अंगारकी संकष्टी ही वर्षातून दोन वेळा येते. मित्रांनो अंगारकी संकष्टी केल्याने एकवीस संकष्टीचे व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होत असते. म्हणून अंगारकी संकष्टी करणे खूपच शुभ मानले जाते. या दिवशी अनेक जण गणपतींचे उपासना अगदी मनोभावे व श्रद्धेने पूजा, अर्चना व त्यांचे दर्शन घेत असतात.
मित्रांनो, आपल्यापैकी अनेकजण गणेशभक्त आहेत. गणेशांची पूजा, व्रत अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात. आपल्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी देखील अनेक भक्त हे व्रत अगदी श्रद्धेने करीत असतात. मित्रांनो अंगारकी संकष्टी चे आपल्या शास्त्रात खूपच महत्त्व आहे.
मित्रांनो हे व्रत तुम्ही केले असेल किंवा नाही केले असेल त्यांनी हे उपाय केले तरीही चालतात. मित्रांनो आपल्या जीवनात काही वैवाहिक समस्या असतील म्हणजेच पती-पत्नीमध्ये वाद विवाहात तसेच विवाहाचे सुख प्राप्त होत नसेल तसेच अनेकांचे विवाह जुळण्या मध्ये अडथळा निर्माण होत असेल, चांगले स्थळ मिळत नसेल तर अशा लोकांनी हा उपाय अवश्य करावा.
मित्रांनो तुम्ही गणपतीची पूजा करीत असताना एक हळकुंड घ्यायचे आहे आणि ते पिवळ्या कपड्यांमध्ये ठेवायचे आहे म्हणजेच ते हळकुंड गणपतींना समर्पित करायचे आहे व त्यानंतर विधिवत पुजा करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्ही फुले तसेच आरती ओवाळायची आहे व मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे.
आणि आपली वैवाहिक समस्या गणपती बाप्पा समोर बोलून दाखवायचे आहे. हा उपाय केल्याने गणपती बाप्पा तुमच्या नक्षत्रातील जे काही कुंडली दोष, ग्रह दोष असतील ते सर्व दूर करतील व तुमची इच्छा पूर्ण करतील.
याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणत्या समस्या असतील म्हणजे तुमचा उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही. शत्रू असतील, काही अर्थिक समस्या असतील, नोकरी मिळत नाही, विद्यार्थ्यांना योग्य ते यश मिळत नसेल तर तुम्हाला अंगारकी संकष्टी दिवशी गणपतीची पूजा करीत असताना तुम्हाला विड्याचे एक पान घ्यायचे आहे. ते स्वच्छ धुवून किंवा गंगाजलाने ते स्वच्छ धुऊन गणपती समोर ठेवायचे आहे. त्या पानावर ते तुम्हाला कुंकवाने किंवा शेंदूर असेल तर त्या शेंदुराने एक त्रिकोण काढायचा आहे. या त्रीकोणा मध्ये तुम्हाला थोडीशी मसूरडाळ ठेवायची आहे.
आणि जसा तुम्ही त्रिकोण काढलेला आहे त्या पद्धतीने त्या पानाची घडी घालायची आहे म्हणजेच एक वीडा तुमचा तयार होईल. या विड्याच्या मधोमध एक लवंग खूपसायचे आहे. आणि हा विडा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे. अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला गणपतींची पूजा करून घ्यायचे आहे म्हणजेच आरती ओवाळून अगरबत्ती, दिवा धूप लावायचा आहे.
नैवेद्य दाखवायचा आहे आणि ज्या काही आपल्या समस्या आहेत म्हणजेच उद्योग, व्यापारामध्ये आपणाला काही अडचणी असतील किंवा आपले कर्ज फीटत नसेल अशा अनेक प्रकारच्या ज्या काही तुमच्या आर्थिक बाबतीत समस्या असतील त्या सर्व समस्या गणपती बाप्पा समोर बोलायचे आहेत व या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपणाला प्रार्थना करायची आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हा जप तुम्ही 108 वेळा केला तरीही चालतो.
हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून झाल्यानंतर हे विड्याचे पान तसेच जे तुम्हाला हळकुंडाचा उपाय सांगितला तो पिवळ्या रंगामध्ये गुंडाळलेल हळकुंड तुम्ही आपल्या घरापासून दूर घेऊन तो एका झाडाखाली ठेवायचा आहे किंवा तो तुम्ही मातीत पुरून देखील ठेवू शकता आणि घरी परत आल्यानंतर आपले हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत.
तर मित्रांनो तुम्हाला वैवाहिक समस्या, विवाह जुळत नसेल तर अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी हळकुंडाचा तसेच आर्थिक काही अडचणी असतील, पैशाच्या बाबतीत काही अडचणी असतील तर हा विड्याच्या पानाचा उपाय अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी नक्की करून पहा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!