शेगावचे गजानन महाराज यांचा आज रोजी प्रकट दिन आहे. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र 23 फेब्रुवारी 1878 मध्ये त्यांचे प्रथम दर्शन झाले. त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. बुलढाणा मधील शेगाव येथे महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले, अशी आख्यायिका आहे.
तेव्हापासून माघ वद्य सप्तमी दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात मोठा उत्सव असतो. चरण पादुका पूजन, पालखी असे विधी पार पडतात. यानिमित्ताने देशभरातून लाखो भक्त मंदिरात दर्शनासाठी येतात.
गजानन महाराज ज्या दिवशी प्रकट झाले तो दिवस शनिवारचा होता. यावेळी गजानन महाराज यांचा प्रकटदिनाचा तिथी आणि तारीख एकाच दिवशी आली असली तरी दिवस बुधवार आला आहे. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये गजानन महाराज यांची समाधी आहे. समाधी स्थळावर दररोज 25 ते 30 हजार भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
भारतातील हे एकमेव असे समाधीस्थळ आहे ज्याठिकाणी व्हीआयपीसाठी कोणतीही वेगळी व्यवस्था करण्यात आली नाही. सर्वांना रांगेमध्ये उभे राहूनच दर्शन घ्यावे लागते.
शेगाव प्रमाणे इतर ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठातही भव्य उत्सव आयोजित केले जातात. गण गण गणात बोते’ या महाराजांचा आवडता मंत्र. ते या मंत्राचा अखंड जप करत असतं. यामुळेच त्यांना ‘गजानन महाराज’ असे नाव पडले. ‘शेगावीचे संत’ म्हणूनही त्यांची ओळख आहे.
स्वामी समर्थ आणि गजानन महाराज- अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते. दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही आजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत. गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली, असे अनेकांचे मत आहे. स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तर प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते.
विठ्ठलाची आज्ञा – गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. १९६७ पासून गजानन महाराज पालखी माध्यमातून गजानन महाराज खेड्या- पाड्यापर्यंत पोहोचले. विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!