श्री साईबाबा व श्री गजानन महाराज यांचे आंतरिक संबंध.

दिनांक ८-९-१९१० रोजी श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. इकडे शिर्डीमध्ये श्री साईबाबांनी प्रातःकाळी साडेपाच वाजता न्हाव्याला बोलावले व केस कापून घेतले आणि स्नान केले. ही घटना आपल्या दृष्टीने सामान्य असली तरीही श्री साईभक्तांच्या दृष्टीने मात्र वेगळी होती. कारण

श्री साईबाबा साधारणतः दुपारी हजामत करून घेत असत व आंघोळ करीत असत. त्या दिवशी मात्र त्यांनी केलेली ही कृती पाहून भक्तगण जरा अचंब्यातच पडले. त्याच दिवशी स्नान झाल्यानंतर त्यांनी एक भक्तास दुकानातून नारळ, थोडीशी साखर व भुईमूगाच्या शेंगा आणावयास सांगितल्या.

आणलेला नारळ त्यांनी स्वतःच्या हाताने फोडला व त्याचे छोटे-छोटे तुकडे करून त्यासोबत साखर व भुईमूगाच्या शेंगा तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये वाटल्या. त्यानंतर त्यांनी “बोलो श्री गजानन महाराज की जय” असा जयजयकार करावयास सुरूवात केली. आश्चर्य असे की,

तेव्हा तेथे उपस्थित लोकांपैकी बऱ्याच जणांना गजानन महाराजाविषयी काही एक माहिती नव्हती. तरीही त्यांनी श्री साईबाबांसोबत जयजयकार केला. नंतर श्री साईबाबांनी स्वतः त्या उपस्थित भक्तांना सांगीतले की, “आज सुबह मेरा भाई जाता रहा.” इकडे खरोखरच सकाळी दि. ८/९/१९१० रोजी शेगावी श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. तेव्हा

शिर्डी येथे उपस्थित असलेल्या काकासाहेब दिक्षीत यांना दोन दिवसानंतर गोपाळराव बुटी यांचे पत्र आले. त्यात त्यांनी लिहीले होते कि दिनांक ८/९/१९१० रोजी श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली व अंतिम समयी आम्हां लोकांना असे आश्वासन दिले की, “अब आगे से मेरे भाई श्री साईबाबा आप लोगोंकी देखभाल करेंगे उनके पास शिर्डी चले जाना.”

“श्री गजानन विजय” या ग्रथात छापल्या अभिप्रायमध्ये बा. ग. खापर्डे यांनी लिहिले आहे की त्यांना त्याचे वडिल दादासाहेब खापर्डे यांनी सांगितले होते की श्री गजानन महाराजांनी ज्या दिवशी देह ठेविला त्या दिवशी श्री साईबाबा दिवसभर शोक करीत होते. ज्या क्षणी श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली त्यावेळी श्री साईबाबा गडाबडा लोळले आणि

“माझा जीव चालला, मोठा जीव चालला” असे विव्हळून अनेकदा ओरडले. या दोन्ही संदर्भावरून असे लक्षात येते की आंतरीक दृष्टीने या दोन्ही संतांची एकमेकांशी अतिशय जवळचा संपर्क होता. संत बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असेल तरी अंतरंगातून ते एकत्र मिसळलेले असतात यात शंका नाही.

श्री साईबाबांची अकरा वचने – शिरडीस ज्याचे लागतील पाय,
टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दु:ख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तासाठी, नवसास माझी पावेल समाधी, धरा द्रुढ बुध्दी माझ्या ठायी.

नित्य मी जिवंत, जाणा हेंची सत्य, नित्य घ्या प्रचीत अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा. जो जो, मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे, मीही त्यासी.

तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नव्हे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहला कायावाचामनीं, तयाचा मी ऋणी सर्वकाळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *