शिव काय आहे ? शिव तत्वाला जाणण्यासाठी करा हे 4 उपाय. ॐ नम: शिवाय.

शिव कोणी व्यक्ती नाही तर ती समस्त सृष्टी आहे. शिव आकाश तत्व आहे, चेतना आहे. ज्यातून सर्व निर्मिले, जो सर्वांचे पालन पोषण करतो आणि ज्यात सर्व विलीन होईल,तो शिव आहे.

शिव तत्वातून तुम्ही वेगळे होऊ शकत नाही कारण ते सर्व ब्रम्हांडाचे प्रतिक आहे..शिव शब्द ‘श’, ’ई‘ आणि ’व‘ असा विभागाला जातो.

श म्हणजे शरीर, ई म्हणजे ईश्वर / प्राण शक्ती, आणि व म्हणजे वायू / गती. शिव म्हणजे प्राण शक्ती आणि गतीयुक्त शरीर. शिव मधून ई जर काढून टाकले तर शव होते. म्हणून जे ‘शिवतत्वासह’ आहे ते शिव आणि त्याच्याशिवायआहे ते शव. म्हणून शिव तत्व पवित्र, अव्यक्त आणि सर्वसमावेशक आहे-ब्रम्हांडाची चेतना, प्राणशक्ती. शिव तत्व जाणून घेणे म्हणजे परमानंद.

शिव कोण आहे? – शिव म्हणजे समस्त ब्रम्हांड. ब्रम्हांडामधील चराचरामध्ये तोच आहे. शिवाला देह नाही. मुळात तो कोणी व्यक्तीच नाही. भावी पिढीला ती अगाध आणि अनंत चेतना समजावी म्हणून तिला त्यांनी आकार दिला गेला. नाहीतर शिव तत्व निराकार आहे.

ज्यामधून सर्वांची निर्मिती होते, जो सर्वांचे पालन पोषण करतो आणि ज्याच्यामध्ये सर्व विलीन होणार आहे, ते शिव तत्व होय. शिव आकाश तत्व, चेतना आहे. तुम्ही कधीही शिव तत्त्वातून अलग होऊ शकत नाही कारण शिव तत्व ब्रम्हांडातील अति उत्कृष्ट आहे. शिवाचे शरीर निळ्या रंगात दाखवले आहे कारण अनंताला सामाऊन घेणाऱ्या असीम आणि निराकार आकाशाचा रंग निळा असतो.

वैराग्याची प्राप्ती ज्याच्यामुळे होते अशी परमानंदी आणि निष्पाप चेतना म्हणजे शिव. स्थायी आणि कायमस्वरूपी ऊर्जेचा स्त्रोत, एकमेव चिरंतन अस्तित्व म्हणजे शिव. चराचरातील आत्मा म्हणजे शिव, आत्मा आणि शिव हे दोन्ही वेगळे नाहीत. ब्रह्मांडा तील सर्वात मोठे आश्चर्य हे आहे की एकच चेतना समस्त चराचरा मध्ये कशी वास करू शकते. तिला आकार नाही, परंतु ती प्रत्येक आकारामध्ये आहे.

रुद्राभिशेकात उच्चारतात की, “विरूपे भ्यो, विश्व रूपे भ्यशच यो नमो नमः” विरूपे भ्यो म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही. विश्व रूपे भ्यो म्हणजे तो ब्रह्मांडातील सर्व आकारांमध्ये आहे. सर्व आकार हे निराकार शिव तत्वाचे प्रकटीकरण आहे. शिव सर्वत्र उपस्थित असणारी चेतना आहे, ऊर्जा केंद्र आहे. अनादी आणि अनंत.

शिव तत्व अनादी आणि अनंत आहे, शाश्वत आहे. तो जागृती, स्वप्न आणि निद्रा या चेतनेच्या अवस्थांच्या पुढील चेतनेची ध्यानस्थ अवस्था, ’तुर्यावस्था’आहे.

एक सुंदर कथा आहे. एकदा सृष्टीचा निर्माता ब्रम्हा आणि पालनकर्ता विष्णू ठरवतात कि शिवाला शोधून त्याला जाणून घेऊया. ब्रम्हा म्हणाले कि, ’मी त्याच्या डोक्याकडे वर जाऊन मस्तक पाहीन तर तुम्ही पायाकडे जा. ’मग हजारो वर्षे विष्णू खाली खाली तर ब्रम्हा वर वर जात राहिले. परंतु दोघांना यश आले नाही.

इथे याचा मतितार्थ असा आहे कि, शिवाला डोके आणि पाय नाहीत. शिवाला सुरवात आणि अंत नाही. शेवटी मध्यभागी भेटून दोघांनी मान्य केले कि शिव अनादी आणि अनंत आहे. ब्रम्हांडाचा विस्तार अनंत असून हे ज्याच्यात सामावले आहे ती चेतना देखील अनंत आहे; तसेच ते अज्ञात आहे.ते निव्वळ प्रेम करावे असे आहे.
 

शिवाला कसे जाणू शकता? – ‘तपो योगा गम्य, ’आदिशंकराचार्य रचित वेद सार शिव स्तोत्रम मधील श्लोकाचा अर्थ असा आहे कि, शिवाला निव्वळ तप आणि योगाद्वारे समजू शकतो. ॐ मुळे आपण जाणून घेऊ शकतो. जेंव्हा आपण ॐ मध्ये खोलवर जातो तेंव्हा ब्रम्हांडाचा ओम हा प्राचीन ध्वनी ऐकू येतो. ॐ म्हणजे तुम्ही सतत म्हणता तो नव्हे तर सतत ऐकू येतो तो होय.

शिव तत्वाला जाणण्यासाठी प्राचीन ऋषी मुनींनी चार उपाय सांगितले आहेत : अन्वोपाय – अहंकारावर उपाय करणे. अन्व – ध्यान करणे. सक्तोपाय – मौनामध्ये आपल्या शरीरातील शक्ती      केंद्रांना जागृत करणे. संबवोपाय – स्वतःच्या विचारांपासून दूर रहाणे.

श्रुती ज्ञान गम्यः’ (श्लोक : आदिशंकराचार्य रचित वेद सार शिव स्तोत्र) निव्वळ गाढ ध्यानामध्येच श्रुतीचे सखोल  ज्ञान प्राप्त करू शकतो, श्रुतीच्या या ज्ञानामुळे शिव तत्व जाणू शकतो. योगशास्त्रा शिवाय शिवाचा अनुभव मिळणार नाही.

निव्वळ शारीरिक आसने म्हणजे नव्हे तर ध्यानावस्थेमध्ये शिवाचा अनुभव प्राप्त होणे म्हणजे योग होय, जो आपणास आतून ‘खूप छान’ अनुभव देतो. आपल्या चेतनेच्या तीन अवस्था आहेत- जागृती, स्वप्न आणि निद्रा. एक चौथी अवस्था देखील आहे जेथे आपण ना जागे असतो, ना स्वप्न पाहत असतो, ना झोपलेले असतो.

या अवस्थेमध्ये शरीर विश्रांती घेत असते आणि म’न जागृत असते. कोठे आहात हे कळत नसते परंतु तुम्हाला जाणवत असते कि तुम्ही वर्तमान क्षणात आहात-हे शिव तत्व आहे, हा अनुभव निव्वळ ध्यानावस्थेत येतो. स्वप्न आणि निद्रावस्थेत नसता तेंव्हा ही समाधी अवस्था अनुभवू लागता जेथे कोणत्याही काळजी किंवा चिंता नसतात.

मग शिव तत्वाला कोठे शोधाल ? कैलास पर्वतावर ? नाही तर जागृती आणि स्वप्नावास्थेच्या मध्ये, गाढ निद्रा आणि जागृती मध्ये. जेंव्हा तुम्ही ध्यान करता, काय अनुभव येतो तुम्हाला? जागृत किंवा स्वप्नावास्थेत नसता तेंव्हा त्या चौथ्या स्थितीचा अनुभव येतो, तेंव्हा तुम्ही तुमच्यातील शिव तत्वाशी जोडले जाता.

त्या स्थितीमध्ये तुम्हाला गाढ विश्रांती मिळते जिच्यामुळे तुमचे मन ताजे तवाने, सूक्ष्म,सुंदर आणि निष्पाप बनते. हे शिव तत्व आहे जे सर्वशक्तिमान आहे, आकाश तत्वाप्रमाणे सर्वव्याप्त आहे, ज्यामध्ये समस्त ज्ञान सामावले आहे. जे अनादी आणि गुणातीत आहे, अशी एक ध्यानावस्था आहे जेथे चेतनेच्या आकाश तत्वाशिवाय काहीही नाही.

वैश्विक सत्यतेचा ध्वनी जो प्राचीन ऋषी मुनींनी स्वतः ऐकला, तो मग मानवाला समजू शकेल असा रुपांतरीत केला, हिंदू धर्मातील पवित्र साहित्य-वेद असे प्रकट झाले. शिव हा हिंदू धर्मातील दुष्प्रवृत्तींचा संहारक देव आहे, तसेच संपूर्ण सृष्टी शिवापासुन उत्पन्न झाली आहे. शिव ब्रह्मा, विष्णूयांच्यासह त्रिमूर्तींतील एक देव मानला जातो.

वेदांमध्ये त्यांचा ‘रुद्र’ या नावाने उल्लेख केला आहे. ‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाची ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. भगवान शिव बहुतेक 1योग्याच्या रूपात चित्रित आहेत अणि त्यांची पूजा लिं’गाच्या स्वरूपात केली जाते. उत्पत्ती-लय क्षमता, शांत-क्रोधी, चंद्र (शीतलता)-तिसरा डोळा (भस्म करणारे तेज) ‘शिव’ हे संपूर्ण सृष्टीचे करता – धरता आहेत.

हिंदू धर्मातील ‘३३ कोटी देवांचे ते देव’ मानले गेले आहेत. ते एक वैरागी पुरुष तसेच सिद्ध योगीपुरुष असून त्यांची उत्पत्ती कशी किंवा कुठून झाली आहे हे अजूनही कळू शकलेले नाही. त्यांना अनादी आदीपुरुष मानले गेले आहे. हे हिंदू धर्मातील प्रमुख, परम आणि सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्याजवळ त्रिशूळ आहे ज्याचा अर्थ शिव हे अस्त्र – शस्त्र आदींचे ज्ञाता असून मान्यता आहे कि, जेव्हा

शिवाची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांच्यासोबत रज, तम् आणि सत यांची उत्पत्ती झाली ते म्हणजे त्रिशुळाचे प्रतीक, वाद्य डमरू हे शिवाचे तांडव नृत्याचे अविष्कार दर्शवते, शिवाच्या गळ्यात नाग आहे, त्यामागची कथा अशी कि, पुराणामध्ये जेव्हा नागांचे साम्राज्य होते आणि त्यासोबत सागर मंथन वेळेस समुद्रातून अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागाला रस्सी म्हणून वापरले गेले होते, त्यावेळेस समुद्रातून फार अश्या गोष्टी निघत होत्या कि ज्याकाही गोष्टी निघणार त्यांचा स्वीकार कोणीतरी करायचा होता, त्यामध्ये अशा बऱ्याच वस्तू श्री विष्णूंनी स्वीकारल्या, परंतु जेव्हा त्यामधून विष बाहेर आले तेव्हा ते विष घेण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं, कारण,

ह्या विषाचा एकही थेंब जर धर्तीवर पडला तर संपूर्ण सृष्टीला ते घातक झाले असते म्हणून शिवाने प्राशन केले, ते पिताच शिवाच्या अंगात दाहक वाढली आणि कंठ काळे-निळे झाले, ती दाहकता नष्ट करण्यासाठी सगळ्या देवांनी त्याचबरोबर राक्षसांनी शिवाला फार गोष्टी देऊ केल्या पण दाहकता काही कमी होईना, त्यावेळेस हे वासुकी नाग ( शेषनाग यांच्यानंतरचे नाग लोकांतील राजा ) श्री विष्णूंनी शिवाचे कंठाची दाहकता कमी होण्यासाठी दिले, तेव्हा शिवाची अंगाची आग शांत झाली आणि त्याचबरोबर शिवाला हे प्रिय झाले आणि श्री विष्णूनी शिवाला ” नीलकंठ ” हे नाव प्रदान केले.

शिव हे भोळ्या आणि सहज कुणालाही मागेल ते वर देणाऱ्या स्वभावाचे आहेत म्हणून संपूर्ण हिंदू देवतांमध्ये शिवाकडे राक्षसहि मोठ्या आशेने वर मागतात आणि हे शिव सहजगत्या देऊन हि जातात. म्हणूनच शिवाला भोलेनाथनाव आहे. त्याचबरोबर शिवाचे खरे वास्तव्य हे स्मशानात आहे, आणि ते स्वतः वैरागी स्वरूपात त्या प्रेतांचे भस्म आपल्या सर्वांगी ओढून घेतात. ॐ नमः शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्र आहे, पण ” ॐ नमो शिवाय: हा परिणाम दायक मंत्र आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *