स्मिता पाटील यांना आधी च समजायच्या भविष्या तील गोष्टी, त्यांनी स्वतः केली होती त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी.

मित्रांनो, विज्ञान चित्रकार व लेखक सुभाष अवचट यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या विषयीचा एक किस्सा सांगितलेला आहे. तोच कीस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे.

बॉलीवूडमधे अनेक प्रकारच्या अभिनेत्री प्रसिद्ध झाल्या. या अभिनेत्रींनी बॉलीवूड चे नाव उंचावर नेऊन ठेवले होते. या सर्व अभिनेत्रींपैकी स्मिता पाटील ही अभिनेत्री आपल्या सर्वांना माहीतच आहे. बॉलीवूडला उंचावर नेऊन ठेवण्यात स्मिता पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा अभिनय अतिशय सुंदर असायचा. त्यांनी आपले सर्व आयुष्य बॉलिवूडमध्ये पणाला लावले. मित्रांनो स्मिता पाटील यांनी आपल्या मृत्यूचे भविष्य सांगितले होते. अशी चर्चा सगळीकडेच होती.

सुभाष सर व स्मिता पाटील ताज हॉटेलच्या एका लिफ्टमधून जात असताना त्यांनी एका परदेशी व्यक्तीला पाहिल. त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर स्मिता पाटील सुभाष सरांना म्हणाल्या की, त्या व्यक्तीला तुम्ही विचारा की त्याचा नुकताच अपघात झाला आहे का आणि या अपघातात त्याच्या डाव्या खांद्याला मार लागून फॅक्चर झालेलं आहे का?

स्मिताच्या या बोलण्यावरून सुभाष सरांनी त्या व्यक्तीला हा प्रश्न विचारला असता. तो व्यक्ती आश्चर्यचकीत झाला आणि तो होय म्हणाला. परंतु त्या व्यक्तीने सुभाष सरांना विचारले की तुम्हाला हे सर्व कसे माहिती झाले. तर त्याच्या या प्रश्नावर सुभाष सर काहीच न बोलता स्मिता पाटील व सुभाष सर तिथून निघून गेले. मित्रांनो असे म्हणतात स्मिता पाटील यांना समोरच्या व्यक्तींविषयी भविष्य कळत होते. असे सुभाष सर सांगतात. असे अनेक पार्ट्यांमध्ये तसेच समारंभांमध्ये देखील घडलेले आहे.

पुनम धिल्ले हीच्याशी बोलताना स्मिता पाटील यांनी आपल्या भविष्याविषयी देखील सांगितलेलं होतं की स्मिता पाटील म्हणजे मी वयाच्या 31 व्या वर्षी मरणार आहे. असे स्वतः पुनम धील्लो यांनी एका पत्रकार परिषद मध्ये सांगितलेलं होतं की स्मिता पाटील यांनी त्यांच्या मृत्यूविषयी म्हणजे स्मिता यांनी स्वतःविषयी भविष्यवाणी केली होती.

अमिताभ बच्चन एकदा कुली चित्रपटाच्या शूटिंगसाठी बेंगलोर मध्ये गेलेले होते. तेथे त्यांना रात्री दोन वाजता सेक्रेटरीने उठवलं आणि स्मिता पाटील यांचा फोन आलेला आहे असे सांगितले. याच्या अगोदर कधीही स्मिता पाटील यांचा फोन आलेला नव्हता. काहीतरी अर्जंट काम असेल म्हणून अमिताभ बच्चन यांनी स्मिता पाटील यांचा कॉल उचलला.

त्या वेळेस स्मिता पाटील यांनी अगदी काळजी स्वरांमध्ये त्यांना विचारले की, सगळे काही ठीक ठाक व्यवस्थित आहे ना. कारण मी आत्ताच एक स्वप्न पाहिले आहे या स्वप्नात तुमचा अपघात झालेला आहे. त्या वेळेस स्मिता पाटीलच्या या प्रश्नावर अमिताभ बच्चन हसत हसत म्हणाले की, मी व्यवस्थित आहे. काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

दुसऱ्या दिवशी जेव्हा अमिताभ बच्चन कुली चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर गेले असता तर सेटवर त्यांचा अपघात झाला व काही दिवस त्यांना दवाखान्यात रहावं लागलं. तेव्हा बच्चन म्हणाले की, स्मिता पाटील यांना भविष्या विषयी कळते. आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना तिला अगोदर समजतात.

नंतर स्मिताने माता सबलीकरणासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. महिलांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तिचे खूप प्रयत्न चालू होते. परंतु मुलाला जन्म देत असताना तिचा मृत्यू झाला हा नियतीचा कोणता खेळ म्हणायचा. ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला तर अवघ्या 31 वर्षाची होती म्हणजेच पूनम धिल्लन सांगितलेल की स्मिताने तिच्या मृत्यूची भविष्यवाणी केली आहे ती खरी ठरली.

तर मित्रांनो अशी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील होत्या. त्यांना भविष्याविषयी सर्व समजायचे. परंतु अखेरीस त्यांना वयाच्या 31 व्या वर्षी मृत्यूला सामोरे जावे लागले. म्हणजे स्मिता पाटील यांनी त्यांच्या मृत्यूविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली.

मित्रांनो अशाच प्रकारच्या मनोरंजनात्मक नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शे’अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *