मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे की श्री गणेश देवतांचे अधिपती आहे कोणतेही कार्य सुरू करताना प्रथम श्री गणेशाचं पूजन केलं जातं. जेणेकरून आपल्या कार्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत. निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रथम श्री गणेशाचे पूजन केलं जातं. गणेशाची भक्तिभावाने मनःपूर्वक आराधना केली जाते.
संकष्टी चतुर्थी ही तिथी गणेशांची अत्यंत प्रिय तिथी आहे. या दिवशी श्री गणेशाची आराधना केली जाते.हे व्रत श्री गणेशास समर्पित आहे. या दिवशी भगवान श्रीगणेशांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले,तर यामुळे आपल्या जीवनात यश वैभव सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होते. गणेशाची व्रत उपवास केला असेल किंवा नसेल तरी सुद्धा उपाय नक्की करा.
पहा हा वृत्त तुम्ही भक्तिभावाने आणि आणि मनोभावाने केलात तर गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते. गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील. चला तर जाणून घेऊ या दिवशी श्रीगणेशाचे वृत्त करण्यासाठी कोणता उपाय आपल्याला करायचा आहे. हे व्रत स्त्री, पुरुष, वृद्ध कोणीही करू शकतो. जी व्यक्ती संकष्ट चतुर्थीला उपवास किंवा व्रत करणार आहे, त्या व्यक्तींनी सकाळी लवकर उठायचं आहे. या साठी शरीराची तशीच मनाची शुद्धता लागते.
त्यासाठी सकाळी उठल्यापासून श्री गणेश यांचे नावाचा सतत जप करायचा आहे.श्री गणेश यांचे नावाचा स्मरण करायचे आहे जेणेकरून कोणतेही वाईट विचार आपल्या मनात येणार आहेत. श्री गणेशाय नमः ओम गं गणपतये नमः असा कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता. सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर त्यांची विधीवत पूजा करायचे आहे. श्रीगणेशांना प्रिय असणाऱ्या दुर्वा गणेशाला अर्पण करायचे आहेत. शक्य नसल्यास जास्वंदीचे फूल देखील अर्पण केले तरी चालेल कारण जास्वंदीचे फूल हे गणेशाला खूप प्रिय आहे.
हा विशेष उपाय करण्यासाठी आपल्याला विड्याचे पान घ्यायचा आहे. पण स्वच्छ व देठासहित असावं.वीड्याचे पान घेऊन आणि त्यांच्या मधोमध कुंकवाने स्वस्तिक काढून ते श्री गणेशाच्या चरणी ठेवायचे आहे.थोडीशी मसूरडाळ घेऊन ती स्वास्तिक च्या मधोमध ठेवायची आहे. आता या पानांची आपल्याला घडी घालायची आहे. जसे आपण वीडा बनवतो त्याच प्रमाणे हे पान घडी घालून त्याला लवंग खोचायचे आहे. त्यामुळे आपण घडी घातलेल्या वीड्याची घडी सुटू नये.
तयार केलेला विडा श्री गणेशाच्या चरणी ठेवायचा आहे. त्यावर हळद-कुंकू वाहून अक्षता वाहून श्री गणेशाच्या समोर आपल्या मनातील इच्छा ज्या काही असतील ते मांडायचे आहेत. ज्या काही समस्या असतील त्या श्री गणेशाच्या समोर मांडायचे आहेत धनसंपत्ती च्या बाबतीत अडचणी असतील नोकरीच्या बाबतीत अडचणी असतील किंवा शैक्षणिक कामात अडचणी असतील व्यवसाय व्यापारात समस्या असतील, तर त्या सगळ्या समस्या श्रीगणेशाच्या समोर मनातल्यामनात सांगायचे आहे. आपल्या समस्यांचे निवारण होण्यासाठी हा उपाय विधीपूर्वक व मनोभावाने भक्तिभावाने करायचा आहे.
ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे हा मंत्राचा जप अगदी मनोभावे भक्तिभावाने म्हणायचे आहे. श्री गणेशाला प्रिय असणारे लाडवांचा नैवेद्य दाखवायचा आहे. मित्रांनो संकष्ट चतुर्थीच्या व्रतांमध्ये चंद्र देवाच्या पूजेचे खूप महत्त्व आहे यावेळी चंद्रदेवाची सुद्धा पूजा करायचे आहे. त्यानंतर श्री गणेशाची आरती करून मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर आपला उपवास सोडायचा आहे.
पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ठेवलेला विडा तो घेऊन आपल्या घरापासून काही अंतरावर जायचे आहे. कोणत्याही झाडाखाली हा वीडा ठेवून द्यायचा आहे. हा वेडा मातीत ठेवला तरी चालेल. घरी आल्यानंतर तोंड हात पाय धुवून मगच घरी यायचा आहे. हा उपाय तुम्ही मनोभावाने आणि फनी जर केलात तर तुमच्या समस्याचे निरसन होणार आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.