डोळे बंद करुन सुर्याच्या सोनेरी किरणांना अं’गावर झेलत होतो. आणि कधी तिचा नि’रा’गस चेहरा मनाच्या आरश्यावर प्रतिंबिब उमटवून गेला. माझं मला सुद्धा कळलं नाही….

हो आज खुप आठवते आहेस, सगळ काही विसरुन सुद्धा. तुझं ते नजरेतून बोलणं, ओठ मु’ड’पून हसणं, सगळं सगळं आठवतय आज. आठवतयं तुला किती भां’डा’यचो आपणं, मग तू अबोला धरायचीस, मी तुझी समजुत काढताना, र’ड’कुंडीला यायचो. मग तु मात्र ख’टयाळ हसुन माझे गाल ओढायचीस. मी मात्र तुझे ते रूप डोळ्यात साठवून घ्यायचो. म’नात उठणाऱ्या असंख्य वा’दळाना सं’यमाने श’मू द्यायचो.

आठवतयं तुला? गाण्यासाठी किती हट्ट करायचीस…. पुर्ण यादी शोधून दे….. नाही दिली की रा ग’वायचीस. आठवतयं तुला? कधी भेटलीस की किती शांत असायचीस…. मी एकटाच ब’डबड करायचो… तू फक्त ऐंकायचीस……. तुला घरी सोडताना, नेहमी वळून बघायचीस….. तेव्हा खर सांगू, तू खुप मासूम दिसायशीच.

हो आज खुप आठवते आहेस… सगळं काही विसरुन सुद्धा….का??? ते विचारते आहेस..आज इतकी दुर निघुन गेलीस की मनात असुन सुद्धा तुझ्या कडे येवू शकत नाही मी…..सवयीची नसताना ही माझी सवय होवून गेलीस…..तू नाहीस तर बघ ना हे लोक मला माणुस समजत नाहीत….सगळ्यांच्या वापराची एक वस्तू झालो आहे मी फक्त……हजेरी लावण्या पुरती माणसे येतात आयुष्यात…काम झाले की निघुन जातात….त्यांच्या जगा मध्ये…….माझे जग अजुन सुद्धा तुझ्या मध्येच आहे…..तसे ते तुझ्या शिवाय वेगळे होतेच कुठे???

आज तू विचारते आहेस की तू इतकी का आठवतेस?…अग आठवण्या साठी आधी विसराव लागत…. तुला इथे विसरले कोण आहे?…. माणसे देवा घरी गेली की आकाशातला तारा बनतात……आता तुच सांग मला, तुला मी कोणत्या क्षितीजा वर शोधू??? इथे तर पूर्ण आकाशच लुकलुकनाऱ्या ताऱ्यानी व्यापले आहे….तिथे तुझी ओळख सांग ना मला….मला ही तुझ्या भेटीसाठी यायचे आहे.

आज ही तो दिवस आठवतो……मोबाईल ची रिंग वाजली, मी गडबडी मध्येच फोन उचलला. “जिथे असशील तिथुन श्रीराम हॉ’स्पीटल मध्ये लवकर पोच, “असा तुझ्या बाबांचा कापरा आवाज ऐंकला आणि क्षणभर सुन्न झालो….काय झाले काही कळेना, काय करावे ते ही सुचेना….तसाच लगबगीने हॉ’स्पीतल मध्ये पोहोचलो…… तुझ्या बाबांचा पडलेला चेहरा पाहीला….पाया खालुन जमिन सरकली क्षणभर…..विचारले”, काय झाले? काही कळेल का?”.

तुझ्या बाबांचा आवाज ऐंकला, “उद्या तुझा वाढदिवस होता ना, म्हणुण ती तुझ्या साठी गिफ़्ट आणायला गेली होती, घरी येताना भरधाव येणाऱ्या गाडी ने उडवले तिला….चालक म’द्य’धुं’द अवस्थे मध्ये होता…..माझी लेक र’क्ता’च्या थारोळ्या मध्ये त’ड’फ’ड’ली रे…लोकांच्या मदतीने तिला हॉ’स्पीटल मध्ये आणली पो’लीसानी..मग आम्हाला कळवले.

मी: कशी आहे ती आता? मला तिला पाहायचे आहे?

बाबा काहीच बोलले नाही…..मग मीच धीर करुन वॉर्ड कडे पावले वळवली…..तुझ्या आईचे ते र ड णे ऐकले आणि माझा बांध सुटला…. तुझ्या चेहऱ्याकडे पाहिले, आज ही किती मासुम दिसत होतीस तू…. म्हणालो,” बोल ना माझ्याशी….मला तुझ्याशी भांडायचयं, मग खुप खुप बोलायचयं….तुझा रुसवा काढताना,मला तु खुप रडवायचयं…पण तू नेहमी बोलत रहा…मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय…

बाबांनी येऊन माझ्या खाद्यांवर हात ठेवला….म्हणाले, “ती आपल्यात नाही आहे. तुला यायला थोडा उशीर झाला… मघाशी सांगायचा धीर नाही झाला मला. जाण्या आधी इतकेच म्हणाली, “मला त्याच्या सोबत बोलायचे होते एकदा….त्याचा वाढदिवस आहे उद्या, त्याला मी आणलेले गिफ्ट द्यायचे आहे.” असे बोलुन तुझ्या बाबांनी एक लिफाफा माझ्या हाती दिला.

जड मनाने, कापऱ्या हातानी मी तो उघडला……..माझ्या साठी घेतलेले एक घडयाळ आणि एक पत्र होते त्यात…..”भेटीच्या वेळा पाळत नाही ना मी…म्हणुन दिलेस ना मला???….बघ ना, शेवटी पोहोचताना पण उशीरच केला मी…

मग तुझे पत्र वाचू लागलो मी….

” मी कधीच तुझ्याशी बोलत नाही,
तुझ्या कविताच माझ्याशी बोलतात.
ओठात अडकलेले शब्द मग,
पापण्या मिचकावून सांगतात.”

वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा…..बघ मी पण शिकले कविता करायला….आता या तुझ्या कवितेला कायम तुझ्या घरी घेवुन जा….उशीर केलास तर मी दूर निघुन जाईन हा….मग म्हणू नकोस मी तुला रडवते…..माझ खुप प्रेम आहे तुझ्या वर, कायम मला सोबत दे,माझ्या सोबत रहा.
तुझी
॑॑॑॑॑॑॑॑॑

सुर्य कधीच मावळला होता….अं’धार दाटुन आला. मी भा ना वर आलो , पाहिले तर घडयाळा मध्ये ८ वाजले होते. मी घरी निघालो, जे आजही माझ्या सारखे एकटेच होते, माझी वाट पाहात.
सहज काही कवितेच्या ओळी ओठा वर आल्या आणि त्या सुद्धा फक्त तुझ्या साठी…
“बहर ओसरला ग आता,
बहर ओसरला…….
देव देखील या वेळी,
मला जवळ घ्यायला विसरला.

बघितलस, “आज खुप आठवते आहेस…. सगळं विसरुन सुद्धा.”.
M.jare…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *