श्री गुरुचरित्र पारायणाचे काही रहस्यमयी फायदे

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण श्री गुरुचरित्र पारायणाचे काही रहस्यमयी आणि दिव्य फायदे जाणून घेणार आहोत मित्रांनो वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच, घरातील मतभेद या गोष्टीमुळे आज आपण प्रत्येक जण असंख्य दुःख संकट तसेच मानसिक अशांतता अनुभवतो. घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काहीना काही ही समस्येने घेरलेले आहे आणि सर्वजण या गोष्टीमुळे त्रस्त आहेत,

अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी अध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. वेदा प्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात ते पुढील प्रमाणे विशद करत आहोत ;

ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही त्यावेळेस या अमृततुल्य ग्रंथा च्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. श्री दत्त उपासक सांगतात कि या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे तुमच्या कुठल्याही प्रकारच्या व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात

गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःख मुक्त होतो अशी दृढ श्रद्धा भाविकांमध्ये आहे.स्वतःच्या घरामध्ये गुरूचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळावेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्प युक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात.

गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श अध्यात्मिक जीवन नीतिमूल्ये जपून कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथात सूचक मार्गदर्शन केले आहे.विशिष्ट समस्यांवर जसे विवाह, शिक्षण ,आरोग्य, यामध्ये येत असणाऱ्या अडचणीं वर संकल्प युक्त गुरुचरित्र केल्यास हमखास अनुभव येतो असे जाणकारांचे मत आहे.

सात दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धती आहे आणि त्यासोबत काही सात दिवसात पाळावयाचे महत्त्वाचे आहार ,विहार आणि विचार याविषयीचे नियम असतात.दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

अनेक दत्त शक्ती पिठामध्ये सामुदायिक पद्धतीने श्रीगुरुचरित्र वाचन केले जाते आणि दत्तजयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्तजन्म साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे.आपल्या पत्रिकेतील ग्रहतारे, पितृ दोष, प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे अनेक प्रख्यात ज्योतिषी देखील उपासनेत सांगतात किंबहुना या ग्रंथांमध्ये देखील याचा निश्चित उल्लेख आहे.

म्हणून आल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावं आणि या अध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *