मित्रांनो आज, 16 एप्रिल हनुमान जयंती आहे. आजच्या दिवशी आणि शनिवारी हनुमंताना आवडणाऱ्या या तीन गोष्टी अवश्य अर्पण कराव्यात. आणि ते तीन पदार्थ म्हणजे रुई, तेल आणि शेंदूर. या तीन गोष्टी हनुमानाला अर्पण केल्याने काय होत आणि या तीन गोष्टी हनुमानाला का अर्पण करायला पाहिजे… चला जाणून घेऊया…
या दिवशी हनुमंताना तेल, रुई आणि शेंदूर वाहिले जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो आणि अनेक ठिकाणी उत्सवाचं वातावरण असतं. भजन कीर्तन असत. जन्म वेळ झाल्यानंतर हनुमंताना पाळण्यात घालून पाळणा देखील म्हनला जात असतो, आरती म्हणली जाते आणि उत्सवाची सांगता केली जाते.
सगळ्यात आधी आपण तेलाबद्दल बोलूया. तर दर शनिवारी हनुमानाच्या डोक्यावर तेल अर्पण केले जाते. आणि त्या संबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजीताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्च्छित झाले आणि त्यासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाश मार्गाने जात असताना गैरसमजुती ने भरताने त्यांना बान मारून खाली पाडले परंतु हनुमान यांचे कार्य आणि कर्तृत्व कळल्याने भरताने त्यांच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम लगेच बरी होऊन हनुमान लंकेत वेळेत पोहचले. आणि म्हणून पुढे हनुमानाला तेल अर्पण करण्याची प्रथा पडली.
दुसरे म्हणजे रुई. हनुमानाची माता म्हणजेच अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या पाच दैवतांची कृपा दृष्टी व्हावी, इतकचं नाही तर त्याला बळ आणि बुद्धी लाभावी यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे आपल्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालू लागले. आणि म्हणूनच भाविक सुद्धा त्यांना रुईच्या पानांची माळ अर्पण करतात.
तिसरं म्हणजे हनुमानाला शेंदूर लावणे. भरताने तेल आणि शेंदूर लाऊन हनुमानाची जखम बरी केली याशिवाय सीता मातेने भाळी शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई आपण हा टिळा कपाळावर का लावताय असा प्रश्न हनुमानाने सीता माई ला विचारला. असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीता माई ने हनुमंताला सांगितले. तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे श्री राम यांचे आयुष्य वाढावे म्हणून हनुमान आपल्या सर्वांगावर शेंदूर लावतात. आणि म्हणून तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पण केले जाते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!